जुन्या झाडूची विल्हेवाट कशी लावावी? हे वास्तूशास्त्राची पद्धत जाणून घ्या.

नमस्कार मित्रांनो,

हिंदू धर्मीय मान्यतेनुसार झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. आपण झाडूच्या वापराने घर स्वच्छ करतो. झाडू कचऱ्यात असलेली अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा घराबाहेर काढून टाकते. त्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो.

वास्तुशास्त्रात झाडू खरेदी करणे, घरात ठेवणे आणि जुना झाडू घरापासून वेगळा करण्यासंबंधी अनेक नियम सांगितले आहेत. झाडू कुठे ठेवायचा, जुन्या झाडूचे काय करायचे आणि कोणत्या दिवशी फेकायचे, कोणत्या दिवशी नाही हे जाणून घेऊ.

जुन्या झाडूचे काय करावे?
जर तुमच्या घराचा झाडू जुना झाला असेल आणि तो तुटला असेल तर तो लगेच घरातून काढून टाकावा. कारण जुना झाडू घरात नकारात्मक ऊर्जा आणतो. तुटलेला झाडू वापरणे टाळा कारण ते घरातील अडचणी वाढवण्याचे काम करते.

जुना झाडू कोणत्या दिवशी फेकून द्यावा?
घरातून जुना किंवा तुटलेला झाडू काढून टाकण्यायासाठी सर्वात योग्य दिवस शनिवार आणि अमावस्या मानला जातो. याशिवाय ग्रहणानंतर आणि होलिका दहनानंतर तुम्ही घरातून तुटलेली आणि जुनी झाडू काढू शकता. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा झाडूने बाहेर पडते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.

जुना झाडू कुठे फेकायचा आणि कुठे नाही?
तुमच्या घरातील जुना आणि तुटलेला झाडू टाकण्यासाठी अशी जागा निवडा जिथे कोणीही त्यावर पाय ठेवू शकणार नाही. झाडू नाल्यात किंवा कोणत्याही झाडाजवळ फेकू नका. झाडू जाळूही नये.

कोणत्या दिवशी झाडू टाकू नये?
गुरुवार, शुक्रवार आणि एकादशीला घराबाहेर झाडू टाकू नये. असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात आर्थिक संकट सुरू होते.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *