देवघरातील समई का लावावी? स्वामींनी दिलेले हे अद्भुत उत्तर…महिलांनी अवश्य वाचा.

नमस्कार मित्रांनो,

जसे की आपल्याला माहीतच आहे की आपल्या प्रत्येकाच्या देवघरात समय ही लावली जाते, समय का लावावे? याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही किंवा काहींना माहिती असेल, तर ज्यांना माहित आहे किंवा नाही त्यांच्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या माहितीमधून मिळणार आहे. जाणून घेऊयात समई देवघरात का लावावी?

मित्रांनो सम म्हणजे समान, इ म्हणजे आई म्हणजेच आपल्या आईसारखी आपल्याला अंधारात साथ देणारी व अंधारातून उजेडाकडे घेऊन जाणारे ती समई म्हणूनच आपण तिला समई असे म्हणतो. यामागील कारण तुम्हाला माहित नसेल तर नक्की जाणून घेऊयात. जशी आपली आई देवाजवळ रात्रंदिवस आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी व त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी देवाजवळ प्रार्थना करत असते.

त्याच प्रकारे समई देवाजवळ लावल्याने आपल्या घरातील सर्व लोकांचे मन शांत राहतात. घरात एक आनंदाचे, शांतीचे वातावरण निर्माण होते. मित्रांनो देवांना आपण आई मानतो. असे आपले संत महात्मानी तर विठ्ठलालाच आई असे संबोधले आहे. आईचे येवढे म ह त्व आहे की, ते शब्दात व्यक्त करता देखील येत नाही. नवविवाहित वधूला लग्नामध्ये समई दिले जाते व ती नवविवाहित वधु घरात गृह प्रवेश झाल्यावर सासू आईनी सांगितल्याप्रमाणे ती देवघरात पूजा करून झाल्यानंतर देवघरामध्ये समई लावते.

आई थोर तुझे उपकार या वाक्याप्रमाणेच समई देखील आपल्यावर चांगले सं स्का र करत असते. निरंजन म्हणजे पंचमहाभूतांचे सुप्तरूप, साजुक तुप म्हणजे देह, कापसाची वात म्हणजे देह ही वात पेटल्यानंतर देव आणि भक्त यातील अंतर समाप्त होऊन देव आणि भक्त यांच्यामध्ये प्रकाश पडतो.
निरंजनामध्ये ज्योत इतरांना प्रकाश देते. जसे दिव्यातील वात स्वतः जळून इतरांना प्रकाश देते त्याच पद्धतीने आपल्यालाही चांगला बोध मिळतो.

म्हणूनच मित्रांनो समई ही आई असते आणि ती प्रत्येकाच्या घरामध्ये लावायलाच हवी. कारण ती आपल्या आरोग्याची, आपल्या कल्याणाचे काळजी करत असते देवघरातील समई देवाकडे आपल्यासाठी मागणी मागत असते. समई प्रत्येकासाठी असते प्रत्येकाने समई आपल्या घरामध्ये लावलीच पाहिजे. आपल्या सर्वांचे कल्याणासाठी म्हणून आपल्या देवघरामध्ये सर्वांनी समई लावणे अ त्यं त गरजेचे आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *