घरात चुकूनही ही झाडं लावू नका नाहीतर पश्चाताप नक्की होईल.

नमस्कार मित्रांनो,

वास्तुशास्त्रानुसार काही झाडे घरातील वास्तुदोष मुळापासून दूर करतात. घर प्रसन्न व्हावे यासाठी घरामध्ये तुळशी, मनी प्लांट, बेल इत्यादी रोपे लावली जातात. याउलट काही झाडे अशी आहेत जी घरात लावू नयेत. वास्तूनुसार अशा वनस्पती अशुभ आणतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती झाडे लावू नयेत.

अनेकांच्या घरा जवळ रुईचे झाड पाहायला मिळते. अशी झाडे चुकूनही घरात लावू नयेत. त्यांना घरात लावल्याने कुटुंबाच्या प्रगतीमध्ये बाधा येते आणि धनाची हानी होते. त्याच प्रमाणे कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही.

कोणत्याही प्रकारचे काटेरी रोप घराच्या आत लावू नये. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद होतात, त्यामुळे घरात भांडणे सुरू होतात. अशी मान्याता आहे.

घरात पिंपळाचे झाड लावणे धार्मिक दृष्टीकोनातून शुभ मानले जाते कारण हे झाड पूजनीय मानले जाते. पण वास्तूनुसार घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड लावणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे घराचे मोठे आर्थिक नुकसान होते.

घरात किंवा घराच्या आजूबाजूला चिंचेचे झाड लावणेही शुभ मानले जात नाही. त्यामुळे घरातील सदस्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *