कार्तिक महिन्यातील 5 चमत्कारी दिवस, एकादशी ते पौर्णिमा, जे मागाल ते मिळेल.

नमस्कार मित्रांनो,

कार्तिक महिना एक दिव्य महिना पावन महिना म्हणून ओळखला जातो. या कार्तिक महिन्यातील दिव्य आणि चमत्कारी 5 दिवस म्हणजेच देव उठणी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंतचे हे 5 दिवस हे पूर्ण वर्षासाठी एवढे महत्त्व पूर्ण आहे की, या 5 दिवसात तुम्ही होम हवन, यज्ञ पूजा पाठ, दानधर्म यातील काहीही 1 कराल तर त्याच्या कितीतरी पटींनी लाभ आणि फळ हे आपल्याला मिळणार आहे. आणि हे पुण्यकर्म आपलं स्वर्गलोकी संरक्षित केले जाणार आहे.

कार्तिक महिन्यातल्या या 5 दिवशी जो कोणी दानधर्म करेल, पूजापाठ करेल त्यांना स्वयम् भगवान विष्णु हे मोक्ष प्रदान करत असतात. जर पूर्ण कार्तिक महिन्यात तुम्ही काही पूजाकर्म केलेले असेल किंवा नसेलही केलेलं तरीही फक्त हे 5 दिवस तुम्ही मी सांगितलेलं कार्य केलं तर तुमचं अवघे जीवन याने पलटून जाणार आहे. तुमचं भाग्य देखील याने उजळणार आहे. तर आजच्या या माहितीमध्ये आपण पाहणार आहोत की, या दिव्य 5 दिवसांमध्ये म्हणजेच देव उठणी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत काय उपाय केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची असीम कृपा आपल्यावर राहणार आहे.

तुम्हाला देव उठणी एकादशीपासून याला सुरुवात करायची आहे. प्राप्तक काली अगदी सकाळी लवकर उठून तुम्हाला कोणत्याही एका पवित्र नदीत जाऊन आंघोळ करायचे आहे. बऱ्याच जणांना शहरी भागातील शक्य नसतं तर अशा व्यक्तींनी सकाळी उठून गंगाजल पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ आंघोळ करायचे आहे.

या स्नानाने तुम्हाला पूर्ण वर्षांमध्ये केलेल्या आंघोळ एवढा पूर्ण पुण्य मिळणार आहे. पण आंघोळ करताना विष्णूच्या मंत्राचा जप करा. विष्णु मंत्र, गायत्री मंत्र, लक्ष्मी मंत्र यापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्ही सतत जप करत राहा. ज्यांचे लग्न होत नाहीत खास करून मुलींसाठी ज्या मुलींची लग्न होत नाहीत त्यांनी या 5 दिवसात एक खास उपाय करायचा आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्ही तुळशी मातेला सजवायच आहे, तिला साज-शृंगार चढवायचा आहे, तिची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तिला प्रदक्षिणा घालायची आहे.

आणि पूजा झाल्यानंतर पूजा पूर्ण केल्यानंतर हा जो चढवलेला शृंगार आहे तो एखाद्या मंदिरात जाऊन तुम्हाला दान करायचा आहे. या छोट्याशा उपायाने त्या मुलीचा विवाह याने नक्कीच होणार आहे. जर काही कारणास्तव या दिवशी तुम्हाला हा उपाय करता आला नाही तर या पुढील 5 दिवसांमध्ये कधीही तुम्ही एका तुळशी देवतेला कुंकू लावून तिच्या चरणी नतमस्तक होऊन जे तुळशीचे रोप आहे ते तुम्हाला दान करायच आहे.

म्हणजे तुळशीचे 1 रोप घ्यायच आहे. तिला कुंकू लावायच आहे, तिला नतमस्तक होऊन त्यानंतर हे रोपटं तुम्हाला एका मंदिरात जाऊन दान करायचा आहे. तर मंदिरात दान देऊ शकत नसाल तर एखाद्या व्यक्तीला, स्त्रीला कोणालाही ये तुलसीच्या रोपट्याचं दान करायच आहे. 1 रोपटं, 2 रोपटं तुम्हाला जितके देता येतील तेवढ्या रोपट्यांच दान तुम्हाला या 5 दिवसांच्या आत करायचं आहे.

तुलसी दान केल्याने त्या मुलीचा विवाह नक्की होईल. तसेच या 5 दिवसांमध्ये आकाश दीपदानच देखील खूप मोठे महत्त्व आहे. या कार्तिक महिन्यात आकाश दीपदानच खास महत्त्व आहे. यासाठी तुम्हाला पिठाचे दिवे तयार करायचे आहेत. पिठाचे दोन दिवे तयार करा. हे दिवे प्रज्वलित करून उंच आकाशाकडे त्यांना वरती तुम्हाला धरायचा आहे. आणि मनातल्या मनात या दिव्याप्रमाणे माझं जीवन कायम उज्वल असू दे, प्रकाशमय असू दे अशी भगवान विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे.

त्यानंतर हे दिवे जिथे तुम्ही प्रार्थना केली आहे अगदी तिथेच खाली ठेवून द्यायचे आहेत. या दानाला म्हणतात आकाश दीपदान. अगदी सोपी क्रिया आहे पण या एका आकाश दीपदानाने तुमचं अवघे आयुष्य बदलून जाणार आहे. तुम्ही जर अशा प्रकारे आकाश दीपदान करू शकत नसाल तर तुम्ही नदी, सरोवर किंवा मंदिरामध्ये देखील अशाप्रकारे आकाश दीपदान करू शकता. जर एखाद्या मुलाचं लग्न होत नसेल तर त्याने या दिव्य 5 दिवसांमध्ये एक छोटासा उपाय करायचा आहे. ज्या मुलाचं लग्न होत नाही त्यांनी एखाद्या कृष्ण मंदिरांमध्ये जाऊन एक बासरी तिथे दान करायचे आहे.

आणि त्यानंतर तुळशी मातेसमोर येऊन नतमस्तक होऊन तुळशी मातेला आपल्या मनातील व्यथा सांगायचे आहे. थोडक्यात तुम्हाला तुळशीमातेशी संवाद साधायचा आहे. लग्न आणि पैशाची जर अडचण असेल तर तुलसी माता अगदी काही क्षणातच आपली ती अडचण दूर करते. परंतु त्यासाठी आपल्याला तुळशी मातेची संवाद साधायचा असतो. तसेच या 5 दिवसात तुम्हाला माता तुळशीची कथा कुठे ऐकायला मिळाली तर ती तुम्ही नक्की ऐका. कोणाच्या तोंडून ऐका किंवा मोबाईलवरती ऐका.

कुठेही जिथून तुम्हाला उपलब्ध होईल त्या ठिकाणाहून तुम्ही तुळशीची कथा या 5 दिवसांमध्ये नक्की ऐका. पहा याच पुण्य तुम्हाला नक्की लाभेल. अस म्हणतात की, या 5 दिवसांमध्ये तुलसी मातेच्या नामस्मरणाबरोबरच तिची कथा जर आपण ऐकली तर आपल्या आयुष्यातील खूप सारे अडचणी याने कमी होतात, आपल्या पापांचे क्षालन होतं आणि आपलं भाग्य हे याने उजळत. तर अशा या दिव्य आणि च म त्का रि क 5 दिवसांमध्ये हे छोटेसे काही उपाय करून पहा. नक्की तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला याने फायदा होणार आहे.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *