कमी वयात होणारी केसगळती रोखण्यासाठी खास सोपे उपाय, मजबूत होतील केस

नमस्कार मित्रांनो,

आजकाल केवळ महिलाच नाही तर पुरूषांनाही केसगळतीची समस्या होऊ लागली आहे. शरीरात पोषक तत्वांची कमतरता, केसांची योग्य काळजी न घेणे, हार्मोनल बदल, तणाव, प्रदूषण, आनुवांशिकता आणि औषधांचं अधिक सेवन ही पुरूषांची केसगळतीची मुख्य कारणं आहेत.

आधी वाढत्य वयात केसगळती व्हायची. पण आता कमी वयातही तरूणाना केसगळतीचा सामना करावा लागत आहे. अशात केसांची अधिक काळजी घेणं महत्वाचं ठरतं. त्यासोबतच योग्य आहार, ऑयलिंगही गरजेचं आहे.

आम्ही तुम्हाला केसगळी रोखण्यासाठी काही टिप्स देत आहोत. केसगळती एक अशी स्थिती आहे ज्यात केस वेगाने जातात. हे गेलेले केस पुन्हा येत नाहीत. म्हणजे हेअर लॉस पुरूषांमध्ये टक्कलचं कारण बनतात. त्यामुळे केसगळती थांबवणं गरजेचं आहे.

केसगळती ही जगभरातील लोकांना भेडसावणारी एक गंभीर समस्या आहे. महिलांसोबतच आता कमी वयाच्या जास्तीत जास्त पुरूषांना केसगळतीच्या समस्येचा सामना करावा लागतोय. जास्त काळ टोपीचा किंवा हेल्मेटचा वापर केल्यानेही हेअर लॉसची समस्या होते.

१) केस माइल्ड शाम्पूने धुवा – केस नियमितपणे धुतल्याने केसगळती थांबवली जाऊ शकते. याने केस आणि डोक्याची त्वचा म्हणजे स्कॅल्प स्वच्छ होते. याने हेअर लॉस थांबते. केस धुण्यासाठी तुम्ही माइल्ड शाम्पूचा वापर करू शकता. केस धुतल्याने संक्रमण आणि डॅंड्रफची समस्याही कमी होते. याने केस तुटणं कमी होतं आणि मजबूत होतात.

२) केसगळती रोखण्यासाठी व्हिटॅमिन – केसगळती रोखण्यासाठी व्हिटॅमिनची फार गरज असते. व्हिटॅमिन केसांसोबत आरोग्यासाठीही चांगले असतात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी केसांसाठी गरजेचे असतात.

३) केसांसाठी प्रोटीनही गरजेचं – ज्याप्रमाणे केस हेल्दी ठेवण्यासाठी प्रोटीन गरजेचं असतं. त्याचप्रमाणे केस मजबूत ठेवण्यासाठीही प्रोटीन गरजेचं असतं. जर तुमचे केस गळत असतील तर तुम्ही डाएटमध्ये प्रोटीनचा समावेश केला पाहिजे. यासाठी सोया प्रॉडक्ट आणि दूधाचा समावेश आहारात करा.

४) ऑयलिंग करणंही गरजेचं – केस मजबूत करण्यासाठी त्यांची मालिश करणं गरजेचं असतं. तेलाने डोक्याची मालिश करायला हवी. ऑयलिंग केल्याने केस मजबूत होतात. यासाठी तुम्ही बदाम, तीळ, लॅव्हेंडर तेलांचा वापर करू शकता.

५) ओल्या केसांवर कंगवा फिरवू नका – कमी वयातच केसगळती होत असेल तर ओल्या केसांवर कंगवा फिरवणं बंद करा. ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवल्याने केस कमजोर होतात. अशात केस गळण्याची शक्यता जास्त असते. केस सुरक्षित ठेवण्यासाठी ते सुकल्यावरच कंगवा फिरवावा.

६) कांद्याचा रस फायदेशीर – केस मजबूत ठेवण्यासाठी कांद्याचा रस फायदेशीर असतो. यासाठी तुम्ही लसूण, कांदा आणि आलं यांचा रस काढा. हा रस डोक्याच्या त्वचेवर मालिश केल्यासारखा लावा. रात्रभर हा रस तसाच राहू द्या आणि मग सकाळी केस धुवा. काही दिवस हा उपाय केल्याने केस मजबूत होती.

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *