नमस्कार मित्रांनो,
आजचा हा स्वामी अनुभव अतिशय सुंदर तसेच अविस्मरणीय आहे. हा अनुभव तुम्ही ऐकल्यानंतर नक्कीच तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील. भक्तहो हा अनुभव मुंबई येथे राहणारे श्री सुरेश भिसे या स्वामी सेवेकरी दादांचा आहे. त्यांचा हा स्वामी अनुभव मी इथे सांगायला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ येथे घरासी पादुका रुपये निरंतर राहते.
दिनांक 9 डिसेंबर 1970 आम्ही मुलुंड येथे बाबू निवास नामक वाडीमध्ये कोपऱ्यातल्या एका खोलीत राहत होतो. माझे वडील ठाणे येथे समर्थ सोसायटीत कामाला होते. त्यावेळेस ठाणे येथे दत्तयाग चालू होता. मार्ग महिन्यातील भागवत एकादशी होती. तोच माझ्या जीवनातील सोनियाचा दिवस होता. त्या वेळेस आम्हाला परमपूज्य मोरेदादा व दिंडोरी याची काहीच कल्पना नव्हती.
परंतु माझ्या गुरूचा सांगण्यावरून मी लीलामृत ग्रंथ नित्य वाचत होतो. त्या दिवशी म्हणजे मागमध्ये एकादशी वार गुरुवार माझे आई-वडील नित्यनुसार पहाटे उठून त्यांनी आपले सगळे काम आटोपले आणि वडील पूजेला बसले. माझी आई काही कामानिमित्त बाहेर आली. तोच दरवाजा तिला सहा फुटांपेक्षाही उंच आजानुबाहू तेज:पुंज आणि डोक्यावर कानटोपी घातलेली व्यक्ती दिसली.
आईने त्यांना घरात बोलावले आणि बसण्यास पाठ दिला. घरात बसल्याबरोबर त्यांनी चहा मागितला. चहा पिऊन झाल्यावर माझ्या आईस म्हणाले की, मला चार आणे दे. परंतु त्यावेळेस घरात कोणाकडेही चार आणे मिळेनात. तर ती व्यक्ती म्हणाली की, स्वयंपाक घरातील फळीवर डब्यात चार आणे आहेत. आईने पाहिले तर त्यात खरोखरच चार आणे होते. ते चार आणे तिने त्यांना दिले.
त्यांनी माझ्या आई-वडिलांना जवळ बोलावून आईच्या हातात फुले देऊन देवासमोर बसून नमस्कार करण्यास सांगितले. त्या फुलांची आईच्या हातात खडीसाखर झाली. ती खडीसाखर उभयतांना ग्रहण करण्यास सांगितली. नंतर वडिलांच्या हातात चार आण्याचे नाणे दिले व त्यावर हळद-कुंकू वाहून मूठ बंद करून देवाला नमस्कार करून घेण्यास सांगितले. नमस्कार करून आल्यावर मूठ उघडून बघतोच तोच वडिलांच्या हातात चार आण्याच्या नाण्यावर पादुका तयार झाल्या.
त्या पादुकांच्या बाजूला शंख, चक्र, गदा, पद्म ही शुभचिन्हे आहेत. पादुका पाहताच आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले ते उभयतां नमस्कार करण्याकरिता खाली वाकल्याबरोबर त्यांना अलिंगन दिले. आणि सांगितले की, तुमच्या घरात गंगा वाहिल. मीसुद्धा आई वडिलांच्या सांगण्यावरून त्यांना नमस्कार केला असो माझ्या वडिलांनी त्यांना आपण कुठून आलात व कुठे उतरला व आपले नाव काय याची चौकशी त्यांच्याकडे केली.
तेव्हा ते म्हणाले की, मी गाणगापूर येथून ठाण्यात जो दत्तयाग चालू आहे त्या ठिकाणी आलो असून माझे नाव केळकर आहे. मी समर्थ सोसायटीच्या वरती एक गृहस्थ राहतात त्यांच्याकडे उतरलो आहे असे सांगितले. त्यांनी आमच्या जवळ गाणगापूर येथे ब्राह्मणांना जेवू घालायचे आहे असे म्हणून 101 रुपयांची मागणी केली. परंतु परिस्थिती देण्यासारखे नसल्याने आम्ही त्यांना फक्त 11 रुपये दिले ते 11 रुपये घेऊन ते घरातून बाहेर पडले.
मी आणि माझे वडील त्यांचे मागोमाग गेलो. परंतु थोडे दूर जातास ते एकाएकी दिसेनासे झाले. शेवटी आम्ही घरी परतलो. दुसऱ्या दिवशी ठाण्याचा पत्ता ज्या ठिकाणी ते उतरले होते तेथे जाऊन चौकशी केली. पण असे कोणीही केळकर नावाचे गृहस्थ आले नसल्याचे कळले. नंतर दत्तयागाच्या ठिकाणी सतत तीन दिवस चौकशी केली तेथेही असे कोणीही गृहस्थ आले नसल्याचे कळले.
आमचे सद्गुरू जेव्हा आमच्या घरी आली तेव्हा त्यांना त्या पादुका दाखविल्या त्यांनी सांगितले की प्रत्यक्ष अक्कलकोट स्वामी तुमच्या घरी येऊन त्यांनी तुम्हाला पादुका दिल्या. त्या पादुकांची नित्य पूजा करीत जा. अजूनही त्या दिवसाची व त्या क्षणाची आठवण झाली की, अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहतात. तर असे आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज जे आपल्या भक्तांना पावन करण्याकरिता धावून येतात व भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.