घर बांधण्यापूर्वी असे करा पायापूजन, होईल धनप्राप्ती

नमस्कार मित्रांनो,

घर बांधणे ही एखाद्याच्या आयुष्यातील खूप मोठे स्वप्न असते. त्यामुळे घर किंवा दुकानाचे बांधकाम करण्यापूर्वी त्याची पायाभरणी केली जाते. ही पायाभरणी करत असताना पूजा केली जाते. परंतु, अनेकांना पायाभरणीवेळी करण्यात येणाऱ्या पुजेदरम्यान काय काळजी घ्यावी याबाबत माहिती नसते.

पाया खोदण्याचे काम योग्य वेळी सुरू केले आणि नियमानुसार पूजा केली तर घरात सुख-शांती आणि समृद्धी नांदते. त्यामुळे पाया पूजेला विशेष महत्त्व आहे. घर बांधणे हे प्रत्येक व्यक्तीच्या स्वप्नासारखे असते. त्यामुळे घराच्या सुख-समृद्धीसाठी पायाभरणीची वेळ निश्चित केली जाते.

घर, दुकान किंवा इतर कोणतीही आस्थापना बांधण्यापूर्वी त्या जागेवर कोळसा, वाळू किंवा भूसा निघत असेल तर जमीन तपासणी केली पाहिजे. अशा ठिकाणी कोणतेही बांधकाम यशस्वी होत नाही. पाया खोदण्याचे काम ईशान्य दिशेपासून सुरू करावे, यामुळे घराची समृद्धी राहण्यास मदत होते.

पायापूजा कशी करावी
पाया खोदण्याचे काम सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर सुरू करू नये. याशिवाय पाया खोदण्याचे काम केव्हाही करता येते. पाया खोदल्यानंतर काही विशेष उपकरणांची पूजा करून ती फाउंडेशनच्या आत ठेवली जाते.

पायाच्या आत कलश बसवावा, त्या कलशात एक चांदीचा साप, चार लोखंडी खिळे, हळदीच्या पाच गाठी, तुळशीची पाने, सुपारीची पाने, मातीचे दिवे, पाच लहान आकाराची अवजारे, फळे, नारळ, गूळ, चौकोनी दगड, मध, पंचरत्न आणि पंचधातू या वस्तू पायाच्या आत ठेवाव्यात. नियमानुसार पायाची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *