घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. प्रत्येक वस्तू आपल्या जीवनामध्ये स का रा त्म क तसेच न का रा त्म क बदल घडवत असते. त्यामधीलच आपल्या घरातील महत्वाची वस्तू म्हणजे घड्याळ. या वस्तूचा आपल्या जीवनावर खूप महत्त्वाचा खूप मोठा प्रभाव असतो. या वस्तूच्या सहाय्याने आपण आपला दिनक्रम व्यतीत करत असतो.

वास्तुशास्त्रानुसार घड्याळ ही अशी एकमेव वस्तू आहे जी आपल्या जीवनावर सरळ सरळ प्रभाव पडत असते. आपल्या जीवनामध्ये चांगली वेळ किंवा वाईट वेळ अनू शकते. आपण अनेकदा एक म्हण वापर असतो, काय करणार माझी सध्या वेळेच वाईट चालू आहे असे आपण कित्येकदा म्हणत असतो. ज्योतिषशास्त्र व वास्तूशास्त्र त्यांच्या मदतीने आपण आपली वाईट चालेली वेळ चांगल्यामध्ये बदलू शकतो.

मित्रांनो भिंतीवर लावलेल घड्याळ आपल्याला वेळ दाखवतेच पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी सुद्धा दर्शवित असते. तर मित्रांनो घड्याळ कशाप्रकारे आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतो हे आपण आजच्या माहितीमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

मित्रानो घड्याळ नेहमी चालत असतो आणि कधीही न थांबण्याचा स का रा त्म क संदेश घड्याळ आपल्याला देत असतो. म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये बंद पडलेले घड्याळ घरामध्ये ठेवणं अशुभ मानलं जातं. तुमच्या घरामध्ये जर बंद झालेलं घड्याळ असेल तर असे घड्याळ वेळीच दुरुस्त करावे किंवा बदलून टाकावे. बंद पडलेले घड्याळ आपल्या घरात ठेवले तर यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात.

बंद पडलेले घड्याळ घरामध्ये ठेवल्याने न का रा त्म क ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि याच न का रा त्म क ऊर्जेमुळे आपले जीवन सुद्धा न का रा त्म क होऊन जाते. भिंतीवरील घड्याळ हे नेहमी चालू असावे. त्याचबरोबर वेळ सुद्धा उचित असावी. थोडे मिनिटं पुढे असतील तर चालतील पण आपल्या घराच्या भिंतीवरील घड्याळ कधीच मागे असू नये. जर आपल्या घरातील घड्याळ मागे असेल तर आपण सुद्धा जीवनामध्ये मागे मागे जात असतो.

आपल्या घरातील घड्याळ आपण पूर्व, पश्चिम या दिशेला लावू शकतो. परंतु आपण चुकून सुद्धा घरातील घड्याळ हे दक्षिण दिशेला लावू नये. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. आणि जर आपण घरातील घड्याळ हे दक्षिण दिशेला लावलं तर आपल्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असतो. असे केल्याने आपल्या घरातील सदस्यांच्या आयुष्य सुध्दा कमी होऊ शकतो. व त्यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी सुद्धा निर्माण होऊ शकतात.

त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य प्रवेश द्वाराच्यावर किंवा प्रवेशद्वाराच्या भीतीवर चुकून सुद्धा घड्याळ लावू नये. यामुळे घरामध्ये नेहमी ताणतणाव निर्माण होत असतात. त्याचबरोबर जेव्हा आपण घरातून बाहेर जात असतो किंवा घरामध्ये येतो अशा वेळीसुद्धा घरात डोक्यावर घड्याळ असू नये. म्हणजेच आपल्या प्रवेशद्वारावर घड्याळ असू नये. मित्रांनो आपल्या घरातील घड्याळ नियमित स्वच्छ असायला हवे यावर कोणत्याही प्रकारची धूळ साचू देऊ नका.

आपल्याला घड्याळातून चांगली ऊर्जा मिळावी याकरता घड्याळ सुगम संगीत निर्माण करणारे असावे. मित्रांनो बाजारामध्ये असे सुगम संगीत निर्माण होणारे घड्याळ आपल्याला अगदी सहजपणे मिळू शकतात. अशाप्रकारचे घड्याळ आपल्या घरामध्ये जरूर लावावेत. यामुळे तुमच्या घरातील वातावरण स का रा त्म क होईल आणि यातून तुम्हाला स का रा त्म क ऊर्जा मिळू लागेल.

आपल्या घराच्या हॉलमध्ये नेहमी पेंडुलम असणारी घड्याळ असावीत. त्यामुळे अस म्हटलं जातं की, जर तुमच्या हॉलमध्ये पेंडुलम घड्याळ असेल तर या घड्याळंमध्ये वाईट वेळ सुद्धा चांगल्या वेळेमध्ये बदलण्याची क्षमता असते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये घड्याळ नेहमी गोलाकार किंवा अंडाकृती आकाराचे असावे. यामुळे घरामध्ये स का रा त्म क ऊर्जा निर्माण होत असते.

परंतु मित्रांनो अनेकदा आपण पाहतो की, घरामध्ये वेगवेगळ्या आकाराचे त्रिकोणी चौकोनी आकाराचे घड्याळ आपल्याला पहायला मिळतात. असे घड्याळ अजिबात लावू नका. तसेच आपल्या घरामध्ये कर्कश्य आवाज निर्माण करणारे घड्याळ सुध्दा लावू नका. यामुळे घरामध्ये न का रा त्म क उर्जा प्रवेश करत असते. म्हणून घरामध्ये नेहमी सुगम संगीत निर्माण करनारे घड्याळ लावायला पाहिजे.

झोपताना आपल्या उशीला घड्याळ अजिबात ठेवू नये. यामुळे आपली झोप मोड सुद्धा होते आणि त्याचा विपरीत परिणाम सुद्धा आपल्याला होते. तर मित्रांनो वास्तुशास्त्रमध्ये भिंतीवर घड्याळ लावण्यासंदर्भात असे काही महत्वाचे नियम सांगितले गेले आहेत. या माहितीमध्ये सांगितलेल्या नियमाप्रमाणे जर तुमच्या घरात देखील घड्याळ लावले असतील तर अतिउत्तम आणि जर यामध्ये काही चुका असतील तर त्या लवकरच सुधारून घ्या.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *