नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो आज तुम्हाला स्वामी सेवेकरी दादांना आलेला स्वामींचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. ते सांगतात आम्ही फार पूर्वीपासून श्री स्वामी समर्थांच्या मार्गातले सेवेकरी आहोत. आज मी तुमच्यासमोर माझ्या आईच्या दुखण्याचा अनुभव मांडणार आहे.
सुरुवातीला आईच्या पायाला मुंग्या येत होत्या. हळूहळू संपूर्ण पायात आणि कंबरेमध्ये वेदना होयला लागल्या. डॉक्टरांनी प्रयत्न केले पण वेदना वाढतच होत्या. एक्सरे आणि स्कॅन केले असता लक्षात आले की, तिचा चौथा आणि पाचवा मणका झिजला आहे डॉक्टरांनी सांगितले की, तिचे ऑपरेशन करावे लागेल. आमच्यासाठी हा खूप मोठा निर्णय होता.
तेव्हा आम्ही अगोदर दिंडोरी गाठणे महत्वाचे समजले. तिथे काही आम्हाला सेवा दिल्या. ऑपरेशनची काहीच गरज नाही असे सांगितले. त्याप्रमाणे आम्ही डॉक्टरांना ऑपरेशन करायचे नाही असे सांगितले. आम्ही घरीच सेवा सुरू केली. आईला वेदना दिवसेंदिवस असह्य होत होत्या. ती थोडे देखील चालू शकत नव्हती. तिच्याकडून थोडे देखील हालचाल होत नव्हती.
आईला नाईलाजाने दवाखान्यात भरती करावी लागली. डॉक्टरांनी रक्ताची तपासणी केली. आणि त्यानंतर ते म्हणाले तिला मणक्यामध्ये टीबी झालेला आहे. डॉक्टरांनी सांगितले तुम्ही ऑपरेशनला नाही म्हटले हेच खूप चांगले झाले. डॉक्टरांनी काही औषध लिहून दिले आणि म्हणाले की, तिला घरी घेऊन जा.
जेव्हा आईला आम्ही घरी घेऊन आलो ती कोणतीच हालचाल करू शकता नव्हती. आम्हाला आधार होता तो म्हणजे स्वामी सेवेचा, गुरू माऊलींनी दिलेल्या सेवा, नाडीवरील जप, नित्यसेवा, शंकराच्या पिंडीवर अभिषेक व त्या अभिषेक तीर्थाबरोबर डॉक्टरांच्या गोळ्या औषधे असा नित्य क्रम सुरू होता. अशा बिकट परिस्थितीमध्ये माझी आई एक वर्ष फक्त पाठीवर झोपून होती.
तिला अन्न पाणी भरवावे लागेल इतकी वाईट परिस्थिती होती. पुढे काय होईल या बद्दल कुणीच कायच सांगायला तयार नव्हते. मी मात्र स्वामींवर भार टाकून सेवा करत होतो. आणि वर्षांनंतर परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. आईला आता उभे राहता यायला लागले होते. पुढील 6 महिने ती हळूहळू हालचाल वाढवत होती. आणि दीड वर्षानंतर तिला आधाराने चालता यायला लागले.
आज माझी आई ठणठणीत आहे. आई आज घरातले सगळे काम करत आहे. आणि आज तिला कोणी पाहिले तर विश्वास ठेवणार नाही की, ती गेली दीड दोन वर्षे या आजारातून उठली आहे. डॉक्टर देखील म्हणाले की, वर्षभर कायम अंथरुणात पडून देखील तिला कोणताही त्वचेचा आजार विकार झालेला नाही.
अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपल्या महाराजांवर जर आपण भार सोपवला तर ते आपले दुःख कमी करतात. आणि आपल्या मनात एक स का रा त्म क ऊर्जा निर्माण होते. सगळे एकदम चांगले होणार आहे आणि ज्या कष्टातून आपण जात आहोत ते यामूळे फुलासारखे हलके होते. आणि स्वामी नंतर देखील सगळे एकदम चांगले करतात. मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कंमेन्टमध्ये नक्की कळवा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.