नमस्कार मित्रांनो,
स्वामी प्रिय भक्तहो परभणी येथे राहणारे आदिनाथ मोरे या स्वामी सेवेकरी दादांनी त्यांच्या वडिलांना आलेला स्वामींचा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे. ते दादा सांगतात माझे वडील स्वामी महाराजांची सेवा करतात. त्यांचे नाव भगवान मोरे आम्ही सध्या परभणी येथे राहतो. पेंटिंग हा त्यांचा व्यवसाय आहे.
मी जेव्हा लहान होतो तेव्हाचा हा प्रसंग आहे. वडिलांचा पेंटिंगचा व्यवसाय चालत नव्हता. त्यांना समजत नव्हते की, काय करावं पैसे कुठून आणावे. त्यांनी मला व माझ्या आईला मामाच्या घरी पाठवण्याचा निर्णय घेतला. ते दिवसभर पेंटिंगच्या दुकानांमध्ये बसायचे पण ग्राहक येत नव्हते. वडिलांना खूप टेन्शन आलं.
त्यांना वाटलं मी बायको आणि मुलांना सांभाळण्यासाठी काहीच करू शकत नाही. ते खूप नाराज झाले जीवनाला कंटाळे होते. शेवटी त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधी स्वामींचे नाव घ्यावे अशी भावना त्यांच्या मनात आली आणि त्यांनी डोळे मिटून स्वामींचे नाव घेतले.
त्यांच्या डोळ्यासमोर साक्षात स्वामी होते. स्वामी त्यांना म्हणाले मला काळजी आहे तुझी मी बघेल काय करायचे ते असे बोलून स्वामी अ दृ श्य झाले. वडिलांनी डोळे उघडले सा क्षा त स्वामींनी त्यांना द र्श न दिले होते. त्यानंतर वडिलांनी आत्महत्येचा विचार सोडला.
थोड्या दिवसानंतर माझ्या वडिलांना कॉलेजमध्ये एक शिक्षकांची नोकरी लागली. आता आमच्याकडे स्वतःचे घर आहे आणि गाडी सुद्धा आहे. स्वामी मार्ग दाखवत गेले आणि त्या मार्गावर चालण्याचे बळ त्यांनीच दिले. स्वामींच्या कृपेने आता सर्व सुरळीत सुरू आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.