होळीच्या दिवशी नक्की करा हा 2 मिनटांचा उपाय, कष्ट, संकटे, बाधा सारं काही मिटेल.!!

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, होळी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी हा सण 18 मार्च 2022, शुक्रवारी साजरा केला जाणार आहे, तर होलिका दहन फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच 17 मार्च 2022, गुरुवारी होणार आहे.

आपल्या वास्तुशास्त्रामध्ये होलिका दहनाच्या दिवशी असे काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे जीवनातील नकारात्मकता आणि दुर्दैव दूर होऊन सकारात्मकता आणि सौभाग्य प्राप्त होते. आणि मित्रांनो आज आपण आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला असाच एक तांदळा संबंधित एक उपाय आज आपण पाहणार आहोत.

मित्रांनो जर तुमच्या घरा मध्ये किंवा तुम्हाला पित्र दोष असेल आणि त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल आणि घरामध्ये सुख-समृद्धी राहत नसेल पैशांची अडचण वारंवार भासत असेल तर अशावेळी तुम्ही हा तांदुळाच्या संबंधितचा उपाय जर होळीच्या दिवशी केला तर यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी पासून आपली सुटका होईल

आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी आर्थिक तंगी पैशांच्या सर्व समस्याही दूर होतील. चला तर मग मित्रांनो आपण आता पाहुयात कोणता आहे हा उपाय आणि तो कशा पद्धतीने आपल्याला होळीच्या दिवशी करावयाचा आहे ते.

मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार तांदूळ अतिशय पवित्र मानले जातात. त्यामुळेच सर्व पूजेच्या ठिकाणी त्यांचा वापर केला जातो. तांदळाच्या दाण्यांना अक्षता असेही म्हटले जाते. ज्याचा अर्थ अखंडित असा होतो. कपाळावर टिळा लावल्यानंतरही त्यावर अक्षता लावल्या जातात, असे केल्यास घरातील दारिद्र्य दूर होते असे म्हटले जाते.

तांदुळाच्या संबंध चंद्रासोबतही जोडला जातो, त्यामुळे ज्योतिषांच्या उपायांचा अवलंब केला तर यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत करता येते. ज्यामुळे तुम्हाला शुभ फलप्राप्ती होते आणि तसेच जीवनातील अनेक समस्या हळूहळू नष्ट होऊ लागतात.

मित्रांनो जर तुम्ही पैश्यांच्या कमतरतेमुळे जर तुम्ही हैराण असाल तर होळीच्या दिवशी अर्धा किलो तांदूळ शिव लिंगाजवळ बसून एक एक मूठ अर्पण करावी आणि उरलेले तांदूळ एखाद्या गरजवंताला दान करावेत. हा उपाय सलग पाच सोमवार पर्यंत करावा.

शिवलिंगावर अर्पण करायचे तांदूळ अखंड असतील याची काळजी घ्यावी. तांदुळाचे तुटके दाणे कोणत्याही देवदेवतांना अर्पण करू नये आणि त्याचबरोबर या उपायामुळे धनप्राप्ती योग तयार होतो आणि जर तुमची कामे होता होता राहून जात असतील तर यामागे पितृदोष कारणीभूत असू शकतो.

तर मित्रांनो अश्यावेळी होळीच्या दिवशी तांदळाची खीर तयार करून चपातीसोबत ती कावळ्यांना खाऊ घालावी. कारण पितरांना खीर अतिशय प्रिय आहे आणि या उपायामुळे तुम्हाला पितरांचा आशीर्वाद लाभेल आणि तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होतील.

आणि त्याचबरोबर मित्रांनो लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाच्या रेशमी कपड्यात २१ अखंड तांदळाचे दाणे बांधून घ्या. हे दाणे हळदीने पिवळे करून घेतलेले असावेत. त्यानंतर लक्ष्मी मातेच्या तसबिरी समोर लाल कापडात बांधलेले तांदळाचे दाणे ठेवा.

त्यांची विधिपूर्वक पूजा करा आणि कनकस्तोत्राचे पठण करा. यानंतर त्या कापडातील काही तांदळाचे दाणे आपल्या पर्समध्ये, काही तिजोरीमध्ये किंवा धनसंपत्ती ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. असे केल्यास पैश्यांशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. तसेच लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर होईल.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *