घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावी ह्यासाठी उपाय

नमस्कार मित्रांनो,

आपल्या घरात नेहमी स का रा त्म क ऊर्जा राहावी हे सगळ्यांना वाटते. परंतु आपल्या घरात स का रा त्म क ऊर्जा कशी राहील, चांगली ऊर्जा कशी राहिल, घरात सुख-समृद्धी कशी नांदेल याबद्दल आपण थोडक्यात काही उपाय बघणार आहोत. मित्रांनो दररोज सकाळी लवकर उठून घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे.

घरातील फरशी रोजच पुसावी आणि फरशी पुसायच्या पाण्यामध्ये थोडे एक चिमूटभर किंवा एक चमचा खडे मीठ टाकावे आणि त्या पाण्याने फरशी पुसावी. याने सुद्धा घरात स का रा त्म क ऊर्जा नांदते. मित्रांनो त्यानंतर घरातील प्रत्येक खोलीत, प्रत्येक रूममध्ये एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे.

मिठाला पाणी सुटल्यास ते मीठ वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि पुन्हा त्या जागेवर नवीन वाटेमध्ये म्हणजेच त्याच वाटीमध्ये नवीन खडे मीठ ठेवावे. असे नेहमी मीठ आपल्या प्रत्येक रूममध्ये एका कोपऱ्यात एका साईडला राहू द्यावे आणि पाणी सुटल्यास ते बदलावे. रोज घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा.

दारात लक्ष्मीची पावले, स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी. मित्रांनो दर पंधरा दिवसाला घरातील जाळे, जळमट स्वच्छ करावेत. घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात. घरातील सगळे पडदे दर दोन महिन्यांनी धुऊन घ्यावेत.

मित्रांनो घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा. घर सतत बंदिस्त ठेवू नये. मित्रांनो संध्याकाळी दिवे लागणीला घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजाने रोज घरामध्ये हनुमान चालीसा वाचावी. घरातील देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि पंचगवय लावावी.

रोज किमान एक माळ कुलदेवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा. देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्यावे. भीमसेनी कापूर जाळावा. देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान 15 मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील ह्याची काळजी घ्यावी म्हणजे सर्व लाईट्स चालू ठेवावी.

तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी देवाचे धन्यवाद म्हणजेच आभार मानून सर्व चांगलाच व्हावं ह्यासाठी प्रार्थना करावी. मित्रानो दिवेलागणीला तुळशीपाशी सुद्धा दिवा आणि धूप लावावी. तुळशीला हळदी-कुंकू लावून शुभम करोति कल्याणम् म्हणावे. तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी तुळशीकडे प्रार्थना करावी.

दिवेलागणीची वेळ असताना घरात झोपणे, भांडणे, न का रा त्म क बोलणे, अपशब्द बोलणे किंवा टीव्हीवर न का रा त्म क गोष्टी बघणे टाळावे. मित्रांनो घरामध्ये कुठेही कचरा, धूळ राहू देऊ नये. तसेच खरकटे अन्न कधीही घरात ठेवू नका. रात्रीच्या वेळी खरकट्या, भांड्याचे टोपले, घराबाहेर ठेवावे घरात अजिबात नाही.

तर मित्रांनो ही काही टिप्स होते, काही उपाय होते, काही काम होते. जे आपण रोज नियमाने आपल्या घरात केले याला काय पैसे लागत नाहीत फक्त एक नियम बनवुन आठवणीने ही कामे करायची असतात.

तर ही काम आपण आठवणीने नियम बनवुन केले तर आपल्या घरामध्ये नक्की सुख-समृद्धी राहील, लक्ष्मीचा वास राहील, शांतता राहील सर्वांच्या आरोग्य चांगले राहील आणि मग स का रा त्म क ऊर्जा घरात कायमस्वरूपी राहील.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *