हडपसर स्वामी केंद्रातील एका भक्ताचा अद्भुत स्वामींचा अनुभव…याची देही, याची डोळा

नमस्कार मित्रांनो,

ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी प्रिय भक्त हो आज मी तुम्हाला हडपसर या स्वामी केंद्रातील एका दादांना आलेला अनुभव सांगणार आहे. याची देही याचा डोळा याप्रमाणे दादांना स्वामींचा अनुभव आला आहे.

मित्रांनो मी अनेक वर्षं स्वामींच्या सेवेत आहे. मी आणि माझी सौ दोघेही स्वामींची अगदी मनापासून सेवा करतो. हडपसरमधल्या स्वामींच्या केंद्रांत जाणे होत नाही असा 1 दिवस देखील गेलेला नसावा. सौभाग्यवती देखील स्वामींची खुप सेवा करते.

आज मी मला केंद्रात आलेला एक अनुभव सांगणार आहे. रविवार होता माझी भूपाळी. मी नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी केंद्रात भूपाळीसाठी गेले. आज माझ्या सौभाग्यवती माझ्या सोबत नव्हत्या. एरव्ही सकाळी देखील केंद्रात चार पाच जण तर असतात. पण आज कुणास ठाऊक केंद्रात कुणीच नव्हते.

माझ्यासारखे सेवेकरी रोज न चुकता येतात पण आज ते देखील नव्हते. मी स्वामींच्या फोटोची पूजा करायला घेतली. मी माझ्या स्वामींना मनामध्ये विचारले आज मी एकटाच कसा? मनात हा विचार आला आणि मला मागे उभे असल्याची चाहूल लागली.

मी मागे वळून पाहतो तर या केंद्रात या पूर्वी कधीही न पाहिलेला एक व्यक्ती स्वामींना पाहत होता. मी अनेक लोक पाहिले जे स्वामींपुढे देवळात येतात हात जोडतात तर काही सेवेकरी मुजरा करतात. पण हा माणूस दोन्ही पैकी काही करत नव्हता.

मला या माणसाचा थोडा रागच आला पण मी पूजा करत होतो ना, मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा पूजेला लागलो.
आणि पाहतो तर काय स्वामी फोटोमध्ये नव्हते. फोटो अगदी एखाद्या सफेद कागदासारखा अगदी कोरा करकरीत होता. मी जे पाहिले ते त्या माणसाने देखील पाहिले का हे पहावे म्हणून मी मागे पाहतो तर तो मागे माणूस देखील नाही.

मी इकडे तिकडे पाहिले पण तो माणूस मला काय दिसेना.
मग मला वाटले कदाचित सभा मंडपात हवन कुंडाला प्रदक्षिणा घालत असेल आणि मग दर्शन घेईल. मी घाईघाईने सभा मंडपात आले तरी देखील तो माणूस मला कुठेही दिसेना. सभा मंडप, औदुंबराचे झाड, कुठे कुठे त्याला शोधू लागलो पण तो माणूस दिसला नाही.

अनेकांना वाटले की, कदाचित हा भ्रम असेल पण दोन भ्रम कसे होतील. माणूस आल्याचा भ्रम होऊ शकतो अथवा फोटो कोरा असल्याचा भ्रम पण दोन्ही भ्रम कसे होतील. मी सभा मंडपात जाईपर्यंत माझ्या समोर फोटो कोरा होता. भ्रम क्षणाचा होतो, काही मिनिटांचा तर नक्कीच नाही.

मी सभा मंडपामधून बाहेर येतो तोच रोज न चुकता भूपाळीला येणारे काका आले होते. मी त्यांना विचारले की, काका बाहेर जाताना किंवा औदुंबराच्या पाशी तुम्हाला कोणी दिसले का? काकांनी नकारर्थी उत्तर दिले.
मी आता फोटोमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांना पाहत होतो.

मी स्वामींची सेवा करायचो कारण मनात ते करताना शांतता लागते. मी आजपर्यंत स्वामींना कधी काही मागितले नव्हते. च म त्का र गोष्टींवर माझा विश्वास देखील नव्हता. पण आज स्वामींनी मला त्यांची लीला दाखवली. माझ्या पाठीशी राहून कदाचित त्यांना हे सांगायचे होते की, ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’

मी आज जे पाहिले ते माझ्या पुरतेच ठेवावे असा माझा विचार होता. स्वामींनी त्या माणसाच्या रुपात मला दर्शन दिले हे नक्कीच. स्वामींच्या दर्शनानंतर अनेक गोष्टी बदलेल्या आणि त्या पहिल्यापेक्षा खूप चांगल्या झाल्या.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कंमेन्ट करून जरूर कळवा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *