नमस्कार मित्रांनो,
दिवाळी अगदी जवळ आलेली आहे आणि आपली घरातील साफसफाई जवळ जवळ पूर्ण झाली आहे. आता आपल्याला आपला सर्वांत आवडता विधी म्हणजे शॉपिंगचे वेड लागले आहे. वसुबारसेपासून दिवाळीची सुरुवात होते. त्या दिवशी आपण गाय व वासराचे पूजन करून दिवाळीचा आरंभ करतो.
दुसऱ्यादिवशी धनत्रयोदशी या दिवशी श्रीहरी विष्णूंनी चिकित्सा विज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी धन्वंतरीचा अवतार घेतला होता. म्हणूनच दिवाळीच्या 2 दिवस आधी धनत्रयोदशी उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी ज्यांच्याकडे पूर्वजांकडून आलेले धन असते त्या धनाची पूजा केली जाते. आपल्याला या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल की, या दिवशी कोणत्या कोणत्या वस्तू खरेदी करून घरी आणाव्यात.
म्हणजे आपल्याला त्याचे शुभ फळ मिळेल व श्रीहरी विष्णूंसह लक्ष्मीदेवींची कृपा आपल्यावर येईल. आपली प्राचीन काळापासून अशी परंपरागत चालत आलेली आहे की, या दिवशी नवनवीन वस्तूंची खरेदी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण ज्या वस्तूची खरेदी करतो त्याचे लाभ आपल्या तेरा पट्टीने जास्त मिळतात असे म्हटले जाते.
म्हणूनच कोणत्याही वस्तूची खरेदी शक्यतो धनत्रयोदशीच्या दिवशीच करण्याचा प्रयत्न करावा. आजच्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या वस्तुंची धनत्रयोदशीला जर खरेदी केली तर तुमच्या घरात सुख शांततेबरोबरच धन संपदा ही भरपूर येईल. त्यातील पहिली वस्तू म्हणजे धने. धनत्रयोदशीच्या दिवशी थोडेसे धने जरूर खरेदी करावे.
या दिवशी धने घरात आणणे म्हणजे धन आणण्यासारखे आहे. धनत्रयोदशीला धने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. संध्याकाळी देवपूजेच्या वेळी हे धने देवांपुढे ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी एका कुंडीत माती टाकून त्यात ते धने टाकून द्यावेत आणि त्यांना पाणी टाकावेत. जे जितक्या वेगाने बहरतील तितक्या वेगाने तुमच्या घरात पैशांचे म्हणजे धनाचे आगमन होईल. मग ही कोथिंबीर तुम्ही घरात वापरू शकता.
दुसरी वस्तू म्हणजे मीठ. यादिवशी मिठाची खरेदी करणे ही खूप शुभ असते. आणि पूजेत ही मिठाचा वापर जरूर करावा. एका वाटीत मीठ घेऊन ते रात्रभर तसेच राहू द्यावे म्हणजे घरातील संपूर्ण नकारात्मकतेत त्या मिठात एकवटेल. आणि सकाळी हे मीठ वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे.
पुढील वस्तू म्हणजे कवडी. देवी लक्ष्मीला कवडी अतिप्रिय आहे. म्हणून धनत्रयोदशीला कवडी खरेदी करावी आणि लक्ष्मी पूजनात ती कवडी पूजेमध्ये ठेवावी. म्हणजे तुमचे पूजन संपूर्ण विधिवत होईल. चौथी वस्तू म्हणजे कमळ पत्त्यांची माळ. ही माळ देवी लक्ष्मीला अतिप्रिय असल्याने लक्ष्मी पूजनात या माळेचा वापर करावा. यामुळेही देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमचे पूजन पवित्र होऊन यामुळे तुमच्या घरात नेहमी बरकत राहील.
पुढील वस्तू म्हणजे हळद. हळदीची खरेदी ही धनत्रयोदशीला करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे आपल्या आरोग्यविषयक सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. कारण हा दिवस म्हणजे स्वतः धन्वंतरी देवतेचा आरोग्य प्रदान करणाऱ्या देवतेचा जन्मदिवस आहे. आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला एका खास वस्तूची खरेदी करायची आहे आणि ती वस्तू म्हणजे एक फळ आहे.
ते म्हणजे शिंगाडा. आपल्याला या दिवशी ओल्या शिंगाड्याची खरेदी करायची आहे. ज्यामध्ये पाणी असते ते शिंगाडे घेऊन देवी आईला त्यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर देवी आईचा प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी मिळून हे शिंगाडे सर्वांनी खायचे आहेत. यामुळे देवी आईची कृपा आपल्यावर नक्कीच होते.
शिंगाड्यालाही श्रीफळ म्हंटले जाते. आणि देवी लक्ष्मी आईला हे फळ अतिप्रिय आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी जर आपण हे फळ घरात आणले आणि देवीला नैवेद्य अर्पण केला तर देवी लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होते आणि आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहते.
देवी आईच्या कृपेमुळे आपण मालामाल होतो. जर या वस्तूंची खरेदी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी केली तर तुमच्या घरात आनंदाचे आगमन होईल तुमच्या घरात देवी लक्ष्मीची आगमन होऊन धनाचे व वैभवाचे आगमन होईल त्याबरोबरच सुख समाधानात वाढ होऊन घरातील बरकतही वाढेल.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.