नमस्कार मित्रांनो,
आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींच्या वय कमी असतं तरीही बऱ्याच व्यक्ती असं सांगतात की, तुमचं वय जास्त आहे का? म्हणजे आपले वय जास्त वाटते. कारण आपल्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या बऱ्याच व्यक्तीच्या चेहर्यावर सुरकुत्या पडतात, काळे डाग पडतात,
चेहऱ्यावर तेज राहत नाही आणि उपाय करूनही पिंपल्स कमी होत नाही, चेहऱ्यावर असलेला वांग कमी होत नाही आणि इतर क्रीम किंवा इतर पदार्थ लावले तर तो वांग कमी होण्यापेक्षा नंतर वाढतच राहतो आणि चेहरा काळा पडला लागतो. यावरती आजचा उपाय अत्यंत फायदा देणारा लाभदायक आहे.
या उपायाने चेहरा उजळ, चमकदार आणि तेजस्वी होईल. मित्रांनो हा उपाय अत्यंत सोपा असून घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. या उपायासाठी आपल्याला एक फेशल तयार करायचा आहे. एक वेळचा फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला पहिली वस्तू लागणार आहे तो म्हणजे बटाटा.
आपल्याला या रस काढायचा आहे. बटाट्याचा रस काढण्याची प्रक्रिया बटाटा स्वच्छ धुऊन घ्या आणि किसणीवर किसून घ्यायचा आहे. मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट ज्या व्यक्तीच्या चेहर्यावर पिंपल्स, पुळ्या येतात अशा व्यक्तीने आंघोळ केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यायचे आहे.
जर थंड पाण्याने धुवून घ्यायला जमले नाही तर थंड कापडाने किंवा थंड टॉवेलने पुसून घ्यावा. म्हणजे ओलं करून चेहरा पुसून घ्यावा. तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स, पुळ्या येणं दोन-तीन दिवसांमध्ये कमी व्हायला लागेल. ज्या व्यक्तींना वांग आहे चेहऱ्यावरती काळे डाग आहेत अशा व्यक्तींनी कच्च्या अक्रोडाचा रस चेहऱ्याला लावला तर वांग आणि डाग पूर्णपणे कमी होतात.
हा अशा पद्धतीने आपण बटाट्याचा रस हा साधारणत चार चमचे घ्यायचे आहे. आपल्याला या चार चमचे बटाट्याचा रसामध्ये दुसरा जो घटक लागणार आहे तो म्हणजे हिरव्या मुगाच्या डाळीचे पीठ. मुगाची डाळ ही मिक्सरमधून बारीक करून त्याचे पीठ तयार करून घ्यायचे आहे. मुगाच्या डाळीमध्ये झिंक आणि पोटॅशियम हे घटक असतात.
जे चेहऱ्यावरील मृत पेशी काढून नवीन त्वचा तयार करते. त्यातील व्हिटॅमिन A आणि C मुळे त्वचा सुरक्षित राहते. या 4 चमचा बटाट्याच्या रसामध्ये पूर्णपणे एक चमचा मुगाच्या डाळीचे पीठ आपल्याला मिक्स करायचे आहे. हे मिश्रण आपल्याला चांगल्याप्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे. एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला साधारणत: 10 मिनिटे तसेच ठेवून द्यायचे आहे.
अशा पद्धतीने तयार झाला आहे आपला फेस पॅक. आपल्याला साधारणतः सर्कुलर मोशनमध्ये लावायचं आहे. 15 मिनिटे ठेवून आपल्याला थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आहे. आठवड्यातून 3 दिवस हा उपाय केला तरी चालेल. याला कोणताही साईड इफेक्ट नाही.
एखाद्याची त्वचा ऑईली असेल तर त्यांनी या फेशल पॅकमध्ये थोडासा मध मिक्स करून लावला तर चांगला रिझल्टस मिळेल. एखाद्या व्यक्तीची त्वचा कोरडी असेल अशा व्यक्तीने या फेशल पॅकमध्ये अर्धा चमचा बदाम तेल टाकून मिक्स करून लावलं तर त्याला अजून चांगला रिझल्टस मिळेल. तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतील. तुमचा चेहरा ब्राईट, तेजस्वी आणि कोमल होईल
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.