घरात झुरळांचा वावर जास्त झालाय ? या 5 टिप्स फॉलो करा

नमस्कार मित्रांनो,

झुरळं प्रत्येकाच्या घरी असतात. मात्र , त्यांचा वावर जास्त वाढला की त्रास होऊ लागतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही झुरळांच्या जवळ यायचे नसते. हे असे कीटक दिसताना जरी धोकादायक दिसत नसले तरी ते घरातील भांड्यांभोवती फिरून आरोग्यासाठी समस्या निर्माण करू शकतात आणि त्यामुळे आजार होण्याची शक्यता असते.

स्वयंपाकघरातील एखादा भाग आठवडा आठवडा साफ न केल्यास त्या जागी आपल्याला झुरळं दिसतातच. म्हणूनच या झुरळांपासून वेळीच सुटका करणे गरजेचे आहे. तर जाणून घेऊया असे काही घरगुती उपाय जे या झुरळांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काम करतात.

झुरळासाठी घरगुती उपाय
1) लिंबू आणि बेकिंग सोडा

झुरळांपासून सुटका करण्यासाठी, बेकिंग सोडा आणि लिंबू मिसळून एक स्प्रे तयार केला जातो. हा स्प्रे तयार करण्यासाठी, एक लिटर गरम पाण्यात 2 चमचे बेकिंग सोडा आणि एक लिंबू पिळून चांगले मिसळा. आता हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून ते झुरळावर शिंपडा. तुम्हाला झुरळे धावताना आणि तडफताना दिसतील.

2) कडुलिंबाचे झाड
झुरळे दूर करण्यासाठी कडुलिंबाचे तेल खूप चांगले मानले जाते. आपण घरात सर्वत्र हे शिंपडू शकता. याशिवाय घरामध्ये कडुनिंबाची पाने ठेवली तरी झुरळे पळू शकतात.

3) गरम पाणी आणि व्हिनेगर
झुरळे दूर करण्यासाठी व्हिनेगर आणि गरम पाण्याचाही वापर केला जाऊ शकतो. यासाठी एक चमचा व्हाईट व्हिनेगर एका स्प्रे बाटलीत भरून झुरळावर शिंपडा. झुरळांच्या सर्व ठिकाणी ही फवारणी करा म्हणजे झुरळे पळून जातील.

4) काकडी
काकडीचा सुगंध झुरळांना अजिबात आवडत नाही. त्यासाठी काकडीचा रस काढा आणि तो रस झुरळांवर शिंपडा. यामुळे झुरळं पळून जातात.

5) दालचिनी
दालचिनी हा एक असा मसाला पदार्थ आहे ज्याचा वापर अनेक प्रकारचे कीटक दूर करण्यासाठी केला जातो. यासाठी दालचिनी पावडर संपूर्ण स्वयंपाकघरात शिंपडा. त्यानंतरझुरळ स्वयंपाकघरात फिरकणार देखील नाही.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *