एका भक्ताला स्वामींनी मरणाच्या दारातून कसे बाहेर काढले ते पहा…

नमस्कार मित्रांनो,

अनेक लोकांच्या आयुष्यात खूप सारे असे वाईट प्रसंग घडतात. त्यातून त्यांना बाहेर पडता येत नाही किंवा तो प्रसंग त्यांच्या जीवावर बेतला जातो. पण आपल्या पाठीशी आपले तारण हार श्री स्वामी महाराजांचा आशीर्वाद असेल, कृपा असेल तर अशा जीवघेण्या प्रसंगातून आपण सहजच बाहेर पडतो.

ते आपल्याला त्या भयानक परिस्थिती मधून बाहेर काढतात. तर स्वामीभक्तहो एका स्वामी भक्तला आलेला स्वामी कृपेचा अनुभव मी तुम्हाला आज सांगणार आहे. मित्रांनो या स्वामी भक्ताचे नाव राहुल कांबळे आहे आणि ते राहतात मालाड येथे. त्यांना काही वर्षांपूर्वी आलेला स्वामी अनुभव आपल्यासोबत शेअर करायचं आहे.

तर मित्रांनो त्या दादांचा अनुभव सांगायला मी इथे सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 2018 ला मी आणि माझे काही शाळेतील मित्र आमच्या गावाला म्हणजेच मालवण येथे जाण्याचा प्लॅन केला. आमच्या सर्वांकडे बाईक आहे. माझ्या सर्व मित्रांना बाईक रायडिंगची खूप आवड आहे.

मलापण आहे पण मी कधी बाईकने राईड केलेली नाही. तर ही माझी पहिलीच वेळ होती इतक्या लांब राईडला जायची. तर आम्ही सर्व मित्र सकाळी 6 वाजता निघालो. सकाळी 9 च्या सुमारास आम्ही खेडला पोहचलो. त्यानंतर घाटचा रस्ता लागला. माझ्या बाईकची स्पीड कमीच होती.

पण इतरांना बघून मला मोह आवरला नाही. आणि मी सुद्धा बाईकची स्पीड वाढवली. पण एका वळणावर माझा बाईकवरचा तोल गेला. आणि मी माझ्या बाईकसोबत रस्त्याच्या कडेला पडले. माझी स्पीड जवळ जवळ 80 ते 90 होती. संपुर्ण रस्ता घाटाचा होता. खोल दरी व काटेरी झाडे होती. पण मी जिथे पडलो तिथे एक लाल मातीचा मऊ ढीग होता.

माझी बाईक जाऊन सरळ जाऊन त्या मातीच्या ढिगार्‍यावर आपटली. त्या स्पीडने पडून पण मला आणि माझ्या बाईकला काहीच नुकसान झाले नाही व मी मालवणपर्यंतचा प्रभास सुखरूप त्याच बाईकने त्याच दिवशी पूर्ण केला मी मालाडला राहतो. मालाड ते मालवण 550 किलोमीटरच अंतर आहे. मी स्वामींची कधीच पूजा केली नाही.

फक्त त्यांचे नामस्मरण करायचं. आणि मला पूर्ण विश्वास आहे मला स्वामींनी वाचवलेल आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी प्रिय भक्त हा आहे दादांचा विश्वास स्वामींवरचा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *