नमस्कार मित्रांनो,
नमस्कार आपले सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. स्वामी प्रिय भक्तहो स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा वारसा पुढे चालवणारे आपण लोक. महाराजांच्या अनुभव प्रचिती घेतलेले लाखो लोक इथे आहेत व त्यातले आपण सुद्धा आहोत. तर त्यामधून काही अनुभव निवडून तुमच्या भेटीला मी आणत असते.
जर तुम्हाला वायरल मराठी या फेसबुक पेजवरील माहिती आवडत असेल तर शेअर, कंमेन्ट करायला विसरू नका.
आजचा अनुभव आहे तो वाशिम जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ सेवेकरी महिला ताईंचा अनुभव आहे. गावात ग्राम अभियान अंतर्गत सुरू असलेल्या केंद्रातील ताईंचा परिवार स्वामी सेवेकरी होते व आहेतही. ताईच्या मुलीचे लग्न सण 2019 मध्ये अतिशय मोठ्या आनंदाने संपन्न केले होते.
काहीच दिवसांनी आपली मुलगी आई होणार अशी बातमी कळाली. तेव्हा श्री स्वामींची कृपा म्हणून सर्वांनी स्वामींची खूप खूप आभार व्यक्त केले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. नियमित तपासणी करण्यासाठी डिसेंबर 2020 मध्ये ताई अमरावती येथे डॉक्टरांकडे गेले होत्या. पण डॉक्टरांनी त्यांना सांगितले की,ताईंच्या पोटात ज्या बाळाचा गर्भ आहे.
तो खराब झाला असून त्यांनी या बाळाला जन्म न घालू नये. आणि तो गर्भ लवकरात लवकर काढून टाकावा. अन्यथा मुलीने जर तो गर्भ काढला नाही तर बाळ तर वाचणार नाही. पण आईच्या पण जीवाला धोका निर्माण होईल असे स्पष्ट शब्दात डॉक्टरांनी बजावून ताईला म्हणजेच मुलीच्या आईला सांगितले. त्यांना या डॉक्टरांचा सल्ला खरा वाटेनासा असा झाला.
त्यांनी आपल्या मुलींसाहित चार ते पाच डॉक्टरांचा सल्ला घेतला. सर्वांचे एकच मत येऊ लागले. तेव्हा ताई आपल्या मुलीला घेऊन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वाळकी एकबुर्जी रोड वाशीम येथे आल्या. त्यांनी प्रश्न उत्तरे करणाऱ्या तेथील सेवेकरी ताईंना आपला प्रश्न सांगितला. सेवेकरी ताईंनी त्यांना स्वामी महाराजांचा नारळ त्यांच्या जवळ ठेवायला दिला आणि त्यांना लगेच श्री क्षेत्र दिंडोरी येथे जाऊन परमपूज्य गुरुमाऊली दरबारात जाण्याचा आदेश दिला.
वेळ न जाऊ देता ताई आपल्या मुलीसोबत दिंडोरी दरबारात गेले. परमपूज्य गुरूमाऊलीसमोर आपला प्रश्न मांडला. व तिथे गुरुमाऊली त्यांना भरभरून असा आशीर्वाद मुलीला आणि पोटातल्या बाळाला दिला. आणि लवकरात लवकर पेढा घेऊन यायला सांगितला. आदरणीय दादासाहेबांना पण तुमच्या मनासारखं होईल व लवकर बाळाला घेऊन या असा आपल्या कृपा आशीर्वाद दिला.
दिनांक 5 मे 2020 ला ताईच्या मुलीने एक सुंदर मुलाला जन्म दिला आणि विशेष म्हणजे बाळ व आई दोघांची तब्येत एकदम ठणठणीत होती. ताईंनी परमपूज्य गुरुमाऊली व आदरणीय दादासाहेबांनी दिलेला आ शी र्वा द प्रसाद म्हणून स्वीकार केला. भक्तांना स्वामींवर दाखवलेला विश्वास हाच मोठा प्रसाद आहे आपल्यासाठी. म्हणूनच जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी जय जय श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.