दिवाळीपूर्वी मुख्य दारावर या वस्तू लावा देवी लक्ष्मी धावतच येईल.

नमस्कार मित्रांनो,

आपल्या घरात, अंगणात किंवा दुकानात मुख्य द्वारावर अशा काही वस्तू असतात ज्यामुळे आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा होते व देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आपल्या कुटुंबात सुख समृद्धी व आयुरोग्य येते. आजच्या या माहितीमध्ये मी तुम्हाला अशा 6 वस्तू सांगणार आहे ज्या घराच्या मुख्य दारावर लावल्यास देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल.

या वस्तू तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या आधी दारात लावायच्या आहेत. यामुळे संपूर्ण वर्षभर देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल. दिवाळीच्या आधी आपण घरात संपूर्ण स्वच्छता करतो. त्याबरोबरच मेन गेट सजवतो. आपले घर जास्तीत जास्त सुंदर कसे व आकर्षक दिसेल याकडे विशेष लक्ष दिले जाते. या वस्तू लावून तुमचे घर तर सुंदर दिसेलच त्या बरोबरच देवी लक्ष्मीचीही कृपा तुमच्यावर होईल.

आपण दारात रांगोळी काढतो. त्यात सुंदर सुंदर रंग भरून ते सजवतो. आकाश कंदील लावतो यामुळे घराच्या सुंदरतेमध्ये भर तर पडतेच त्याबरोबर घर मनही प्रसन्न होते. आता आणखी कोणत्या वस्तू मुख्य दारावर लावाव्यात ते मी तुम्हाला सांगते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्य द्वाराजवळ फुलांनी भरलेला बाऊल ठेवावा. आधी तो बाऊल पाण्याने भरावा.

त्यात वेगवेगळे रंगीबेरंगी फुले किंवा गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्यात दोन-तीन थेंब अत्तर टाकावे आणि त्यात वरून पाण्यात लावता येणारी दिवा लावावे. यामुळे तुमच्या दाराची शोभा वाढेल व देवी लक्ष्मी प्रसन्न मनाने घरात प्रवेश करेल. हे दिसायलाही खूप सुंदर दिसते. हा बाऊल मुख्य दाराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवावा. असे केल्याने घरातल्या मुख्य सदस्याच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन खूप फायदा होतो.

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी उंबरठ्यावर देवी लक्ष्मीच्या चरण पादुका जरूर लावाव्यात. लक्ष ठेवावे की, देवीच्या पावलांची दिशा आपल्या घराच्या आत येणारी असावी म्हणजे देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करीत आहे. यामुळे आपल्या घरात कधीही धनाची कमतरता जाणवणार नाही. दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर तोरण जरूर लावावे. आता शोभेची आणि सजावटीचे विविध प्रकारची तोरणे बाजारात मिळतात. हे दिसायलाही आकर्षक असतात आणि टिकावूही असतात.

परंतु दिवाळीच्या दिवशी आंब्याची पाने किंवा अशोकाची पाने वापरून तोरण तयार केले व ते लावले तर घरात न का रा त्म क उर्जा प्रवेश करीत नाही. आंब्याचे तोरण लावल्यास धनप्राप्ती होते व अशोकाचे तोरण लावल्यास देवी आईची कृपा होऊन दारिद्र्याचा नाश होतो. म्हणून जर तुम्हाला आवडत असेल तर बाजारातून आणलेले तोरण लावून त्यावरही तुम्ही आंब्याचे किंवा अशोकाचे तोरण लावू शकता.

मुख्य दारावर देवी लक्ष्मीचा कमळावर बसलेला फोटोही अवश्य लावावा. देवी बसलेलीच असावी. त्याबरोबरच देवीचे पाय कमळाच्या फुलांनी झाकलेले असावेत. देवीचे पाय दिसणार नाही असा फोटो लावावा. आपले दुकान असेल किंवा घर दोन्ही ठिकाणी तुम्ही हे उपाय करू शकता. यामुळे तुम्हाला कितीतरी शुभ फळांची प्राप्ती होते. मुख्य दारावर स्वस्तिकचे चिन्ह काढावे.

घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य दारावर चांदीचे स्वस्तिक लावणे खूप चांगले असते. परंतु जर तुम्हाला चांदीचे स्वस्तिक लावणे शक्य नसेल तर कुंकूमध्ये थोडेसे तेल टाकून त्या मिश्रणाने दारावर मधोमध स्वस्तिक काढावे. चांदीचे स्वस्तिक किंवा कुंकवाचे स्वस्तिक दोघांचे फळ एकच मिळते. चांदीचे स्वस्तिक दारावर कायमस्वरूपी राहते तर कुंकवाचे स्वस्तिक काही दिवसांनी नंतर निघून जाते आणि ते पुन्हा काढावे लागते.

दारावर स्वस्तिक काढल्यास घरात आजारपण प्रवेश करीत नाहीत. घराच्या मुख्य दारावर शुभ लाभ जरूर लिहावे किंवा तांदूळ भिजत घालून त्याची पेस्ट करून त्यात हळद टाकावी व त्या मिश्रणाने ओम लिहावा. तुम्ही कितीतरी दुकानांवर किंवा घरांवर शुभ लाभ किंवा ओम काढलेले पाहिले असेल. हे चिन्ह तुम्हाला दुकानाच्या किंवा घराच्या उत्तर-पूर्व दिशेला काढायचे आहे.

यामुळे घरात कोणताही आजार असेल तर तो लवकर निघून जातो. आजारपण जास्त काळ टिकत नाही. तर या दिवाळीला या 6 वस्तू आपल्या मुख्य दारावर ठेवा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर व आपल्या परिवारातील संपूर्ण व्यक्तींवर वर्षभर राहील. धनाची देवी लक्ष्मी वर्षभर तुमच्यावर धनाचा वर्षाव करीत आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *