नमस्कार मित्रांनो,
स्वामी भक्तहो जर तुम्हाला स्वामी समर्थांचे ही माहिती आवडत असतील आणि स्वामींवर तुमची निस्सीम श्रद्धा असेल तर ही माहिती नक्की शेअर करून लाखो इतर स्वामी भक्तांनापर्यंत पोहोचवा श्री स्वामी समर्थ यापुढील अनुभव सेवेकरांच्या शब्दात मी तुम्हाला सांगत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनेच आज मी जिवंत आहे.
स्वामींनी मला बुद्धी दिले की, मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा. मी आज जिवंत आहे आणि मोठ्या बिकट प्रसंगामधून फक्त स्वामींचे सेवेकरी असल्यामुळे वाचलो. याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. काही दिवसापूर्वीचा प्रसंग लॉकडॉनमुळे घरात अडकून पडलेलो. थोडेसे वैतागलेले दिवस जात होते. शांती मिळायची ती श्री स्वामींचे नामस्मरण करण्यामुळेच.
स्वामींच्या कथांची काही पुस्तके मी वाचून काढली. मासिक तर होतेच सेवेमध्येही वेळ घालवला आणि मंत्रोच्चार देखील करायला लागलो. एकंदर या लॉकडावूनमुळे मला स्वामींची तुलनेने अधिक सेवा करण्याचे भाग्य मिळाले. काही दिवसापूर्वीचा प्रसंग आहे मी पहाटे बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेलो होतो. थोडेसे अंधारलेले होते मी आंघोळ सुरू केली होती की, लाईट गेली लाईट गेली. लाईट गेली आणि त्याच वेळी काही न दिसल्यामुळे माझा पाय घसरला.
आणि मी पडायला लागलो पडताना माझ्या हाताला गिझर लागले आणि माझे दुर्दैव म्हणून अगदी त्या क्षणी लाईट परत आली. बाथरूमच्या गिझरमध्ये करंट उतरलेला होता मला जबरदस्त शॉक बसला. मी मोठ्या मोठ्याने ओरडत होतो म्हातारी आई आणि बायको दोन्ही बाथरूमकडे धावले आणि बाथरूमच्या दाराला धडका देत होत्या. पुढचे पाच मिनिटे मला काहीही कळत नव्हते.
जेव्हा मी उठलो तेव्हा दरवाजा उघडला होता आणि मला उचलून नेत होते आणि नेणाऱ्या माणसांमध्ये मला स्वामींचे रूप दिसत होते. थोड्या वेळाने जेव्हा मी पूर्ण समजण्याचे स्थितीत आलो तेव्हा आईने मला सांगितले की, नेमके काय झाले हे आम्हाला कळत नव्हते. आम्ही दोघी बाथरूमच्या दाराला धडका देत होतो पण अचानक मेन लाईट वरून आपल्या घराची वायर खाली तुटून पडली.
तिथे थोडा आवाजही झाला मी दोघींना विचारले अजून कोणीतरी तुमच्यासोबत मला उचलायला होते का ते कुठे आहेत?
तेव्हा दोघी आश्चर्याने एकमेकांकडे पाहत होत्या. असा कोणीही कधीही घरात आला नव्हता जेव्हा मी त्यांना सांगितले की, मला स्वामी दिसले तेव्हा माझ्या बायकोने धावत जाऊन स्वामींपुढे साखर ठेवली.
खूप मार लागूनही मला दवाखान्यात न्यावे असे काही झाले नव्हते. त्या दिवशी माझा काळ आला होता लाईट जाणे अगदी त्याचवेळी माझा हात गिझरला लागणे, अगदी त्याक्षणी लाईट परत येणे आणि मुख्य म्हणजे अगदी त्याच वेळी त्या गिझरमध्ये करंट उतरणे यमाने मला येण्याचे पूर्ण योजना बनवली होती. पण स्वामींनी यमाच्या रेड्याना थोपवले आणि त्यालाही पळवले.
अशक्य ही शक्य करतील स्वामी काळालाही पुरून उरतात ते स्वामी. उगाच मला त्या क्षणी स्वामींनी का दर्शन द्यावे? स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मी आज जिवंत आहे आणि स्वामींची सेवा यापुढेही करत राहणार आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.