नमस्कार मित्रांनो,
आज मी तुम्हाला मिरजच्या डॉक्टरांना एका धनगराचा मन हेलावणारा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ सर राधानगरीजवळ राहणारा एक धनगर म्हातारा तुम्हाला भेटायला आलेला आहे. सिस्टरने येऊन मला सांगितलं. मला वाटलं की, एखादा पेशंटच मला दाखवायला आलेला असेल. माझ्या चेहर्यावरचे भाव ओळखून सिस्टर म्हणाली, सर तो पेशंट नाहीये तुम्हाला म्हणून भेटायला आलेला आहे. पाठोपाठ एक हडकुळा म्हातारा दरवाजा लोटत आतमध्ये आला.
खांद्यावर घोंगडे टाकलेले साधारणपणे वयाची पासष्टी पार केलेली असावी. काय म्हणता आजोबा काही आजारी वगैरे आहात का? म्हातारा अजिबात आजारी वाटत नव्हता पण तरीही मी विचारले. तुम्ही राजुरी सोडली का अस म्हणत म्हाताऱ्याने प्रश्न विचारला. तिथला दवाखाना आता माझी बायको पाहते आणि मी मिरजचा असं त्यांना सांगितलं. तरीच मी परवा मेंढरे घेऊन जाताना पाहिले तर तुम्ही तिथे नव्हता. आज पुण्यादा पाहिले आणि विचारले तेव्हा कळालं की डॉक्टर मिरजला असतात.
म्हाताऱ्याने सांगितले मेंढरं घेऊन परत गावाकडे निघालात काय मी त्यांना विचारलं. होय कालच निघायचं होतं पण तुमचं मागलं पैसे द्यायचं राहिलं होतं म्हणून आज तिकडेच आलो. माझे पैसे आणि कसले पैसे मला तर हा म्हातारा आठवत देखील नव्हता. अहो 8 ते 10 वर्षामागे एकदा मी याच भागात आलो होतो. मला भोळकांडी लागली होती आणि तेव्हा जुन्या दवाखान्यात तुम्ही मला सलाईनच्या 12 बाटल्या लावल्या होत्या. या गोष्टीला खूप जास्त दिवस झाले असल्याने मला पुसटसे आठवत होते.
म्हातारा पुढे म्हणाला त्या टायमाला तुम्ही राजुरीत होता. आमच्या माणसाने उचलून मला तुमच्या दवाखान्यात आणलं होतं. देव म्हणून तुम्ही भेटलात नाही तर माझा मृत्यूच झाला असता. आता माझ्याही आठवणीवरून मळ भाटायला लागली होती. म्हातारा पुढे म्हणाला त्या टाईमला तुमचं बिल हजार रुपये झाले होते आणि मी फक्त पाचशे रुपये तुम्हाला दिले होते. डॉक्टरांच्या आयुष्यात इतक्या तितक्या गोष्टी होतच असतात. आणि त्या काहीही लक्षात ठेवायच्या देखील नसतात.
मी लगेच म्हणालो हो बाबा आठवला आठवला. म्हाताऱ्याने त्याच्या त्या गंजीमधल्या बोटाला लागून असणाऱ्या खिशात हात घातला आणि शंभराच्या पाच नोटा काढून माझ्या हातावर टेकवल्या. बाबा अहो खूप वर्ष झाली माझ्या तर काही लक्षात देखील नाही राहिले आणि तुम्ही पैसे दिले नसते तरीही चालले असते मी म्हणालो. म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर आता दीनवाणे भाव होते. देव बनून तुम्ही मला जगावं आणि मी विसरून जावं असं कुठे असतं का असं ते म्हणाले. मी आता थोडा सिरीयस झालो होतो.
मी त्यांना म्हणालो बाबा गेल्या दहा वर्षात तुम्ही इकडे फिरकलेच नाहीत का? म्हातारा थोडा रडवेला येऊन म्हणाला नाहीजी इथून गेल्यावर जनावरांमध्ये कसलातरी रोग आला होता. निम्मी जनावरे त्यातच मेली आणि बाकीची भिऊन विकून टाकली आणि सगळा खेळच मोडला होता. आता कसेबसे मेंढरं केलीत. थोडा वेळ थांबून बाबा म्हणाले आक्कासाहेब बरे आहेत ना. माऊलीनी मी आजारी होतो तेव्हा शिरा खाऊ घातला होता. त्याच्या डोळ्यात मी ती घटना जिवंत पाहत होतं. तेव्हा ते लगेच म्हणाले आणि लेकरू बी चांगलं मोठं झालं असेल ना.
म्हाताऱ्याने उत्तराची वाट न पाहता पुन्हा आपल्या गंजीत हात घातला. थोडंसं चाचपडत त्याने खूप दिवस सांभाळली असावी असे पाचशेची नोट काढली आणि म्हणाला लेकराला काहीतरी खायला द्या. मी पूर्णपणे भिन्न झालो होतो. म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्याने नमस्कार घातला आणि तो आपले घोंगडे सांभाळत निघून देखील गेला. जगात अशी देखील माणसं असतात की ज्यांना बघून वाटतं साक्षात समर्थांनीच आपल्याला प्र त्य क्ष दर्शन दिला आहे आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.