नमस्कार मित्रांनो,
वाढत्या वयात मुलांना कोणत्या प्रकारचा आहार दिला पाहिजे याबाबत पालकांना नेहमी चिंता असते. खासकरून नेहमी कोणते खाद्यपदार्थ मुलांना दिले तर ते आवडीने त्याचे सेवन करू शकतात हा प्रश्न आईच्या मनात कायम असतो. प्रत्येक पालकांना वाटतं की आपलं मुल अगदी निरोगी आणि हेल्दी असावं. यासाठी आई तर आपल्या मुलाच्या आहाराकडे विशेष लक्ष देते. मुलांना कोणत्या प्रकारचे पौष्टिक पदार्थ देता येतील याकडे ती लक्ष देते. मुलं सहा महिन्यांची झाल्यानंतर त्यांच्यासाठी घरच्या घरी बेबी फूड तयार केलं जातं.
त्यानंतर हळूहळू वाढत्या वयानुसार आई मुलांना पोषक खाद्यपदार्थ देण्यास सुरुवात करते. या पोषक आहारामध्ये अंड्याचा देखील समावेश असतो. पण अंड मुलांसाठी सुरक्षित आहे का? हा प्रश्न देखील अनेक पालकांच्या मनात येऊ शकतो. पण कोणत्या वयात मुलांना अंड देणं योग्य आहे? याचा मुलांचा शरीराला कशाप्रकारे फायदा मिळू शकतो? हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
अंड मुलांसाठी चांगलं आहे का?
अंड मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी अगदी उत्तम आहे. यामध्ये अनेक पोषक तत्त्वांचा समावेश असतो. यामुळे मुलांच्या शरीराला अनेक प्रकारचे लाभ देखील मिळतात. पहिल्यांदाच मुलांना अंड देत असताना आई-वडिलांना देखील चिंता वाटू शकते. पहिल्यांदाच जर मुलांना तुम्ही अंड देत असाल तर उलटी, त्वचेवरील समस्या, पचनक्रियेवर परिणाम अशास समस्या उद्भवू शकतात. पण योग्य रित्या अंड शिजवून तुम्ही मुलांना देत असाल तर याचा कोणताच परिणाम मुलांच्या शरीरावर होत नाही.
मुलांना अंड देणं कधी सुरु कराल?
मुलांना सहा महिन्यांपासूनच तुम्ही अंड देऊ शकता. खरं तर मुलांना सहा महिन्यांनंतर योग्य आहार देण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मुलांचा शारीरिक विकास योग्य पद्धतीने होऊ शकतो. मुलं जर अंड्याचं सेवन करत असतील तर यामधून त्यांच्या शरीराला प्रोटिन, व्हिटॅमिन, मिनरल्स, लोह यांसारख्या पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो. पण लक्षात ठेवा अंड योग्य पद्धतीने तुम्ही शिजवून घेतलं पाहिजे. तुम्ही जर अंड योग्य पद्धतीने शिजवून घेत नसाल तर मुलांच्या आरोग्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अंड्यामुळे मिळणारे फायदे
अंड्यामधील अनेक पोषक तत्त्वांमुळे मुलांचा शारीरिक विकास योग्य पद्धतीने होण्यास सहज मदत मिळू शकते. अंड्यामध्ये लोहचा समावेश असतो. मुलांमध्ये जर लोहची कमतरता असेल तर तुम्ही त्यांना अंड देऊ शकता. त्याचबरोबरीने मुलांच्या मेंदूचा विकास तसेच वजन वाढण्यासाठी देखील लोहची आवशक्यता असते. अशावेळी वाढत्या वयामध्ये तुम्ही मुलांना अंड देऊ शकता. तसेच अंड्यामध्ये समाविष्ट असलेल्या इतर पोषक घटकांमुळे देखील मुलांचा शारीरिक विकास योग्य पद्धतीने होऊ शकतो.
रोगप्रतिकार शक्ती वाढते
अंड्यामध्ये समाविष्ट असलेल्या पोषक तत्त्वांमुळे मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. त्याचबरोबरीने डोळ्यांसाठी देखील अंड अधिक लाभदायक ठरू शकतं. अंड्यामध्ये ल्युटिन नावाच्या पोषक तत्त्वाचा समावेश असतो. यामुळे डोळ्यांविषयक आजार मुलांकडे फिरकत देखील नाहीत. तसेच अंड्यामध्ये व्हिटॅमिन डीचा देखील समावेश असतो. यामुळे मुलांची हाडं मजबूत होण्यास मदत मिळू शकते. अंड्यामध्ये समाविष्ट असलेल्या कोलीन पोषक तत्त्वामुळे मुलांच्या मेंदूचा विकास योग्य पद्धतीने होऊ शकतो. मुलांनी अंड्याचे नियमित सेवन केल्यामुळे मुलांचे शरीर निरोगी राहू शकते.
मुलांना अंड कसं द्याल?
मुलांच्या शारीरिक विकासासाठी अंड अधिक उपयुक्त ठरू शकतं. पण हे अंड मुलांना तुम्ही योग्य पद्धतीने दिलं पाहिजे. तुम्ही अंड्यापासून विविध पदार्थ तयार करू शकता. तुम्ही दिवसभरात मुलांना अंड खायला देऊ शकता. तसचे जेवणाबरोबर देखील तुम्ही त्यांना अंड देण्यास काही हरकत नाही. किंवा तुम्हाला काही शंकाच असेल तर मुलांना अंड देण्यापूर्वी तुम्ही ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता. अंड्यापासून तुम्ही आमलेट, बुर्जी असे विविध पदार्थ तयार करून मुलांना देऊ शकता. हे विविध पदार्थ मुलं अगदी आवडीने खातात.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.