नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपले देवघर अतिशय चांगल्या पद्धतीने सजवत असतो. देवघरामध्ये अनेक देवांची स्थापना करत असतो. आणि त्यातही आपल्या कुलदेवतेची सेवा करून शंख, घंटा इतर देवांची स्थापना आपण करत असतो. त्याच पद्धतीने आपण आज पाहणार आहोत की, आपल्या घरातील देवघरामध्ये पाण्यामध्ये ठेवलेला कासव असावा की नाही.
यासंदर्भात अनेकांचे विचार असतात अनेकांचे मते असतात. तर मित्रांनो शास्त्र असे सांगते की, कासवाला सहा पाय असतात हे आपल्याला देखील माहिती आहे. सहा पाय या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? तर प्रत्येक माणसाने आपल्या जवळचे सहा गोष्टी दूर केल्या पाहिजेत सहा गोष्टी कुठल्या सांगितल्या आहेत.
पहिली गोष्ट काम, दुसरी गोष्ट क्रोध, तिसरी गोष्ट मद, चौथी गोष्ट मत्सर, पाचवी गोष्ट दंभ आणि सहावी गोष्ट अहंकार या सहा गोष्टीचा त्यात प्रत्येक माणसाने केला पाहिजे. पण प्रश्न असा उभा राहतो आपल्या घरांमध्ये या 6 गोष्टी आपण दूर करू शकतो का?
या सहा शत्रू मध्ये पहिला शत्रू सांगितलेला आहे तो म्हणजे काम. हा शत्रू आपण दूर करू शकतो का अजिबात नाही.
घर म्हटल्यानंतर त्याठिकाणी अनेक गोष्टी आलेले आहेत. त्या ठिकाणी संसारही होत असतो घर म्हटल्यानंतर क्रोदही, कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे माणसाला रागही येत असतो.
मद, मत्सर, दंभ, अहंकार या 6 गोष्टी संसारामध्ये असतात आणि म्हणूनच कासवाची स्थापना आपल्या देवघरासमोर कधीही करू नये. अनेक जणांच्या देवघरासमोर पाण्यामध्ये ठेवलेला कासव आपण पाहातच असतो. पण काही गोष्टी आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही. कासव जरी भगवंताचा कूर्मावतार मानला गेलेला आहे तरीसुद्धा काही गोष्टी घरामध्ये नसाव्यात असं शास्त्र सांगत.
समुद्र मंथनाच्या वेळी भगवंतानी कूर्मावतार हा परिपूर्ण केलेला होता. समुद्र मंथनाच्या वेळी भगवंताचे तीन अवतार तीन अवतार झालेल्या आहेत असे म्हणतात. पहिला अवतार कूर्मावतार, दुसरा अवतार धन्वन्तरी, अवतार, तिसरा अवतार मोहिनी अवतार.
यात महत्त्वाचा अवतार म्हणजे तो कूर्मावतार. मग कासवाची स्थापना कुठे करावी? कुठे करतात. तर शास्त्र सांगतं कासवाची स्थापना मंदिरामध्ये करावे. कासव हा मंदिरांमध्ये असतो कारण कासवाला सहा पाय असतात मंदिरामध्ये जात असताना प्रत्येक माणसाने 6 राग, 6 शत्रू बाजूला ठेवूनच मंदिरामध्ये प्रवेश करावा.
सहा शत्रू हेच काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. त्याच पद्धतीने कासव हे आपल्या पिलाला गळ्यातून प्रेम देऊन वाढवतो तसे देवाने सुद्धा आपल्या कृपा दृष्टीने पहावं ही एक भावना असते. कासव ज्या प्रमाणे आपले इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये ठेवतो त्याच पद्धतीने माणसाने देखील आपले इंद्रिये ताब्यामध्ये ठेवून भगवंताच दर्शन घ्यावा.
तर मूळ मुद्दा असा आहे मित्रांनो कासवाची स्थापना देव घरामध्ये आपल्या घरामध्ये कधीही करू नये तर कासवाची स्थापना असावी ती मंदिरामध्ये असावी.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.