घरातील ही दिशा ठरवते तुमचे आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

वास्तुशास्त्रानुसार घरातील एक दिशा अशी आहे जी आपलं चांगलं आरोग्य ठरवते. आपल आरोग्य कसं असेल हे बरच त्या दिशेवर अवलंबून असतं. मग कोणते आहे ती दिशा आणि त्या दिशेला आपण काय ठेवायला हवं या सगळ्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

सध्या प्रत्येक मुलाला विचारलं की, त्याच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर प्रत्येक मुलगा हेच उत्तर देतो की, ते म्हणजे करिअर. परंतु चांगली पोस्ट, चांगला पैसा, चांगली नोकरी हे मिळवण्यासाठी सुद्धा चांगलं आरोग्य आवश्यक आहे. कारण की पैसा भरपूर असेल आणि चांगला आरोग्य नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही हे आपल्याला माहिती आहे.

पण या धावपळीच्या जगात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो का हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे किंवा काही वेळा घरात सारखे सारखे आजारपण सुरूच असतात. म्हणजे घरात सतत कोणी ना कोणीतरी आजारी असतात. आरोग्याबाबत सतत तक्रारी चालू असतात.

मोठ्या आजारांना सुद्धा सामोरे जावे लागते. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. असं म्हणतात की, 50 टक्के आजार हे औषधांनी बरे होतात तर 50 टक्के आजार हे घरातील स का रा त्म क वातावरणाने बरे होतात. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की,

आपण आपल्या घरातलं वातावरण स का रा त्म क कस ठेवू शकतो त्यासाठी आपण वास्तुशास्त्राबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना कळलं आहे की, वास्तु ही 16 दिशांवर काम करते. तसंच या 16 दिशांपैकी साडेबावीस डिग्रीचा एक भाग म्हणजे एक दिशा हा आरोग्यासाठी कार्यरत असतो.

म्हणजे आरोग्यासाठीच्या सगळ्या सेवा पुरवतो ती देशा म्हणजे उत्तर उत्तर पूर्व दिशा. हा भाग आरोग्य आणि उपचारांशी संबंधित आहे. शास्त्रानुसार औषध इथे ठेवावी. कारण या रूममध्ये असलेली ऊर्जा तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि तुम्हाला शक्तिशाली बनवते.

जेव्हा घरात सतत आजारपण येतात तेव्हा समजून घ्यावं की, घरातला हा भाग असंतुलित झालेला आहे. या झोनमध्ये काय गडबड आहे हे पाहण्यासाठी या झोनमध्ये कोणत विरोधी कार्य तर घडत नाही ना हे तपासून पाहायला हवं. जर असेल तर त्याचा परिणाम आजारपणाच्या स्वरूपात आपल्यासमोर प्रकट होतो.

या दिशेमध्ये ज्यांच्याकडे टॉ य ले ट किंवा इ न्व्ह र्ट र ठेवली जातात त्यांची प्रतिकारशक्ती कमी राहते आणि त्यांना आरोग्याच्या समस्या सुद्धा नि र्मा ण होतात. क्षयरोग, कर्करोग यासारख्या जुनाट आजारांना सुद्धा सामोरे जावे लागू शकते. इतकच नाही तर वयस्करांबरोबर तरुणांनाही आजारांना सामोरे जावे लागते.

या दिशेला कचऱ्याचा डबा असेल तरीही आरोग्यास हानी पोहोचू शकते. मेंदूशी संबंधित आजार उदभवतात, स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच त्या दिशेकडे आपण लक्ष द्यायला हवं. ही दिशा स्वच्छ आणि निरोगी ठेवले पाहिजे. कारण तरच घरातील लोकांचे आरोग्य सुद्धा चांगले राहिल आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.

पण या दिशेचे संतुलन आपण कसे ठेवू शकतो? तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की, उत्तर उत्तर पूर्व दिशा या दिशेला आपण आपल्या घरातलं बाथरूम किंवा टॉयलेट बनवायला नको. तसंच या दिशेला पण कचऱ्याचा डबा सुद्धा कधीही ठेवू नये.

त्याचबरोबर या दिशेला संतुलित ठेवायच असेल तर या दिशेला हलक्या रंगाचा वापर करा. जस की, स्क्रीम कलर, हलका निळा रंग या रंगाचा वापर तुम्ही करू शकता आणि तुमच आरोग्य निरोगी ठेवू शकता.

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *