घराची भरभराट व्हायची असेल तर स्वयंपाक करताना बोला हे 2 शब्द

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो घरातली स्त्री घरची लक्ष्मी असते. तिला गृह लक्ष्मी असे म्हटले जाते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हि गृहलक्ष्मी सतत राबत असते. घरातील लहान सहन गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष देत असते.

तिच्यामुळेच घरातील सर्व सदस्यांना आपापली कामे अगदी बिनधास्तपणे करतात येतात. विशेष करून घरातील जो करता पुरुष असतो त्या कर्त्या पुरुषाला आपल्या कामाकडे 100 टक्के लक्ष देता येत ते याच गृह लक्ष्मीमुळे आणि मग त्या कामात यश हमखास मिळत.

त्या कामातून लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन , वैभव , ऐश्वर्य , पैसा या सर्व गोष्टी निर्माण होऊ लागतात. याउलट घरातील गृहलक्ष्मी लहान सहन गोष्टींची कर्त्या पुरुषाकडे तक्रार करत असेल तर अशा वेळी त्या पुरुषाचं आपल्या मुख्य कमावरती लक्ष लागत नाही आणि मग त्या कामात यश मिळवणं नशिबावरच सोडावं लागत.

मित्रानो मग अशा घरात वाद , कलह , क्लेश , वादविवाद या गोष्टी सुद्धा हळू हळू सुरु होतात. त्या घरातील मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. थोडक्यात घरातील जी स्त्री आहे तिच्यावर घरातील भरभराट, प्रगती बऱ्याच अंशी अवलंबून आहे.

अनेकदा घरातील स्त्रिया स्वतःला एकाकी समजतात. त्या नेहमी बेचैन राहतात. त्यांना सतत दुखी असल्याचा भास होऊ लागतो त्या डिप्रेशन मध्ये जातात. अशा वेळी एक चौपाई सांगत आहे या चौपाईचा जास्तीत जास्त वेळा जप करा.

आपल्या घरातील जी छोटी छोटी काम आहेत हि लहान काम आपण अगदी आनंदाने करू लागाल , चैतन्याने भरून जाल. जे दुःख आहे, डिप्रेशन आहे, निराशा आहे या सर्व गोष्टींतून तुम्ही बाहेर पडाल.

हि जी चौपाई आहे ती तुमचीच नव्हे तर तुमच्या संपूर्ण घराची भरभराट केल्याशिवाय राहणार नाही. प्रभू श्री रामांना समर्पित असलेली चौपाई त्यांचं स्मरण करवते. एक गोष्ट लक्षात ठेवा या संपूर्ण जगतामध्ये मोहमाया नावाची फार मोठी गोष्ट आहे.

तुम्हाला ज्या ज्या गोष्टींचं दुःख होत आहे , ज्या ज्या गोष्टींनी तुम्ही डिप्रेशन मध्ये जात आहात , तुम्हाला बेचैन वाटत या सर्व गोष्टी मायेचच एक रूप आहेत. तुम्हाला वाटत कि तुमची , तुमच्या कुटुंबाची अधोगती होत आहे हि सुद्धा एक मायाच आहे.

जास्तीत जास्त प्रमाणात आपण मेडिटेशन करा , ध्यान धारणा करा यातून परमानंदाची प्राप्ती होते. या सर्व गोष्टी किती खोल आहेत हे समजू लागत. एक छोटीशी चौपायी सांगत आहे सकाळ , दुपार संध्याकाळ जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल या चौपाईच आपण पाठ करत चला. मनातल्या मनात म्हटलं तरी चालेल.

स्वयंपाक करताना विशेष करून जर आपण हि चौपाई म्हट्लात तर त्याचा लाभ अनेक पटीने वाढतो. प्रत्येक कामात आपलं मन रमू लागत. भाग्य, नशीब प्रबळ बनत. चौपाई अगदी व्यवस्थित बघा. जिन्ह कें कपट दंभ नहिं माया। तिन्ह कें हृदय बसहु रघुराया॥ म्हणजे ज्यांच्या मनात कपट नाही , दंभ नाही , मोह नाही, माया नाही, लोभ, राग, मत्सर नाही अशा लोकांच्याच हृदयात प्रत्यक्ष रघुराया म्हणजेच प्रभू श्री राम निवास करतात.

तो परम पिता परमेश्वर ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्याने तुमच्या हृदयात वसाव अशी जर तुमची इच्छा असेल तर वर सांगितलेल्या नकारात्मक गोष्टी आहेत छळ , कपट , मोह , माया इत्यादी या सर्व गोष्टींचा त्याग करा. त्याचवेळी तो परम पिता परमेश्वर तुमच्या हृदयात वास करू लागेल आणि ज्याच्या हृदयात प्रत्यक्ष परमेश्वर वास करतो त्याच हृद्य शुद्ध , सात्विक आणि कोमल बनत.

अशी स्त्री घरातील प्रत्येक सदस्यांची काळजी घेते आणि तिची सुद्धा काळजी घरातील व्यक्ती घेतील जर तीच वर्तन कोमल सात्विक असेल तर. घरातील इतर सदस्यांना देखील सांगणे आहे कि घरच्या लक्ष्मीचा जेव्हा वारंवार अपमान होतो , तीच मन, तीच हृद्य हे पुन्हा पुन्हा दुखावलं जात, शब्दांच्या बाणाने,

तीव्र शब्दाने जेव्हा हि घरची लक्ष्मी अपमानित होते त्या घराची प्रगती प्रत्यक्ष परम पिता परमेश्वर देखील करू शकणार नाही. तेव्हा मित्रानो काळजी घ्या, घरातील स्त्रियांना योग्य तो मान द्या आणि स्त्रियांनी लहान सहान गोष्टींसाठी कुरबुर करत बसू नका. या मोह मायेतून बाहेर या. घराची भरभराट अवश्य होईल.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *