घटस्थापना कशी करावी? घरी पूजन कसे करावे? अखंड ज्योत कशी लावावी?

नमस्कार मित्रांनो,

आता नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार आहे. घरोघरी घट बसविले जाते. म्हणजे घटस्थापना केली जाईल. घटस्थापना करण्याचा नेमका विधी कसा असतो हे आपल्याला माहीतच नसते. मग आपण आपल्या पद्धतीने घटाची स्थापना करतो. परंतु त्यात काही चूक झाली तर देवीच्या सं पू र्ण पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून घटस्थापना कशी करावी, कधी करावी याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. देवीचा जो मंत्र येत असेल तो म्हणत पुरुषांनी अष्टगंध व स्त्रियांनी हळद-कुंकू आपल्या स्वतःच्या कपाळावर लावावे.

मग 4 वेळा तळ हातावर पाणी घेऊन ते पाणी पिऊन घ्यावे. या वेळी ओम सर्व मंगल मांगल्ये या मत्राचा अखंड जप चालू ठेवावा. घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून 1 पाठ किंवा चौरंग ठेवावा. त्यावर लाल रंगाचे वस्त्र हतंरावे. चौरंगाच्या डाव्या बाजूला अखंड दीप प्र ज्व लि त करून त्याची पूजा करावी. एक विळूची टोपली त्या पाटावर किंवा चौरंगावर ठेऊन टोपली शेतातील किंवा पवित्र जागेची माती गहू मिसळून भरावी. त्यावर स्वच्छ धुतलेला नवीन मातीचा घट लाला लोकरीचे 9 वेडे देऊन ठेवावा. त्यात पाणी, दूर्वा, सुपारी, पैसा, अक्षता टाकाव्यात.

विड्याची 9 पाने व आंब्याची डहाळी लावावी. घटाच्या चारही दिशांना पूर्वेकडून चढते गंध लावावे. घटावर एका तांब्याच्या अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून ठेवावे. देवीच्या ताम्हणाला नमस्कार करावा. घटावर विड्याची 2 पाने पूर्वेकडे देठ करून ठेवावी. त्यावर देवीचा टाक ठेवावा. टाकाची पंचोपचार पूजा करावी. टाकावर गंध लावावे, अक्षता वाहाव्यात व हळद-कुंकू वाहावे. फुले अर्पण करावे. धूप दिप ओवाळावे आणि कोणत्याही उपवासाच्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. पूजा संपन्न झाल्यानंतर 1 माळ घटावर अ र्प ण करावे. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ अ र्प ण करावी आणि नंतर आरती करावी.

रोज घटावरील देवीचे दुरूनच पंचोपचार पूजा करावी व घटास माळ अर्पण करून आरती करवी. शक्य झाल्यास कुटुंबियातील सर्वांनी मिळून दररोज दुर्गासप्तशतीचे वाचन करावे आणि जी परंपरा असेल त्याप्रमाणे कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा. अष्टमी किंवा नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल, त्या दिवशी सकाळी म्हणजेच गट उठविण्याचा दिवशी सकाळी शंख किंवा घंटा ध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा. त्या टाकाच्या पहिल्या दिवशी ज्या प्रमाणे आपण पूजन केले होते त्याप्रमाणेच पूजन करावे. त्यानंतर संपूर्ण पूजा विधी करून नैवेद्य दाखवून नारळ फोडावे.

नैवेद्याला ज्याच्या त्याच्या घरी वेगवेगळ्या प्रथा परंपरा असतात. त्याप्रमाणे खिरपुरी, पुरणपोळी, शिरापुरी, वरण भात, भजी, चटण्या, कोशिंबिरी असा नैवेद्य करावा. नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती, कुमारीका व सवासनी स्त्रीला भोजन घालावे व त्यांचे भोजन झाले की घट उत्तरेकडे हलवावा. दसऱ्याच्या दिवशी घट, टोपली नदीच्या वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. मातीवर उगवलेले धान्य आपट्याच्या पानांचे सोबत आपल्या देवघरातील देवांना, कुलदैवतांना व घरातील ज्येष्ठांना द्यावे. प्रसाद म्हणून स्त्रियांनी फुलाप्रमाणे केसांना लावावे.

