नमस्कार मित्रांनो,
भारतातील महान उद्योजकांपैकी एक म्हणजे धीरूभाई अंबानी. रिलायन्स उद्योग समूहाचा पाया घालणारे आणि अंबानी हे नाव जगभरात पोहोचवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच धीरूभाई अंबानी. पण तुम्हाला माहिती आहे का त्यांची लव्हस्टोरी सुद्धा त्यांच्या उद्योग गाथे इतकीच महान आणि आदर्श आहे. ज्यांनी त्यांचा जीवनप्रवास वाचला असेल त्यांना याबद्दल माहिती असेलच.
पण ज्यांना अजूनही धीरूभाई अंबानी यामागचं आयुष्य माहिती नाही त्यांनी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. त्यातून एक आगळी वेगळी प्रेरणा मिळते आणि त्याचा प्रेम कथेतून नेमकं प्रेम कसा असावं याचा आदर्श सुद्धा मिळत. आज आपण त्यांच्या या लव्हस्टोरीवर 1 नजर टाकणार आहोत. धीरूभाई अंबानी यांचे निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी कोकिलाबेन यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या वैवाहिक आयुष्याविषयी बऱ्यापैकी उघड केल्या आणि त्या सर्व गोष्टी प्रत्येक कपल्ससाठी आदर्श आहेत.
कोकिलाबेन यांनी सांगितले की, त्यांनी जामनगरमध्ये कधीही कार पाहिली नव्हती. ही गोष्ट धीरूभाई यांना सुद्धा माहीत होती. एकदा त्या चोरवाडहुन अदेन शहराकडे याला निघाल्या. तेव्हा त्यांना धीरूभाईचा कॉल आला आणि ते म्हणाले, मी तुझ्यासाठी कार घेतली आहे आणि मी त्यातूनच तुला घ्यायला येतोय, ओळख पाहू कारचा रंग काय आहे? असू दे मीच सांगतो इट इज ब्लॅक, जस्ट लाईक मी.
धीरूभाई अंबानी यांचा प्रेम दर्शवण्याचा अंदाज कोकीलाबेन यांना अतिशय आवडायचा. वेळात वेळ काढून ते असे सरप्राईजेस आपल्याला आपल्या लाडक्या बायकोला देत असायचे. धीरूभाई यांची इच्छा होती की, आपल्या पत्नीने सुद्धा आपल्या खांद्याला खांदा लावून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करावं. परंतु गुजरातीमध्ये शिक्षण घेतल्याने कोकिलाबेन यांना इंग्रजी यायचं नाही. धीरूभाई यांनी आग्रह करून त्यांना इंग्रजी शिकायला लावलं.
आपल्या मुलांसाठी त्यांनी इंग्रजीचे ट्युशन लावलं होतं आणि सोबत आपल्या पत्नीला सुद्धा त्यातून शिकण्याचा त्यांनी सांगितलं होतं. त्याचा परिणाम म्हणून हळूहळू कोकिलबेन इंग्रजी शिकल्या आणि आपल्या पतीसोबत बिझनेस बघायला लागल्या. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे आणि याचं श्रेय कोकिलाबेन धीरुभाई यांनाच होता.
धीरूभाई 1 स्वतः यशस्वी उद्योजक असले आणि यांना औद्योगिक क्षेत्राचा दांडगा अनुभव असला तरी ते आवर्जून प्रत्येक निर्णय आपल्या पत्नीशी चर्चा करून घायचे. यामागे त्यांची हीच भावना असायची की, माझ्या मागे गरज पडली तर आपल्या पत्नीने न डगमगता हा बिझनेस सांभाळावा. छोटा छोटा प्रोजेक्ट असला तरी पाहिले ते कोकीलाबेन यांना त्याबद्दल विचारायचे.
यावरून दिसून येत की, इतके मोठे उद्योजक असूनही धीरूभाई अंबानी या आपल्या पत्नीला किती आदर देत होते. धीरूभाई यांना कधीच कुठल्या गोष्टीचा गर्व वाटला नाही. याची आठवण सांगताना कोकिलबेन म्हणाल्या की, त्यांनी जेव्हा पहिल्यांदा नवीन विमान विकत घेतलं तेव्हा त्यांनी कोकिलाबेन यांचा ओळखीच्या लोकांना सुद्धा आमंत्रण दिलं होतं.
पण अजिबात यांच्यासमोर त्यांनी फुशारकी मारली नाही. उलट नम्रपणे त्यांनी तो क्षण सर्वांसोबत साजरा केला. यावरून प्रत्येक नवरा 1 गोष्ट शिकू शकतो की, कितीही यशस्वी झाला तरी त्यांना आपल्या बायकोसमोर आणि तिचा माणसांसमोर कोणत्या गोष्टीचा गर्व न करता सर्वांशी नम्रपणे वागावे. धीरूभाई आणि कोकिलाबेन यांची प्रेम कहानी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कंमेंटमध्ये नक्की कळवा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.