नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी प्रिय भक्त हो स्वामींच्या अनुभती एका शहरात प्रतिष्ठित कुटुंब होते. या कुटुंबातील डॉक्टर असलेले सासरे रुग्णांची सेवा करत आणि अशाच एके दिवशी सेवा करत असताना त्यांना कोरणाची लागण झाली.
आणि हळूहळू सर्व कुटुंबाला याने विळख्यात घेतले. चांगले उपचार घेण्यासाठी दीनानाथ मंगेशकर या पुण्यातील नामांकित दवाखान्यामध्ये सासरे व पती यांना उपचारासाठी एडमिट केलं. ताई घरीच राहून बरी झाली. आपल्या पतीला व सासऱ्यांना रोज डबा घेऊन ताई दवाखान्यात जात.
ताई या स्वामींच्या निस्सीम भक्त म्हणुन ताईंची मनापासून स्वामी महाराजांची सेवा चालू होती. अखंड जप चालू होता रोज रात्री मानस पूजा करून त्या महाराजांना सोबत चला असं म्हणून दवाखान्यात जायाच्या. आपल्या पतीचा होणारा त्रास त्या पाहु शकत नव्हत्या.
त्यांना शांत झोप लागावी असं त्या महाराजांना विनंती करायच्या. ताईंचा रोजचा हा दिनक्रम सुरू होता. त्यांची सेवा फळाला आली पती व सासरे ती कोरोना मुक्त होऊन घरी आले. घरी आल्यावर ताईंच्या पतीने ताईंना सांगितले कि, रोज रात्री स्वामी समर्थ महाराज माझ्या जवळ येऊन मला शांत झोप असं म्हणत व “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असेही म्हणत.
गुरुदेव दत्त असा आवाज कानावर यायचा व मला झोप लागायची. हे ऐकताच ताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि नकळत महाराजांच्या कडे केलेली मागणी महाराज पूर्ण करतात. व भक्तांच्या हाकेला धावून येतात. याचा अनुभव ताईना आला होता. ताईने महाराजांना मनापासून नमस्कार केला. हम गया नही जिंदा है हे महाराजांनी भक्तांना दिलेले वचन पूर्ण केले होते.
आज या महामारीत आपण सुरक्षित श्वास घेऊन आजही आपण जिवंत आहोत. याला फक्त आणि फक्त महाराजांचीच केलेली सेवा आहे. ज्या घरात महाराजांचे अस्तित्व आहे त्या घरावर महामारीचा कुठलाच वाईट परिणाम होणार नाही ही मनापासून श्रध्दा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या भक्तांना आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.