पुरुषांनी टोपी खाली किंवा कानावर लावावे. घटाची माती कुंडीत किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी टाकावी. नवरात्रीतल्या 9 दिवसात प्र त्ये क दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे त्या पुढीलप्रमाणे. पहिली माळ शेवंती व सोनचाफा यासारख्या फुलांची माळ. दुसरे माळ अनंत, मोगरा, चमेली अशा पांढऱ्या फुलांची माळ. तिसरी माळ गोकर्णी किंवा कृष्ण कमळ यासारख्या निळ्या फुलांची माळ. चौथी माळ केसरी अथवा भगवे असे अबोली, तेरडा अशोक यासारखी फुले. पाचवी माळ बेलाचे किंवा कुंकवाच वाहतात. सहावी माळ ही कर्दळीच्या फुलांची वाहतात.

सातवी माळ झेंडूच्या फुलांची किंवा नारंगीच्या फुलांची वाहतात. आठवी माळ कमळ, जास्वंद, कन्हेर किंवा लाल गुलाब अशा लाल भडक फुलांचे असते. नववी माळ म्हणून माळ न वाहता कुंकू अर्चन केले जाते. अनेक जण घटस्थापनेपासून पुढील 9 दिवस उपवास करतात. यामध्ये काहीजण निर्जंली उपवास करतात तर काही जण घट उठता-बसता म्हणजेच अष्टमी शुक्लपदा आणि अष्टमी नवमीचा उपवास करतात. आणि दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडतात.ज्याप्रमाणे देवीला 9 दिवस 9 प्रकारच्या फुलांचा माळा अर्पण केल्या जातात त्याप्रमाणे 9 दिवसांसाठी विशेष असे 9 पदार्थ करून प्रसाद म्हणून नैवेद्याला ठेवले जातात. आणि त्यातून आपल्याला देवीचे वेगवेगळ्या प्रकारचे आ शी र्वा द प्राप्त होतात.

पहिल्या दिवशी देवीला गाईच्या साजूक तुपाचा नैवेद्य अ र्प ण केला जातो. यामुळे आपल्याला निरोगी राहण्याचा आ शी र्वा द प्राप्त होतो. दुसऱ्या दिवशी देवीला साखरेचा प्रसाद द्यावा व तोच प्रसाद घरातील सर्व सदस्यांनी वाटून घ्यावा. यामुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यात वाढ होते. तिसऱ्या दिवशी दूध किंवा दुधापासून तयार केलेली मिठाई किंवा खिरीचा प्रसाद देवीला दाखवावा. असे केल्याने आपल्या सर्व प्रकारच्या दुःखांचा नाश होतो व आपल्याला परमानंदाची प्राप्ती होते. चौथ्या दिवशी देवीला उपवासाचे मालपुवे करून त्यांचा नैवेद्य दाखवावा. तसेच मंदिरात ब्राम्हणाला मालपूवे दान करावे.

ययामुळे बुद्धीचा विकास होऊन आपल्या निर्णय क्षमतेत वाढ होते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीला केळीचा प्रसाद दाखवल्याने आपले शरीर स्वस्थ राहते. सहाव्या दिवशी देवीला मधाचा प्रसाद अ र्प ण करावा. यामुळे तुमच्या आकर्षण शक्तीत वाढ होते. नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीला गुळाचा प्रसाद दाखवून तो प्रसाद ब्राम्हणाला दान केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि अचानक येणारी संकटे टळतात. नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी तिळाचा प्रसाद दाखवून त्याचे ब्राम्हणाला दान करावे असे केल्याने मृत्यूचे भय नाहीसे होते. तसेच अपघातापासून आपले बचाव होतो. तर अशा प्रकारे देवीचे 9 दिवस सेवा करावी व देवीचा आ शी र्वा द मिळवून आपले जीवन सुखी समाधानी व समृद्ध करावे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *