नमस्कार मित्रांनो,
“श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ” मित्रांनो स्वामी समर्थांचे सेवेकरी आज संपूर्ण भारतात आहेत. स्वामींचे अनुभुती संपूर्ण जगात पोहचवायचे आहे. आजचा अनुभव हा सेवेकरीच्या भाषेत सांगणार आहे. साधारणपणे 4 वर्षांपूर्वीचा अनुभव आहे.
हा अनुभव सांगताना अंगावर काटे उभे राहतात. स्वामी महाराजांचे असे अनेक अनुभव अनेकांना आलेले आहेत.
असे अनुभव सांगत बसले तर एक पुस्तक लिहून तयार होईल. आम्ही नांदेडला राहतो तर माझा हा अनुभव साधारण 4 वर्षांपूर्वीचा आहे.
त्या वर्षी दत्त जयंतीचा सप्ताह चालू होता. माझी दत्त महाराज आणि स्वामी समर्थांवर खूप श्रद्धा आहे. सप्ताहाचा मुहूर्त साधून मी माझ्या पतीला माझ्यासोबत गुरुचरित्र पारायणाला बसवले.
माझा छोटा भाऊ गावाहून मला भेटायला आलेला होता. मी त्याला देखील जबरदस्ती करून पारायण करायला बसवले. आमचे पारायण खूप चांगले चाले होते. आणि सप्ताह पूर्ण होयला अवघे 3 दिवस बाकी होते. पण अचानक घात झाला. गावाहून फोन आला की, माझ्या मोठया भावाचा अपघात झालेला आहे.
आम्ही महाराजांची क्षमा मागितली आणि तातडीने निघाले. जाताना जिथे अपघात झाला ती जागा लागली. अपघात इतका भयानक होता की, त्या ठिकाणी रिक्षाचा अक्षरशः भुगा झालेला होता. माझ्या भावाला नांदेडच्या दवाखान्यात ICU मध्ये ठेवण्यात आलेले होते.
त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. बोटाचे एक कांडी आत जात होती अशी परिस्थिती होती. याही परिस्थिती मध्ये माझी स्वामींवरची भक्ती ही अढळ होती. म्हणून महाराजांची भक्ती केली. त्यांच्यापुढे भावाची याचना केली.
डॉक्टर म्हणत होते की, मार इतका जास्त आहे जीवाला धोका आहे. आणि जरी माझा भाऊ वाचला तरी देखील कोमामध्ये जाण्याची जास्त शक्यता आहे. मी व्यथित झाले होते. मी महाराजांपुढे नारळ ठेवले आणि विनंती केली आणि केंद्रातील रक्षा घेऊन दवाखान्यात गेले.
रक्षा माझ्या भावाच्या अंगाला लावले. मला विश्वास होता स्वामी माझ्या भावाला तारतील. ICU मध्ये भाऊ असल्याने जास्त मला उसंत नाही मिळाली. तरी देखील 2 मिनिटे त्याच्या नाडीवर महामृत्युंजय मंत्राचा नाम उच्चार केला आणि 3 मिनिटे गुरुचरित्राचे छोटे पारायण पूर्ण केले.
मी सारखी स्वामींना विनवत होते माझ्या भावाला पूर्वीसारखे करा. इतके अवघड दुखणे पण माझा भाऊ लवकर ठणठणीत बरा झाला. खरंच अशक्य करतील ही शक्य करतील स्वामी डॉक्टरांनी जे धोके सांगितले होते त्यातील काहीही झाले नाही.
त्याची स्मृति शाबूत आहे. काही दिवस त्याला पूर्ण नीट होयला लागले. पण आज तो पहिल्यासारखा झाला आहे. स्वामी महाराज तुमची लीला अपरंपार आहे. “श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ” तर स्वामी प्रिय भक्त हो हा सुधा ताईंचा आलेला अनुभव होता.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.