काहीच कमी पडणार नाही | रोजच्या जीवनात हे ज्ञान खूप फायद्याचे ठरेल |

नमस्कार मित्रांनो,

व्यवहारात वापरले जाणारे काही सामान्य ज्ञान कोणते? घराला कोणाशी बोलताना उच्च स्वरात बोलू नये. स्वयंपाक करताना अथवा जेवणं करताना मन नेहमी प्र स न्न असावे. घरातील वस्तु संपण्या अगोदर दोन दिवस आणून घ्यावी. घरातील वस्तू, कपडे, भांडी वेळचे वेळी जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवावी.

कोणाची उधारी बुडवू नये, रोजच्या रोजहिशोब लिहिण्याची सवय असावी. दोन व्यक्ती बोलत असताना मध्येच बोलू नये, समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांत ऐकून मग आपले म्हणणे मांडावे. घरी येणाऱ्या लोकांशी नेहमी हसून बोलावे आदरातिथ्य करावे, तिन्हीसांजेला घरात धूप, दीप लावून वातावरण प्र स न्न करावे. एखाद्या व्यक्तीची स्तुती सर्वांसमोर करावी पण दोष एकांतात सांगावे.

लोकांच्या वापरायला घेतलेल्या वस्तू लगेच न विसरता परत कराव्यात विसरलो म्हणून कारणे देऊ नये. एखाद्या व्यक्तीला फोन फक्त दोनदा करा पुन्हा करू नका. त्याच्या फोनची वाट पहा, त्याला जाब विचारू नये. कोणाला मुद्दाम त्याच्या त्रुटी विषयी विचारू नये, स्वतःच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करू नये.

स्वतःची स्तुती स्वतः करू नये, बढाया मारू नये, दुसऱ्याला अपमानास्पद बोलू नये. आई, वडील यांचा नेहमी आदर व घरातील महिलांचा नेहमी सन्मान करावा. आपल्याच मुलांच्या समोर स्वतःची वागण्याची पद्धत चुकीची होऊ नये याची काळजी घ्यावी. आपले वय मर्यादा, कर्तव्य यावर लक्ष देऊन राहणीमान व बोलणे असावे उगाच स्वतःची किंमत करू नये.

नेहमीच दुसऱ्याला काही मागू नये, दुसऱ्याचेच खाऊ नये, आपण ही तितकाच खर्च करावा जो समोरच्या व्यक्तीने आपल्यासाठी केला आहे. प्रवासाला जाताना कोणाही अनोळखी व्यक्तींसमोर घरच्या गोष्टी, व्यवहार, पत्ता, मोबाईल नंबर, घरातील कौतुक सांगू नये. मुलांशी मित्रत्वता असावी पण फाजीलपणा नको आपण आई अथवा बाप आहोत याचे भान ठेवूनच.

घरातील वाद, मतभेद चार भिंतींच्या आत, एखादी गोष्ट पटली नाही आवडली नाही तर त्यासाठी आकांडतांडव न करता समजून सांगावी. स्वतःचा मूळ स्वभाव दर्शन कधीतरी एकदा उपयोगात आणावे जेणेकरून आजूबाजूच्या व्यक्ती आपला गैरफायदा घेणार नाही टिंगल टवाळी करणार नाहीत.

मुलांना संस्कार आपल्या वागण्यातून मिळत असतात. तेव्हा घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी स्वतःचा व्यवहार, बोलणे पारदर्शक ठेवावे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *