नमस्कार मित्रांनो,
स्वामी महाराज जेव्हा अक्कलकोट नगरीत आले तेव्हा स्वामींच्या आतरकी लीला ऐकून अनेक लोक स्वामींकडे येत. स्वामींच्यासमोर नतमस्तक होत. स्वामींचा अक्कलकोट नगरीत प्रभाव वाढत होता. परंतु काही लोकांना स्वामींचा हा वाढणारा प्रभाव बघवत नव्हता. हे खरोखर साधुसंत देव आहे की, हे सर्व थोतांड आहे. याची शहानिशा म्हणून यातील काही मंडळींनी स्वामींची परीक्षा घेण्याचे ठरविले आणि त्यांनी राधा नावाच्या गणिकेला स्वामींकडे पाठविण्याचे ठरविले.
आणि त्याप्रमाणे एक योजना केली या योजनेमध्ये स्वामींना भुलवून कशाप्रकारे जाळ्यात ओडायचे हे व्य व स्थि त समजावून सांगितले. ही वीस वर्षांची राधा दिसायला खुप सुंदर होती. ती नृत्य कलेमध्ये निपुण होती. असो आता ही राधा ठरविलेल्या नियोजनाप्रमाणे स्वामींकडे आली. स्वामी महाराज त्यावेळेला एका उंच टेकडीवर बसलेले होते. स्वामींच्या सभोवताली सेवेकरी भक्त मंडळी जमलेली होती. राधा स्वामींच्यासमोर येथे स्वामींना वंदन करते, स्वामींना फल पुष्प अर्पण करून एका बाजूस जाऊन बसते.
थोड्या वेळात ती आणि तिचे सहकारी वाद्यांची जुळवा जुळव करून गायनास सुरुवात करतात. राधा आकर्षक हावभाव करून स्वामींना आकर्षित करण्याचा प्र य त्न करत होती. परंतु स्वामींवर तिचा काहीच परिणाम होत नव्हता. तिचा हा प्रकार सुरू असताना तिच्या मनात स्वामींविषयी विचार आला आणि मनातल्या मनात ती बोलली की, माझ्यासारख्या एखाद्या सौंदर्यवतीसोबत स्वामींचा समागमाचा योग आला असेल काय? स्वामी भक्तहो तिच्या मनात असा विचार येताच तो स्वामींना ता त्का ळ समजला आणि स्वामींनी तिच्याकडे बघितले आणि बोलले काय गं..स्त्री आणि पुरुष यात काय भेद आहे?
हे ऐकून राधा एकदम चपापली आणि अगदी लज्जेने मान खाली घालून बोलली की, स्त्रीचे अवयव आणि पुरुषाचे अवयव वेगवेगळे असतात. तितक्यात समर्थ बोलले अगं..सच्चिदानंदस्वरुप मूळ चैतन्य सर्वत्र व्यापक आणि निरंतर एकच आहे. तेथे प्रकृती आणि पुरुष असा कसलाच भेद नाही. म्हणून तुझ्यामध्ये पुरुषांपेक्षा अधिक काहीतरी आहे असे समजू नकोस आणि हे तुझे स्त्रीत्वाचे अवयव त्या ब्राह्मणाला देऊन टाक.
स्वामी भक्तहो स्वामींचे हे अंतत्वाचे साक्षीत्वाचे बोलणे ऐकून राधा चांगलीच घाबरली आणि तिने स्वामींच्या चरणी लोटांगण घातले आणि तळमळीने विनंती करू लागली की, स्वामी मला माफ करा दुष्ट लोकांच्या नादी लागून मी आपली परीक्षा बघण्याचा प्र य त्न केला. स्वामी भक्तहो सभोवताली जमलेली सर्व मंडळी हा प्रकार बघत होती. राधा अक्षरशः लज्जेने मान खाली घालून उभी होती. राधाची ही परिस्थिती बघून तिच्या सोबत असलेले वादक मंडळी तिला सोडून निघून गेली. पुढे काही दिवसांनी अजून एक च म त्का र झाला.
राधाचे स्त्रीत्वाचे अवयव नाहीसे होऊन तिच्या शरीराला पुरुषाचा आकार येऊ लागला. आपल्या शरीरात अचानक होणारे बदल बघून ती पुर्णपणे घाबरुन गेली. स्वामी महाराज प्र त्य क्ष परब्रह्म आहेत ही समजूत रूढ झाली. त्यानंतर ती पूर्णपणे वासनारहित झाली. स्वामींची अनन्य भक्त झाली. पुढे ती निर्मळ अंतकरणाने स्वामींच्या भजनात दंग होऊ लागली. तिची भक्ती उत्तरोत्तर वाढत गेली. त्याची शुद्ध प्रेमळ भक्ती बघून करून एके दिवशी स्वामींनी आपल्या गळ्यातील माळ तिच्या गळ्यात टाकून तिच्यावर अनुग्रह केला.
तिला दिव्यत्वाची समज देवून कृपा केली. पुढे ती उत्तरेकडे गेली आणि वृंदावन गोकुळ यात्रा करून शेवटपर्यंत काशीमध्ये राहिली. स्वामींच्या लीला आघात आहेत स्वामी आपल्याला प्रत्येक लिलेतून असंख्य बोध देत आहेत. त्यापैकी आजच्या लिलेतून तुम्हाला आम्हाला सर्वांना बोध देत स्वामी महाराज सांगत आहेत की, बाळांनो तुमच्या स्वतःच्या निर्मळ शुद्ध पवित्र स्वरूपावर वि/श्वा स ठेवा. संसारिक कर्म करता करता तुम्ही शुद्ध स्वरूपा आहात ही समज ठेवा आणि त्यानंतर जर कोणी अशुद्ध अ हं का र तुम्हाला भ्रमिष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला खुशाल त्याला तसे करू द्या.
पावित्र्याच्या शक्तीवर वि श्वा स ठेवा तुमचे काहीही बिघडणार नाही. उलट ती भ्रमिष्ट अज्ञानी व्यक्ती तुमच्या सानिध्याने शुद्ध होईल पवित्र होईल. स्वामी भक्तहो बघा जो स्वतः सच्चिदानंद स्वरुप आहेत जो स्वतः पावित्र्याचा स्त्रोत आहे. अशा स्वामिनारायान पावित्र्याची परीक्षा घेण्यासाठी राधा आली. परंतु खऱ्या शुद्धतेचे वैशिष्ट्यच हे असते की, ज्याच्या सानिध्यात अशुद्धी आली तर ती अशुद्धी स्वतः शुद्ध होते आणि त्याचप्रमाणे घडले.
शृंगारिक गाणे गाण्यात मदमस्त राहत असलेल्या राधेतील सौंदर्याचा अ हं का र उतरवला आणि तिला तिच्या खऱ्या शुद्ध स्वरूपाची ओळख करून दिली. आणि तिला अनन्य भक्तीचा उपहार देत तिचे रूपांतरण अनन्य भक्तीचे भजन गाणाऱ्या गाण्यात केली. स्वामी भक्तहो आपण सुद्धा स्वामींचे अंश आहोत, आपण सुद्धा पवित्र सच्चिदानंदस्वरूप आहोत. आपल्याला सुद्धा आपल्या स्वरूपावर आलेले अज्ञानाचे थर बाजूला करून आपल्या शुद्ध आनंदी स्वरूपाचे दर्शन करायचे आहे.
आणि विश्वास ठेवायचा आहे की जर एक राधा नामक गणिकेचा उद्दार होऊ शकतो तर आपला उद्धार का होणार नाही? नक्कीच होणार आपल्याला फक्त आपल्या अहंकाराचे स्वामी चरणी स म र्प ण करायचे आहे. आणि आपल्यातील शुद्धतेवर वि श्वा स ठेवून आपले संसारिक प्रामाणिक कर्म करत स्वामींना अपेक्षित आनंद शुद्ध जिवनाची अभिव्यक्ती करायची आहे. चला तर मग आपण स्वामींना प्रार्थना करूया.
हे गुरुराया तुम्ही पावित्र्याचा सागर आहात. जो कोणी तुमच्या सानिध्यात येतो तो सहज पवित्र होऊन जातो. आज माझे भाग्य की, माझ्या मुखात तुमचे नाम आहे आणि खरोखर तुमच्या नामाने माझे जीवन प वि त्र झाले आहे. हे आई तुम्हाला हीच विनंती आहे की, शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे नाम माझ्या ओटावर ठेवा. हृदयात तुमचा भक्ती भाव ठेवा आणि तुम्हाला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घ्या. हे महादेवा तुम्ही सोडून मला कोणीच नाही मला प्रेरणा द्या, मला मार्गदर्शन करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.