नमस्कार मित्रांनो,
अश्विन वद्य त्रयोदशी या दिवशी आयुर्वेदाचे प्रवर्तक धन्वंतरी यांचा उत्सव वैद्यकांची प्रगती होण्याकरिता वैद्य लोक करत असतात. हा देवांचा वैद्य आणि भगवान विष्णूचा एक अवतार मानला जातो तो म्हणजे धन्वंतर अवतार. दुर्वा ऋषीने इंद्राला शाप देऊन वैभवहीन केले होते. तेव्हा ते पुन्हा मिळवण्याच्या हेतूने 14 रत्न मिळवण्याच्या हेतूने देव आणि दैत्यांनी क्षीरसागराचे मंथन केले.
त्यातून 14 रत्ने निघाली. त्यात सुधार महात्मा व आयुर्वेदमय दंड कमंडलू सहित असा धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन बाहेर पडले होती. हा भगवान विष्णूंचा अवतार असून सर्व वेदात निष्णात व मंत्र तंत्र ही विचारत होते. याला आदिदेव अमरव अमृतयोनी सुधापाणी अब्ज इत्यादी अनेक धन्वंतरी देवाला नाव आहेत.
यांच्या अलौकिक प्रतिमेने नाना औषधीचे सारामृत रूपाने देवांना प्राप्त झाले होते. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी ते बाहेर पडले होते म्हणून या दिवशी धनवंतरी देवाची पूजा करावी. धन्वंतरीचा असा फोटो जर आपल्याकडे असेल तर त्या फोटोला हळद-कुंकू अक्षता गंध आणि हार अवश्य वाहा. आपल्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती पाणी वाहायचं, थोडस दुध वाहायचं देवाला पुसायचं.
आणि गंध अक्षदा हळद-कुंकू वाहून आणि देवाला ज्या ठिकाणी नैवेध जो असेल आपल्या जवळ तो नैवेद्य धन्वंतरी देवाला त्या ठिकाणी वाहायचा. धन्वंतरी देवाला प्रार्थना करावी की, आपल्या परिवारातील प्रत्येक लोकांना आयुरारोग्य मिळावं यासाठी प्रार्थना करावी. आणि पूजा झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक मंत्र या ठिकाणी म्हणायचं आहे.
तो सिध्दीदायक असा मंत्र आहे. तो मंत्र तुम्हाला सांगणार आहे. मंत्र म्हणून अक्षता देवाच्या डोक्यावरची वाहायचं आहे. तो मंत्र असा आहे ओम रम रुद्र रोग नाशाय धन्वंतरी भट स्वाहा असा मंत्र म्हणून धन्वंतरी देवाच्या डोक्यावर अक्षता वाहा. आपल्या घरातील सगळे लोक निरोगी राहतील. कुठल्याही प्रकारचा रोग आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.