नमस्कार मित्रांनो,
नमस्कार मित्रांनो, आपल्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे आपल्या घरातील स्वयंपाक घर आणि देवघर. आज आपण जाणून घेणार आहोत की, स्वयंपाक घरात वास्तू शास्त्रानुसार कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी व कोणता मंत्र आहे जो भिंतीवर लिहायचा आहे.
जेणेकरून घरातील कुटुंबातील सदस्य त्यांचे स्वास्थ्य आणि त्यांचे आरोग्य चांगले राहील निरोगी राहील. तसेच त्यांच्यामध्ये जिव्ह्याळ्याचे प्रेमाचे संबंध टिकून राहील पहिली गोष्ट घरात भांड्यांचा शक्यतो कमीत कमी आवाज होईल असा प्रयत्न करा.
बऱ्याच घरात भांड्यांची आदळआपट चालू असते जितका भांड्यांचा आवाज कमी होईल तितका त्रास घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश कमी होईल व सकारात्मक ऊर्जा वाढेल भांड्याच्या आवाजातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पुढची गोष्ट घरातील गृहिणीने स्वयंपाक करताना आपले तोंड पूर्व दिशेला केले पाहिजे.
असे केल्यास त्यामध्ये एक प्रकारची गोडी निर्माण होते. सूर्यनारायणाचे तेज त्या स्वयंपाकात निर्माण होते असा स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीही तेजवान होतात शास्त्रात असे सांगितले आहे की, पूर्व दिशेला तोंड करून जो व्यक्ती जेवतो त्या व्यक्तीला दीर्घायुष्य मिळते. जेवायला बसल्यावर शक्यतो काही बोलू नका.
मौन व्रत धारण करा असे केल्याने त्या व्यक्तीच्या सर्व इंद्रियात प्रसन्नता व मनःशांती लाभते. स्वयंपाक घरात हा मंत्र भिंतीवर नक्की लिहा. मंत्र काही असा आहे ॐ अन्नपूर्णा देवताय नमः स्वयंपाक करताना हा मंत्र जपत राहायचा आहे.
या मंत्राचा खूप मोठा महिमा आहे. हा उपाय हळदी कुंकवाने स्वयंपाक घरातील भिंतीवर करायचा आहे. अन्नपूर्णा देवीचा वरदहस्त राहतो. यामुळे तुमच्या घरात अचानक कितीही पाहुणे आले तरी अन्न कधीही संपत नाही कमी पडत नाही.
पुढची गोष्ट स्वयंपाक घरातील शेगडी चूल आणि पाण्याचा साठा यामधील अंतर जास्त असावे यामुळे घरात कलह निर्माण होतात अशी काळजी नक्की घ्या त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य सर्वकाही नांदेल
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.