नमस्कार मित्रांनो,
आपल्या जीवनात वास्तुशास्त्राचे फार महत्त्व आहे. घरात काय ठेवावे, काय ठेवू नये, घरात कोणती वस्तू कोठे ठेवावी या विषयी संपूर्ण माहिती आपल्याला वास्तुशास्त्रामुळे मिळते. आजच्या या माहितीमध्ये आपण हत्ती विषयी माहिती घेणार आहोत. हात्तीला हिंदू संस्कृतीत खूप शक्तिशाली व पवित्र प्राणी मानले जाते. हत्ती खूप जास्त वर्षे जगतो म्हणून हत्तीला दीर्घायुष्याचे प्रतिकही मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने आपल्याला खूप फायदे होतात. आपले घर असो, दुकान असो, ऑफीस असो किंवा फॅक्टरी असो प्रत्येक ठिकाणी हत्तीची मूर्ती ठेवणे खूप लाभदायक मानले जाते. घरात किंवा दुकानात हत्ती ठेवताना तो वरती सोंड केलेलाच असावा. याचे खूप स का रा त्म क परिणाम आपल्याला मिळतात.
धर्मग्रंथांमध्ये दिलेले आहे की, चांदीचा भरीव हत्ती बनवून घरात ठेवल्याने आपल्या घरावरील वाईट ग्रहांचा प्रभाव कमी होऊन त्यांचा चांगला प्रभाव आपल्या जीवनावर पडतो. परंतु तो हत्ती भरीवच असावा. छोटा असला तरीही चालेल. परंतु हत्ती भरीवच असावा पोकळ असू नये. आपण हत्तीकडे गणपती बाप्पांचे एक स्वरूप म्हणूनही पाहतो. घराच्या मुख्य दारावर दोन्ही बाजूला वरती सोंड केलेले दोन हत्ती लावल्यास घरात प्रेम व आनंदी वातावरणाची निर्मिती होते.
तसेच आपल्या घरावर कोणाची वाईट नजर, दोषही लागत नाही. घरात जर सतत वादविवाद व भांडण-तंटे होत असतील तर घरातील वाद-विवाद व भांडणे मिटवण्यासाठी तीन हत्ती घरात पूर्व दिशेला ठेवावे. हे तीन हत्ती अशा प्रकारे ठेवावे की, सर्वात मोठा हत्ती पुढे आणि सर्वात लहान हत्ती सर्वात मागे असावा. अशा उतरत्या क्रमाने हत्तीचा कळप ठेवावा.
बेडरूममध्ये जर पांढऱ्या रंगाच्या हत्तीची मूर्ती ठेवणे खूप शुभ असते. यामुळे पती पत्नीमधील प्रेम वाढीस लागते. पूर्वीच्या काळी असे म्हणत असत की, कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर खर्या हत्तीच्या पोटाखालून निघावे आणि हत्तीच्या पायाखालची माती उचलून ती विहिरीत टाकावी. या उपायामुळे आपल्यावरील सर्व कर्ज लवकरच फिटेल.
आपल्या शत्रूंचा त्रास खूपच वाढला असेल, शत्रू त्रास देत असतील, शत्रूंची भय वाटत असेल तर शनिवारी एक अंकुश हत्तीच्या माहुताला दान करावा. यामुळे आपल्या शत्रूंचा नाश होतो आणि आपल्याला होणारा त्रास कमी होतो. देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी घरात पैशांची आवक वाढावी, धनलाभ व्हावा असे वाटत असेल तर चांदीचा एक भरीव हत्ती बनवून आपल्या पैशांच्या तिजोरीत ठेवावा.
हा हत्ती वरती सोंड केलेलाच असावा. या उपायामुळे देवी आईची आपल्यावर कृपा होऊन घरात पैशांची आवक वाढेल. यामुळे आपल्या आर्थिक स्थितीमध्ये भरपूर फरक जाणवेल. वरती सोंड केलेला एक हत्ती आपल्या ऑफिसच्या टेबलवर जर ठेवला तर आपल्या कार्यक्षमतेत वाढ होते. तसेच आपल्या निर्णय क्षमतेतही वाढ होते. जर चांदीचा हत्ती आपल्याला बनवणे शक्य नसेल तर संगमरोडाचा छोटा हत्ती बनवून तो देखील आपण घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवू शकतो.
आपल्या लिव्हिंग रूममध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात शांतता आणि सौख्य प्रधान होते. त्याबरोबरच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळते. घरात किंवा खिशात, पर्स, पाकिटात चांदीचा हत्ती ठेवावा हा उपाय राहू दोषासाठी फार उपयुक्त आहे. यामुळे आपल्याला राघुचा त्रास होत नाही आणि व्यापार व्यवसायातही फायदा होतो. चांदीचा हत्ती घराच्या उत्तर-पूर्व दिशेला ठेवणे वास्तू शास्त्रीयदृष्ट्या खूप शुभ असते यामुळे घरात समृद्धी येते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.