नमस्कार मित्रांनो,
आज मी तुम्हाला अमरावती येथे राहणारे श्रेयसदादा यांचा अनुभव इथे सांगणार आहे. ते दादा सांगतात श्री प्रदीपदादा, ताई आणि प्रियंकाताई या सर्वांना मनापासून धन्यवाद. माझं नाव श्रेयस मी अमरावती येथून आहे. खर तर लहानपणापासूनच महाराजांची सेवा करण्याच भाग्य मला लाभलं आहे. 2020 मध्ये पुणे युनिव्हर्सिटीमधून प्रथम श्रेणीत इंजिनिअरींग पासाआऊट आहे. इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला मी कॉलेजमधून जॉब घेतला नाही.
कारण मला जॉब करायचा नव्हता आणि मी प्रशासकीय सेवेसाठी आधीपासूनच तयारी करत होतो. सर्व ठीक होत 2019 मध्ये माझा पेपर होता. एमपीएससीचा परंतु कोरोनामुळे तो पेपर मार्च 2021 मध्ये झाला. तरी मी धीर सोडला नाही परंतु आपण सर्वांना माहीतच आहे की, सध्या किती प्रॉब्लेम चालू आहेत. एमपीएससीमध्ये मी सुद्धा आता डिप्रेस झालो होतो.
आणि आता जॉब करावा असा निर्णय मी घेतला. आपल्याला तर माहीतच आहे की, मुलांवर घरात किती जबाबदारी असतात आणि त्यातही जर जॉब नसेल तर आपले नातेवाईक शेजारी समाजातील काही लोक टोमणे मारण्याचा चान्स काही सोडत नाही. मलाही असे अनेक अनुभव आले. गेल्या पाच महिन्यांपासून मी जॉब शोधत होतो.
पण मला मिळतच नव्हता खरं तर वरील कोणालाही मी प्रत्यक्ष ओळखत नाही. परंतु याचे श्रेय प्रियंका ताईंना जाते. कारण त्यांच्यामुळे मी आज या कुटुंबाचा सदस्य आहे. व पुढे मी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मला त्या केंद्रातील एका स्वामी सेवेकरी ताईंचा नंबर दिला. मी त्यांना माझा प्रॉब्लेम सांगितला त्यांनी मला सेवा दिली परंतु एवढी सेवा करणे मला काही कारणास्तव शक्य नव्हतं.
पण स्वामींवर विश्वास होता व आहे व राहील. मग मी महाराजांचे नामस्मरण आणि माळ हे चालू ठेवलं. प्रदिपदादांनी सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेला मी सेवा केली व रात्री केंद्रात आरतीला गेलो व महाराजांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून माझा प्रॉब्लेम सांगितला. बेलीव्ह मी काल दिनांक 25-7-2019 ला माझा इंटरव्यू झाला व मला दहा लाखांचे पॅकेज मिळाले.
असे आहेत आपले स्वामी संकटकाळी नेहमी धावून येतात. फक्त गरज आहे ती त्यांच्यावर श्रद्धा व विश्वास ठेवण्याची ते म्हणतात न जिथे वि ज्ञा न संपते तेथून अ ध्या त्म सुरू होते होय ते खरंच आहे सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.