ज्यांना असं वाटतं स्वामींचं आपल्यावर लक्षच नाही त्यांनी नक्की हा अनुभव पहा.

नमस्कार मित्रांनो,

श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आज मी तुम्हाला सचिन प्रकाश लोटणकर या दादांचा अनुभव सांगण्यास सुरुवात करते. या दादांचा अनुभव त्यांच्याच शब्दात आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार माझं नाव सचिन प्रकाश लोटणकर मी पनवेल येथून आहे. आज मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे. माझ्या वडिलांच्या एका किडनीची ट्रीटमेंट चालू होती. माझे वडील लवकरात लवकर यातून बाहेर पडावे यासाठी मी डॉक्टरांनी जेवढ्या ट्रिटमेंट सांगितल्या तेवढ्या सगळ्या केल्या होत्या.

परंतु त्याने माझ्या वडिलांच्या तब्येतीत जरा देखील सुधारणा होत नव्हती. अखेर डॉक्टर म्हणाले की, बायपास करावे लागेल. पण मला जरा शंका येत होती. कारण आधीच येवढ्या सगळ्या ट्रीटमेंट करून खूप खर्च झाला होता. आता अजून खर्च करणे मला शक्य नव्हते. म्हणून माझ्या मनात विचार आला की आपण एकदा जेजे हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप केला पाहिजे. कारण कारण मागच्या वेळेस माझ्या वडिलांच्या पायाचे ऑपरेशन याच हॉस्पिटलमध्ये झाले होते.

पण सध्या लोकल ट्रेनस बंद असल्या कारणाने आम्ही या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नव्हतो. म्हणून आम्ही असा विचार केला की, ज्या वेळेस ट्रेन सुरू होतील त्या वेळेस आम्ही जे जे हॉस्पिटलमध्ये जाऊ. पण कसले काय मेडिसिनमुळे माझ्या बाबांना ॲसिडिटीचा त्रास सुरू झाला होता. म्हणून आम्ही त्यांना लोकल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी मी डॉक्टरांना डिस्चार्ज द्यायला सांगितले. त्यावेळेस ते आम्हाला बोलले की, तुमच्या वडिलांच्या किडनीवर ताण आला आहे.

त्यामुळे आम्ही तुम्हाला एका डॉक्टरांचे नाव सांगतो त्या डॉक्टरांना जाऊन तुम्ही भेटा. आमचं त्यांच्याशी बोलणं झालेला आहे. मात्र स्वामी कृपेमुळे तेव्हा आमच्या असे लक्षात आले की, येथे फक्त माणसांना लुबाडण्याचे कामा डॉक्टर करतात. कारण डॉक्टरांनी जास्त सलाईन दिल्यामुळे त्यांच्या बॉडीत पाणी झाले आणि आता जर आम्ही या डॉक्टरांची ट्रीटमेन्ट घेतली तर अजून खर्च होईल. पण त्याचबरोबर माझ्या वडिलांच्या शरीरावर देखील घातक परिणाम होईल.

आता मला वडिलांच्या तब्येतीकडे हलगर्जीपणा करून चालायचे नव्हते. म्हणून मी त्यांना ताबडतोब ॲम्बुलन्सने जे जे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. इथूनच आमची खरी परीक्षा सुरु झाली. तिथे गेल्यावर असे कळले की, पेशंटची कोविड टेस्ट करावी लागेल. माझ्या वडिलांचे एक्सरे काढले. तेव्हा डॉक्टर बोलले की, तुमच्या वडिलांना भरपूर कप झाला आहे. त्यामुळे कोरोना असू शकतो. त्यावेळेस आम्ही खूप घाबरलो होतो. मात्र स्वामींचे नामस्मरण सतत चालूच होते.

पण तरीदेखील जराशी भिती वाटत होती. कारण बाबांचा रिपोर्ट पॉ झि टि व्ह आला तर आम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावे लागणार होते. आणि आमच्या कोणामध्ये दुसऱ्या हॉस्पिटलला जाणे इतकी क्षमता उरली नव्हती. आम्ही सतत स्वामींचा धावा करत होतो आणि स्वामी तर आपली आईच आहे ना मग ती आपल्या लेकरांच्या हाकेला धावून कशी येणार नाही. स्वामी कृपेने माझ्या वडिलांचा रिपोर्ट नि गे टि व्ह आला. मी स्वामींचे खूप आभार मानले. आता माझ्या वडिलांची तब्येत खूप सुधारणा झाली.

आमची खूप दखदख झाल्यामुळे मी आणि माझा लहान भाऊ आम्ही दोघांनी घरी जाऊन थोडा आराम करू असं ठरवलं. माझ्या वडिलांचे अजून दोन रिपोर्ट यायचे होते म्हणून आम्ही माझ्या दुसऱ्या भावाला हॉस्पिटलमध्ये राहायला सांगितले. माझ्या चुलत भावाचे घर आमच्या घरापासून 6 किलोमीटरवर होते. मी खूप दमलो होतो त्यामुळे त्याला त्याच्या घरी नेऊन सोडण्याची ताकद माझ्यात उरली नव्हती. तसं तर मी एक कॅब बुक केली होती पण एवढ्या लांब त्याला एकटाच कस पाठवन मला योग्य वाटत नव्हतं.

तसं तर काय आणू स्वामी आपल्यावर लक्ष ठेवून असतात. त्यावेळी देखील स्वामींना माझी तळमळ समजली आणि तेच माझ्या मदतीला धावून आले आणि आम्ही जी कॅब बुक केली होती त्या गाडीचा ड्रायव्हर हिंदू होता आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट तो आमच्या गावाकडचाच होता. मी सुटकेचा श्वास सोडला. आम्ही तिथून घरी जाण्यास निघालो मी घरी पोहोचलो. नंतर माझा भाऊ देखील घरी पोहोचला का याचीही मी चौकशी केली. मग जरा फ्रेश होऊन स्वामींचे नामस्मरण केले आणि झोपी गेलो.

दुसऱ्याच दिवशी जेव्हा मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा मला असे समजले की, माझ्या बाबांचे दोन्ही रिपोर्ट नि गे टि व्ह आले. एवढेच नाही तर आम्ही बाबांचे जे ट्रीटमेंट करायला आलो होतो ते ट्रीटमेंट द्यायला देखील डॉक्टरांनी सुरुवात केली होती. ज्या दिवसापासून माझ्या वडिलांची ट्रीटमेंट सुरू झाली होती त्या दिवसापासून मला सतत आतून एक आवाज येत होता भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अखेर त्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस उगवला. डॉक्टर येऊन मला म्हणाले की, तुमचे वडील आता ठीक आहेत. हे ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला.

आता माझे बाबा डॉक्टरांनी दिलेल्या मेडिसिन रोज वेळेत घेऊन अतिशय सुंदर आयुष्य जगत आहेत. आणि हे सगळं स्वामींमुळे शक्य झाले आहे. स्वामींचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. माझा हा अनुभव त्या लोकांना जास्त कळेल ज्यांनी आपल्या जवळच्या माणसांना इमर्जन्सी वॉर्डमधून अगदी सुखरूप येताना बघितला आहे. खरं तर माझा रियल इस्टेट म्हणून शेअर मार्केटचा बिजनेस आहे. परंतु त्या बिजनेसमध्ये मला फारसा नफा होत नव्हता. माझा बिजनेस सुरळीतपणे चालावा म्हणून मी देवाकडे साकडे घातले होते.

पण त्याचा देखील काहीच उपयोग झाला नाही सुरुवातीला माझा बिजनेस निट चालत नव्हता. म्हणून मी नेहमी स्वामींना दुषणे देत बसायचं. मला असं वाटायचं की, स्वामींचा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबांवर अजिबात लक्ष नाही मात्र जेव्हापासून मी स्वामी सेवेत आलो तेव्हापासून माझ्या मनात न का रा त्म क विचार येतच नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आता कोणतीही चुकीची गोष्ट करण्याची इच्छा सुद्धा होत नाही.

आता मला माझ्या व्यवसायाची अजिबात काळजी वाटत नाही. कारण जे काय होईल ते स्वामींच्या कृपेने चांगलं होईल असा माझा विश्वास आहे. मी एका ज्योतिषाकडे जात होतो तेव्हा ते मला नेहमी असाच सांगायचे की, तुमच्या नशिबात राज योग नाही. पण आता मला या गोष्टीची खंत वाटत नाही. कारण माझे माय बाप या ब्रह्मांडाचे राजे आहेत. त्यामुळे ते मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू देणार नाहीत असा माझा पूर्ण विश्वास आहे.

आता फक्त एवढेच आहे की, अक्कलकोटसारख्या पुण्यभूमीवर जाऊन प्र त्य क्ष स्वामींचे एकदा तरी दर्शन घडावे. आणि भक्तीत एकरूप झालेल्या कुरुणदास यांच्या चरणाच्या धुळी एवढी जरी भक्ती आमच्याकडून आमच्या स्वामीरायाची झाली तरी आमच्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे आहे. असा स्वामींचा आ शी र्वा द आणि स्वामींची सेवा प्रत्येक माणसाकडून घडावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *