नमस्कार मित्रांनो,
आपल्या वास्तुमध्ये वास्तु दोष आहे की नाही हे कसं ओळखावं? ज्या वास्तूमध्ये ज्या घरांमध्ये शुल्लक कारणांवरून लोक एकमेकांशी भांडतात, अगदी किरकोळ कारणांवरून जेवताना सुद्धा कटकटी होतात, शारीरिक किंवा मानसिक कष्ट करून सुद्धा रात्री झोप लागत नाही अशा घरात हमखास वास्तुदोष आहे हे समजावं.
अनेकजण वास्तुदोषावर उपाय म्हणून आपल्या वास्तूची घराची तोडफोड करतात. लक्षात घ्या हे करण्यासाठी शास्त्र संमत देत नाही. अशा प्रकारे वास्तूची तोडफोड केल्यास वास्तूला वास्तू भंगाचा दोष लागतो. मित्रांनो वर्षातून किमान एकदा आपल्या घरात आपण उदकशांती करून घ्यावी. जर शक्य नसेल तर कमीत कमी वर्षातून एकदा दहीभात नारळ यांचे उतारे घरावरून करावेत.
तुम्ही घरच्या घरी ग्रहयज्ञ सुद्धा करू शकता. उदकशांती, वास्तुशांती, ग्रहशांती हे वेगवेगळे प्रकार आहेत आपल्या वास्तूला तेजोवलय म्हणजेच प्रकाशमान करण्याचे, या सर्व गोष्टींनी गृहसौख्य लाभत. आपल्या घरामध्ये सुख शांती नांदू लागते. जेव्हा जेव्हा तुमच्या नव्या घराचा दरवाजा तुटलं तर लक्षात घ्या घरातील स्त्रियांना याचा अतोनात त्रास होतो.
म्हणूनच शांती कर्म करणे आवश्यक असत. नव्या घराचा दरवाजा कवाड तुटलं तर घरातील स्त्रियांना महिलांना मुलींना त्याचा त्रास होऊ लागतो आणि म्हणून शांती कर्म करतात. मित्रांनो जेव्हा जेव्हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा बदलला जाईल तेव्हा लक्षात घ्या आपलं घर नव्याने जन्म घेतं आणि म्हणून अशा घराची वास्तुशांती करणे गरजेचे असत.
नवीन घरामध्ये प्रवेश करताना जर घरात घुबड शिरलेल दिसलं किंवा त्या तुमच्या मधमाश्यांनी पोळ केला असेल, घरात किंवा घराच्या बाहेर कबुतरांनी घरटे केले असेल, एखाद्या व्यक्तीचा अपमृत्यू झाला असेल किंवा घराचा आपण दरवाजाच बदलला आहे अशावेळी वास्तुशांती नक्की करून घ्या हे सर्व ग्रंथ संमत आहे. त्यातीलच माहिती आपल्यापर्यंत पोहचवित आहे.
आपल जर घर खूप मोठा आहे छोट आहे एखादी खोली जर कायमस्वरूपी बंद असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या जवळपास अनेक अदृश्य शक्तींचा वावर त्या बंद खोलीत निर्माण होऊ शकतो आणि म्हणून घरातील एखादी खोली कायमस्वरूपी कधीच बंद करून ठेवू नका. दिवसातून किमान पाच मिनिटे का होईना मात्र तिथे आपला वावर असायला हवा.
मनुष्यांचा माणसांचा वावर आपल्या संपूर्ण घरात असायलाच हवा. ज्या ठिकाणी माणसांचा वावर असतो त्या ठिकाणी अन्य जेनपशुपक्षी प्राणी आहेत त्यांना मनुष्यांचा गंध जाणवतो आणि याउलट जर आपला वावर त्याठिकाणी नसेल तर मग तिथे पाली, चिमण्या, मांजरी, गांधील माशा, कोळीकिडे असे उपद्रव्य प्राणी हे त्या ठिकाणी गोळा होतात.
त्याच्याप्रमाणेच अदृश्य शक्तींना सुद्धा मानवी गंधांच्या गैरहजेरीत आपोआपच या मोकळ्या जागेमध्ये मोकळं रान मिळत. त्यांचा संचार तिथे होऊ लागतो. म्हणून अशी ही बंद असलेली खोली आहे ती आपण झाडून पुसून घ्यावी, तिथे आपण पाच दहा मिनिटं जावं आणि हे जर करणं शक्य नसेल तर दररोज किमान उदबत्ती अगरबत्ती लावला तरी चालत.
कारण या अगरबत्तीने त्या खोलीचं संपूर्ण वातावरण चैतन्यमय राहत. विशेष करून आपल्या वास्तूचा पूर्व दिशेकडच्या, उत्तर दिशेकडच्या आणि ईशान्य दिशेकडच्या खोल्या आहेत त्या कधीच बंद अवस्थेत ठेवू नयेत त्यांच्या नित्य वापर आपण करायला हवा. वास्तुपुरुषाच्या प्रतिमाबद्दल अनेक लोकांना माहिती नसत. जी वास्तुपुरुषाची प्रतिमा आहे ती वास्तू सभावतालच्या जागेत पुरु नये.
पुरावे कुठे? मुख्य वास्तू जी आहे आपले मुख्य घर आहे त्या मुख्य वास्तूच्या आतमध्ये आग्नेय कोपऱ्यात पालथ्या स्थितीमध्ये आपण ही वास्तुपुरुषाची प्रतिमा निक्षेप करावी आणि जेव्हा जेव्हा काही सणवार आहेत, सण समारंभ आहे तेव्हा तिथे हळदी-कुंकू आणि नैवेद्य दाखवायला विसरू नये. यामुळे जे वास्तुपुरुष आहेत ते प्रसन्न राहतात आणि आपल्या वास्तूचे भरभराट होते.
ग्रहप्रवेश करताना किंवा पायाभरणी करताना ते नेहमी दिवसा करावी रात्री करू नये. रात्री केलेली पायाभरणी किंवा गृहप्रवेश हा घराच्या कर्त्या पुरुषास किंवा कर्त्या स्त्री, जो घराचा मालक आहे त्याच्यासाठी अनेक प्रकारचे त्रास निर्माण होऊ शकतात.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.