नमस्कार मित्रांनो,
नमस्कार माझ्या सर्व प्रेमळ स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. हा अनुभव श्रद्धा रामदास डिचोलकर या स्वामी सेवेकरी ताईंचा आहे आणि ते मालवण येथे राहतात. त्या ताई सांगतात मी स्वामींची भक्त आहे. स्वामींनी मला व माझ्या कुटुंबाला बरेच अनुभव दिले.
त्यातील एक प्रचिती अशी घरातील गॅस सिलेंडर संपलेला होता. नंतर मी जेवण स्टोवर करायचे ठरवले. पण रॉकेलही घरात नव्हते म्हणून मी मिस्टरांना पेट्रोल पंपावरून डिझेल आणायला सांगितले. मिस्टरांनी पेट्रोल पंपावरून डिझेल मागितले पण त्यांनी पेट्रोल बाटलीमध्ये भरून दिले.
घरी आल्यावर त्या बाटलीमध्ये पेट्रोल आहे की, डिझेल हे कोणीही चेक केले नाही. आणि बाटलीचा कलर हिरवा असल्याने ते कळे नव्हते. त्यानंतर आमच्या देव घराच्या बाजूलाच एक ओटा आहे त्यावर मी तो स्टो ठेवला होता. देवघरात स्वामींची मूर्ती आहे. ते जे काही घडते ते सर्व काही बघत होते.
मी मिस्टरांना स्टोमध्ये डिझेल भरण्यास सांगितले. मिस्टरांचाही लक्ष नव्हते व माझेही लक्ष नव्हते. हॉलमध्ये माझा मुलगा झोपलेला होता व मुलगी तिची कामे करत होती. मिस्टर स्टोमध्ये पेट्रोल भरतील एवढ्यात माझा मुलगा जो झोपलेला होता तो उठून ओट्यापाशी आला आणि म्हणाला थांबा.
त्यांनी मिस्टरांच्या हातातील बाटली आपल्या हातात घेतली वास घेऊन बघतो तर काय त्यामध्ये डिझेल नाही तर पेट्रोल होते. ते त्याला कळले जर स्वामींनी त्यावेळी त्याला बुद्धी दिली नसती तर स्टोमध्ये भरलेल्या पेट्रोलचा मोठा स्फोट झाला असता. जिथे हा प्रकार घडला तिथेच देवघरात स्वामींची मूर्ती होती व ते सगळं काही बघत होते.
मी खरच स्वामींची खूप ऋणी आहे की, त्यांनी मला व माझ्या कुटुंबाला या मोठ्या संकटातून वाचविले. मी माझा मुलगा व मुलगी आणि मिस्टर स्वामींची सेवा करतो. स्वामी आम्हाला असेच अनुभव आजही देत आहेत. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.