नमस्कार मित्रांनो,
आपली सर्वांची धडपड ही पैसे मिळवण्यासाठी चालू असते. कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरात पैसा यावा अशी आपली इच्छा असते. त्यासाठी आपले सतत प्रयत्न चालू असतात. परंतु काही व्यक्तींकडे भरपूर पैसा येतो तर काही व्यक्तींना कितीही कष्ट व परिश्रम घेतले तरीही त्यांच्या मेहनतीचे चीज होत नाही.
म्हणावा तितका पैसा घरात येत नाही. कधी कधी तर असे होते की, घर खर्च भागवणे इतकेही पैसे घरात येत नाहीत. मग जीव वेटाकुटीला येतो. काही व्यक्तींकडे पैसा येतो भरपूर परंतु तो टिकत नाही. पैसा घरात येण्याअगोदरच तो जाण्याचे मार्ग ठरलेले असतात.
नोकरदार व्यक्तीही असले तरीही महिन्याच्या शेवटी शेवटी त्यांच्या हातात काहीही शिल्लक राहत नाही. असे का होते? आज मी तुम्हाला धन कसे वाचवावे पैसे कसे वाचवावे व आपल्या घराकडे धन आकर्षित होईल यासाठी काय करावे ते पाहणार आहोत. आपण दैनंदिन जीवनात कोणत्याही वस्तूंची खरेदी करायला गेलो की, आपल्याला दुकानदार काही सुट्टे पैसे, नाणी परत करतो.
आपण ते घेतो आणि दुसरी एखादी वस्तू घ्यायची असेल तर त्या वस्तूंच्या खरेदीसाठी ते नाणे व नोटा देऊन टाकतो. आपल्याकडे असे कितीतरी सुट्टे पैसे येतात व जातात त्यांचा हिशोब नसतो. आपण त्यांना आपल्या हिशोबातही धरत नाही. ते थोडेफार पैसे कुठे आले आणि कुठे गेले त्याचा काही फरक आपल्याला जाणवत नाही.
तर आजपासून आपल्या सर्वांना एक काम करायचे आहे. आपल्याला देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करायचे असेल तर हे सुट्टे पैसे नाणे मग ते एक, दोन, पाच किंवा दहा रुपयांचे असतील जे नाणे आपल्याला मिळते ते खर्च न करता घरी परत आणायचे आणि ते एका पिशवीत जमा करून ठेवायचे.
परंतु ती पिशवी पाऊच, पर्स, कपडा रेशमीच असावा. अशा रेश्मी लाल, पिवळ्या किंवा हिरव्या कापडात किंवा पाकिटात हे सुट्टे पैसे आपल्याला ठेवायचे आहेत. जेवढे सुट्टे पैसे तेवढे सर्व पैसे आपल्याला त्यात टाकून ठेवायचे आहेत. परंतु त्यांना मोजायचे नाही.
एखाद्या दिवशी एक नाणे कधी दोन तर कधी पाच, सात जेवढे नाणे शक्य होतील तेवढे नाणे आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत. तुमची काहीही कितीही कमी आवक असली कितीही कमी उत्पन्न असले तरीही दोन, पाच रुपये तर तुम्ही बाजूला टाकू शकता. अशाप्रकारे ही आपली बचत असेल.
हळूहळू आपला हा पैशांचा साठा वाढत राहील. अशा पद्धतीने आपण हे पैसे जमा करून एक दिवस आपल्याकडे या सुट्ट्या पैशांचा खूप मोठा साठा होईल आणि आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होईल. कारण नोटांना आवाज नसतो नोटा शांतपणे येतात व निघूनही जातात.
परंतु नाणी आवाज करतात आणि ज्या घरात नाण्यांचा खणखणाट होतो तेथे देवी लक्ष्मी आकर्षित होत राहते. म्हणून घरात पैशांचा खणखणाट नेहमी होत राहिला पाहिजे. त्या नाण्यांच्या गाठोडीत 5 पिवळ्या कवड्या, नजर बटू, गोमती चक्र अशा वस्तू टाकून ठेवाव्यात.
दिवाळी, अक्षयतृतीया, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन अशा वेळी ते सर्व पैसे एका लाल कापडावर ठेवून त्यांची पूजन करावे. त्यांना धूपदीप दाखवा आणि पुन्हा ते सुट्टे पैसे, नाणे त्याच रेश्मी पिशवीत, पाकिटात किंवा गाठोडीत टाकून ठेवावे. या उपायामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल.
आपल्या घरात हळूहळू पैशांची आवक वाढेल. सर्व बाजूनी पैसा येण्यास सुरुवात होईल. परंतु यातील पैसे खर्च करू नये. ते बचत म्हणूनच बाजूला ठेवावे. देवी लक्ष्मी यामुळे आपल्या घरात येईल व आपल्या घरात कायमचे वास्तव्य करेल. घरात पैसा टिकू लागेल, खर्चावर आळा बसेल, रिकामे खर्च होणार नाही.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.