नमस्कार मित्रांनो,
स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत येण्यापूर्वी अनेक तीर्थस्थानी पदभ्रमंती करत. अनेक भक्तांचा उद्धार करत होते. आता स्वामी महाराज गिरनार पर्वतावर आले होते. या गिरनार पर्वताची काय वर्णन करावे? जेथे मुनी योगीव्रती तपी ! भक्त विरागी अनुष्ठानी जपी !! रोगी दुःखी त्रिविधतापी ! स्वकार्यार्थी वसती ते !! ब्रम्हचारी संन्यासी गृहस्थ ! साधू संत महंत वानप्रस्थ !! व्हावसायी पूर्ण मनोरथ ! येति समस्त रावरंक !!
अशा निसर्गरम्य रमणीय असलेल्या आपल्या पूर्व स्थानी श्री दत्तगुरु स्वामी महाराज प्रकट झाले. तेथे स्वामी महाराज हनुमान धारीजवळ वास्तव्य करत होते. अनेक लोक स्वामींना बघत होते परंतु तेथे एका पांगळ्याची नजर स्वामींवर पडते. स्वामींना बगताच का कोणास ठाऊक त्यांच्या मनात अनन्य भक्तीची भावना जागृत होते. हे कोणी साधेसुधे संन्यासी नसून प्र त्य क्ष दत्त महाराज आहे असा भाव त्यांच्या हृदयातून येत होता.
आणि स्वामींना वंदन करण्याची त्याला तीव्र इच्छा होती. परंतु तो पांगळा असल्याने तो जगचा हलू शकत नव्हता. आणि तो बसल्या जागेवरून तो स्वामींना प्रार्थना करू लागतो. हे परमेश्वरा लोक अज्ञानवश आपल्याला ओळखत असो वा नसो. पण मला माहित आहे की, आपण नि:संशय प्र त्य क्ष दत्त महाराज आहात. मी जन्मापासून पांगळा आहे, मी अनाथ आहे, मला धड अन्न पाणीही मिळत नाही.
देवदर्शनाची इच्छा असूनही द र्श न घेता येत नाही. हेच बघाना आता मला तुमचे चरण द र्श न घेण्याची इच्छा आहे पण मी जागचा हलू शकत नाही. माझे पाय हलत नाही, मला चालता येत नाही आता मी काय करू? स्वामी भक्तहो स्वामी महाराज प्रेरणेचे स्तोत्र आहेत. त्या अपंग व्यक्तीने अशी विनंती करता स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले अरे रडतोस कशाला तुला माझे द र्श न घ्यायचे आहे ना धैर्याने उठ मागेपुढे न पाहता डोळे मिटून माझ्याकडे ये माझ्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेव.
स्वामी भक्तहो हा प्रकार सभोवताली असलेली मंडळी बघत होती. त्यांना वाटले की हे कोणी पोट भरू सन्यासी असतील. हा पांगळा कसला चालतो परंतु त्या पांगळ्याने स्वामींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवला आणि अतिशय धैर्याने हालचाल करण्याचा प्रयत्न करू लागला. आणि चमत्कार घडला त्याच्या पायामध्ये प्राण आले आणि स्वतःच्या पायाने चालत येत त्याने स्वामींचे दर्शन घेतले.
डोळ्यातून आनंदाअश्रू घळाघळा वाहू लागले. कृतज्ञतेच्या भावनेने तो ओतप्रोत भरून गेला हा च म त्का र बघून तेथील मजा बघणारे लोकांनासुद्धा स्वामींची ओळख पटली. स्वामी तर प्र त्ये क्ष दत्त मूर्ती आहेत. हा विश्वास सर्वांना आला आणि ते ही धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून गेली आणि सर्वांनी एक घोषणा स्वामींचा जयजयकार केला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
आजच्या स्वामी वाणीचा बोध अगदी स्पष्ट आहे. आजच्या लिलेतून स्वामी खूप जबरदस्त प्रेरणा देत आहेत. बघा एका अपंगाला स्वामींनी कशी प्रेरणा दिली आणि या प्रेरणेने त्याच्या अंतर्मनातील शक्ती कशी जागृत झाली. आणि या इच्छाशक्तीच्या बळाने विश्वास शक्तीच्या बळाने त्याच्या पायात जीव आला, तो चालू लागला.
आजच्या स्वामी वाणीतून बोध घेता आज जर आपल्याला काही संकट असेल व दुःख असेल व आपल्याला काही तरी ध्येय साध्य करायचे असेल तर स्वामी आपल्याला सांगत आहेत की, अरे उठ रडत बसू नकोस तुझे दुःख दूर व्हावे, तुझे संकट दूर व्हावे, तुझे ध्येय साध्य व्हावे यासाठी लागणारे शक्ती मी तुझ्या अंतर्मनात कधीच दिलेली आहे. स्वामी भक्तहो त्या पांगळ्याने स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि मागचा पुढचा विचार न करता डोळे बंद करून धैर्याने चालू लागला.
अगदी तसेच आपण सुद्धा आपल्या भूतकाळातील कटू अनुभव व आलेले अपयश याचा विचार करू नका व पुढील भविष्यकाळात कसे होईल याची भीती बाळगू नका. उठा तुमची जबरदस्त इच्छाशक्ती जागृत करा. आता या वर्तमानात धैर्याने उभे रहा. तुम्ही स्वामींचे अंश आहात, स्वामींचे बाळे आहात तुमच्या हृदयात स्वामींचेच वास्तव्य आहे हा अतूट आभित्य विश्वास ठेवा. बघा जर तो पांगळा चालू शकतो तर तुमचे संकट दुःख व ध्येय हे साध्य होणे काहीच मोठी गोष्ट नाही.
चला तर मग आजच्या लिलेतून जबरदस्त प्रेरणा घेऊया आणि आपल्या अंतर्मनात दडलेली स्वामी शक्ती जागृत करूया आणि स्वामीना प्रार्थना करूया. हे समर्था आज मला धैर्याचा पाठ शिकवला, इच्छाशक्तीचा पाठ शिकवला तुम्हाला धन्यवाद. मी तुमचाच अंश आहे, तुमचाच बाळ आहे हा आ त्म वि श्वा स दिला तुम्हाला धन्यवाद.
भिऊ नकोस तुम्हाला सर्व काही शक्य आहे. तुम्ही माझ्या पाठीशी आहात ही प्रेरणा दिली स्वामी तुम्हाला धन्यवाद. हे परमपित्या तुम्ही सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही तुमचे मार्गदर्शन असेच आम्हाला लाभो हीच प्रार्थना धन्यवाद स्वामी. अनंत कोटी धन्यवाद स्वामी अनंत कोटी धन्यवाद.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.