जाणून घ्या…स्वामी समर्थ महाराज यांचे…अन्नपूर्णा स्वरूप

नमस्कार मित्रांनो,

स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध असल्याचा प्रत्यत अनेकांना आला आहे. आजच्या काळातही स्वामींचे अनुभव आलेली माणसे हजारोंच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतील. स्वामीकृपेचा कृतकृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात, वागण्यात आल्याचे प्रकर्षाने दिसूनही येते. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून येते.

अनेक कथा, अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नसत, हेच स्पष्ट होते. भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे, हा केवळ विश्वासाचा मंत्र नाही, तर खुद्द स्वामींचा शुभाशिर्वाद आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी अनेकांची आजही श्रद्धा आहे. अशाच एका प्रसंगात भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा रुप धारण केले. स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरुपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते. नेमके काय घडले? जाणून घेऊया…

अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. भारतीय संस्कृती, परंपरांनुसार, घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानले जाते. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाजांनी अशाच एका प्रसंगी सेवेकऱ्यांना प्रसाद भोजन दिले. झाले असे की, कोनाळी गावाच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे १०० सेवेकरी होते.

दिवसभर चालून चालून त्या सर्वांना खूप भूक लागली होती. आणखी काही अंतर थोडे चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले. खुद्द स्वामी आलेत म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामींना फलाहार दिला, पाणी दिले.

स्वामींनी फलाहार ग्रहण केला. मात्र, इतरांच्या भोजनाचे काय? हा प्रश्न सर्वांनाच पडला. तेवढ्यात स्वामी सर्वांना म्हणाले की, त्या आम्रवृक्षाखाली जा. श्रीपाद भटांसह आलेल्या सेवेकऱ्यांना वाटले की, तेथे कोणीतरी जेवण देईल. श्रीपादभटांना मात्र स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती, विश्वास होता.

श्रीपाद भट काही न बोलता त्यातील काही सेवेकऱ्यांना घेऊन आम्रवृक्षाखाली गेले. तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपादभटांनी चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली की, आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती. मात्र, अजून ती आलेली नाहीत. सूर्यास्त होत आला आहे. आता कोणी येईल, असे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करावे.

वृद्ध सुवासिनी महिलेने, शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपादभटांना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपादभट व अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले. श्रीपादभटांनी त्या सुवासिनी महिलेसही स्वामींकडे येण्याचा आग्रह केला. मात्र, तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते, असे म्हणून त्यांनी श्रीपादभटांना पुढे पाठवून दिले. श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यांना जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले, अशी सर्वांची श्रद्धा आहे.

फार थोड्याचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरुपात सर्वत्र पूजन होऊ लागले, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

टीप – या पोस्ट मागचा उद्देश अंध श्रद्धा पसरवनेचा नाही आहे. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

अजून तुम्हाला जे वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट मार्फत नक्कीच कळवा . कारण तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन देत असते .

तसेच आमच्या फेसबुक पेजला ” वायरल मराठी ” याला नक्कीच लाईक करा . जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर पण् नक्कीच करा धन्यवाद. आपले आभारी आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *