एक अनोखा स्वामी अनुभव अवश्य पहा. श्री स्वामी समर्थ.

नमस्कार मित्रांनो,

स्वामी प्रिय भक्तहो आजच्या या माहितीमध्ये मी तुम्हाला एक अनोखा अनुभव सांगणार आहे हा अनुभव ऐकल्यानंतर नक्की तुम्ही पूर्णपणे भारावून जाणार आहात. स्वामी भक्तहो हा अनुभव धुळे जिल्हा येथे राहणारे सौभाग्यवती रत्नापाटील या ताईंचा आहे. त्यांच्या आईने हा अनुभव आपल्याला सांगितला आहे. ते सांगतात श्री स्वामी समर्थ माऊलीचा कृपाशीर्वाद एक अनोखा अनुभव.

माझी मुलगी स्वप्ना ही पुण्यात खूप आजारी होती तिथे ट्रि ट में ट चालू होती दोन ते तीन दिवस झाले तिला बोलणेही शक्य होत नव्हतं. कोरोनाने झडप घातली होती. ट्रि ट में ट घरीच चालू होती. ऍ ड मि ट होण्याची तिने जबरदस्त भिती घेतली होती. जावई नितीन पाटील हे देखील तिच्या वागण्याला वैतागून गेले होते. आम्ही तिचे माहेर तालुका फागणे जिल्हा धुळे येथे श्री स्वामी समर्थ माऊलींना रात्रंदिवस आतुरतेने तिला वाचवा माऊली म्हणून साद घालत होते.

11 तारखेला तिने शक्ती एकवटून फोनवर सांगितले मी दवाखान्यात जाते झालं माझं जगून, नववीत मुलगा आहे. तसा मोठा आहे मी काही बोलायच्या आत फोन कट झाला. मी पुण्याला जाण्यासाठी अक्षरश: रडत होते. पण मला घरातून निघू देत नव्हते. संध्याकाळी समजले तिला ऍ ड मि ट करण्यात अडचणी आल्या. मी रडत होते आणि स्वामी माऊलींना हात जोडून विनंती करत होते. शेवटी माझा मुलगा कुणाल याने लॅबमध्ये असणाऱ्या मित्राला परिस्थिती सांगितली.

रात्री एक वाजता ते पुण्याकडे निघाले दुसऱ्या दिवशी मुलगी, जावई, नातू सगळ्यांना घेऊन आला. मुलीच्या टेन्शनमध्ये दोन दिवस काही समजले नाही. तिला घरीच एका स्वतंत्र खोलीत ट्रि ट में ट देण्यात येत होती. दुसऱ्या दिवशी मुलगा बळजबरीने नितीन पाटील यांना शंका काढून घेऊ म्हणून घेऊन गेला. स्कॉरालवीस रिपोर्ट मिळायला वेळ होता संध्याकाळची, आमची तर पायाखालची जमिनच सरकली. मुलगी राहिली बाजूला आणि जावईने तर सत्व परीक्षा सुरू केली.

धर्म म्हणता कर्म उभे ठाकले मागचा पुढचा विचार न करता परत माझ्या मुलाने त्यांना गाडीत घेतले. सोबत दोन चार मित्र, दोन चार दवाखान्यात फिरून झाले. कुठे बेड नाही, तर कुठे व्हेंटिलेटर नाही अशा स्टेशनमध्ये त्याने फोन घेणे बंद केले. त्याच्या मित्रांपासूनही लांब गेला. जवळच्या नातेवाईकांना फोन करून हताशपणे काय करावे म्हणून विचारत राहिलो. दुसरा मुलगा विकी त्यांच्यासोबत गेलेला त्यांनी परत पाठवले. त्याने भैया दादा म्हणून सिव्हिलमध्ये असलेल्या गावातील या दादांना सोबत घेऊन सिव्हिलमध्ये गेले.

त्याच वेळेस कुणाल नितीन दादांना घेऊन सिव्हीलला आला. रात्र वाढत होती फिरून वेळ वाया घालवायला वेळ नव्हती. भैया दादाने ताबडतोब सिव्हीलला दाखल करून घेतले. कुठेतरी ट्री ट में ट चालू होत आहे हे पाहून सुटकेचा निश्वास सोडला. पण परिस्थिती फारच गंभीर आहे याची जाणीव झाली होती. अख्खी रात्र रडत माऊलींना साकडं घालत काढली. सगळ्यांचे वर वर धीर देणे चालू होतं. मी माऊलींच्या पुढे पदर पसरून स्वतःला सावरत होते. शेवटी खूप थकले आणि माऊलींवर सर्व भार सोपवला.

जवळचे नातेवाईक रेडिसिव्हर इंजेक्शन लागतील म्हणून धावाधाव करत होते. बारा हजार, सोळा हजार असे आकडे कानावर येत होते. पण सिव्हिलमध्ये त्यांना ना ऑक्सिजन लागला, ना कुठलं महागड इंजेक्शन. पाच दिवस नितीन दादा धुळे सिव्हिलमध्ये उपचार घेत होते. पाचव्या दिवशी ते सुखरूप घरी आले जणू काही घडलेच नाही या थाटात. आणखी दुसरी विशेष बाब म्हणजे माझ्या घरात लहान-मोठे धरून 9 लोक राहतात.

या टेन्शनमध्ये स्वप्ना आमच्यासोबतच होती. परत शंका नको म्हणून घरातील सर्वांची टेस्ट केली सगळे निगेटिव्ह आले. लॉकडाउनमध्ये अडकून जाऊ नये म्हणून 22 एप्रिल रोजी नितीन पाटील फगणे ते पुणे स्वतः कार चालवत पुणे येथील आपल्या घरी सुखरूप परत आले. धुळे सिव्हिलचे सर्व स्टाफला मी मनापासून धन्यवाद देते. त्यांच्या रूपात साक्षात स्वामी माऊलीच सिव्हिलमध्ये होते. धुळे सिव्हिल स्वामी माऊलींना त्रिवार मुजरा श्री स्वामी समर्थ.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *