देव मानला तर आहे आणि तो आहेच.

नमस्कार मित्रांनो,

मनी नाही भाव आणि म्हणे देवा आता तरी मला पाव ही म्हण तेवढीच सा र्थ क ठरते फक्त काही लोकांना. ज्यांना परमेश्वराला शॉर्टकटमध्ये आणि बायपास वेने भेटायचं आहे आणि असत. माझ्या बोलण्याचा रोष हा आ स्ति क आणि ना स्ति क ह्या मुद्यावर नाही. परमेश्वराला मानन आणि त्याची भक्ती करण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे .

मला फक्त इथे माझा अनुभव सांगावसा वाटला आणि तो ही माझ्यासाठी स्वर्ग असणाऱ्या माझ्या बदलापूरच्या स्वामी समर्थवाडीतला. बदलापूरची स्वामी समर्थवाडी म्हंटल कि, माझं मन हे एकदम आनंदी आनंद गडे होत असत. कारण समर्थवाडीच मुळात अशी आहे आणि अगदी खऱ्या अर्थाने समर्थ आहे. तिथे आधी दतात्रय, तसेच दत्गुरुंचे १६ अवतार, स्वामी समर्थ, रेणुका देवी, मारुती मंदिर, दत्त मंदिर अशी मंदिरे आहेत.

आणि अश्या तिथल्या सगळ्या देवांची आणि मंदिरांची सेवा आणि उपासना ही आपल्याला स्वतःला करायला मिळते. तिथली अट फक्त एकच पुरुष मंडळीना सोवळ आणि स्त्रियांना साडी आणि अंघोळ करुन देवाची म्हणजे देवांच्या मूर्तींची स्व हस्ताने पूजा करणे (दत्तगुरू आणि मारुती ह्यां मूर्त्यांना स्त्रियांनी हात लावू नये हा तिथला कडक नियम ). तसचं इथे १५० गाई, ५ श्वान, दोन बलदंड हत्ती, इमू, आणि बदके हे हि वाडीच एक वैशिष्ट्यआहे.

ह्या गुरूपुर्णीमेला मला हा सुंदर अनुभव अला तो असा कि, ह्या गुरुपौर्णिमा निमित्त मी दोन दिवसांच्या उपासनेला समर्थ वाडीत गेले होते आणि ह्या वेळी स्वामीसखाचे म्हणजेच गुरूंचे पाद्द पूजन पण करायचे होते ते ही रात्री १०. ३० ला. जवळ जवळ ५०० लोकं त्यावेळी तिथे हजर होते पाद्द पूजनासाठी. सगळ्यांना उपासना आणि सेवा दिल्या गेल्या होत्या तसच मलाही उपासना आणि सेवा दिली गेली. दत्त मंदिर, गुरुपंच्यातन मंदिर झाडूनपुसून क्लीन करणे. आणखी एक गोष्ट ती ही कि प्रामुख्याने तिथे गेल्यावर सगळ्यांना नियम सारखे असतात .

त्यावेळी माझ्याबरोबर आई किवां कोणीही घरातले असे नव्हते. दोन दिवस माझी एकटीची सेवा ही चालू होती, सेवेनंतर पद, आरत्या, जपमाळ, पालखी अश्या उपासना सुद्धा चालू होत्या. वाडीचे नियम हे सुद्धा खूपच कडक आहेत. सतत तोंड न चालवणे म्हणजे खात बसू नये, बडबड, गप्पा-ठप्पा नाहीत. आपण आणि आपली सेवा उपासना हेच लक्ष्य ठेवायचं. स्वामी सखा म्हणजे तिथल्या गुरुचं पाद्द पूजन हे दत्त मंदिरात होणार होत. पण भक्तगण एवढे वाढले होते की, तिथली जागा अपुरी पडत होती म्हणून गुरुनी एक फेरी मारून बघितली आणि आमची आरती चालू असताना सरळ ते गुरुपंच्यातनमध्ये जावून बसले. एक तर पावसाळा आणि त्यावेळी तर बापरे धोधो पाऊस हा चालू होता.

आजूबाजूला रान जंगल असाव अशी गर्द झाडी. पायाखाली वाटेत काय येईल त्याचा बेत नाही नेम नाही. प्र त्ये क जण आपापल्या कुटुंबासोबत आले होते. आणि जस ज्यांना समजल की, पूजा हि दत्त मंडपात नाही आहे तसं जो तो गुरूंच्या दर्शनाला गुरुपंच्यातनमध्ये गेला. संपूर्ण दत्त मंडप हा रिकामा झाला. आणि मी आपली एकटीच तिथे चार ते पाच स्त्रियांंसोबत गुरु येतील अशी वाट बघत होते. आयत्या वेळी कार्यक्रमाची रूपरेखा बदलली आणि मला तर कल्पना अलीची नाही. मग तिथे एक काका होते त्यांनी मला विचारलं तू इथे काय करतेस? तुला गुरुंच पूजन करायचं आहे ना ?? मग तिथे गुरुपंच्यातनमध्ये जा . तिथे तो का र्य क्र म चालू आहे.

हे काकाचं बोलण एकून मी खूपच घाबरून गेले होते .कारण ते ह्यासाठी की, एकतर हातातल्या फक्त छत्रीचा आधार भिजू नये म्हणून आणि एका बॅटरीच्या प्रकाशावर काळोखातून जायचं होत. आणि आजूबाजूला किवां वाटेत काही साप वगेरे आला तर? ह्या भीतीने मला अक्षरशा आईची आठवण आली होती. स्वामींना हाक मारली, आता तुम्हीच सोबत चला ह्या भयाणक अंधारात आणि मी कशीतरी त्या काळोखातून वाट काढत गेले. धो धो पाऊस चालू होता तो वेगळाच. पोहचली एकदाची घाबरत घाबरत आणि तिथे जाऊन बघितलं तर बाप्परे केवढी गर्दी लोकांची! म्हंटल आता कसला माझा नंबर लागणार आणि मला गुरूंची पूजा करायला मिळणार.

त्यात जवळ जवळ ५०० लोकं भर पावसात उभी होती. त्या गर्दीत उभ राहणार. तेवढ्यातच एक काकी एकदम बोल्या तू इथून ये. त्या गर्दीत जाशील तर खूप वेळ लागेल आणि मला त्या वेळी ते खूप नवल वाटलं आणि अवाक वहायला झाल की, तिथल्या त्या गर्द काळोखात भर पावसात जी एवढी लोकं उभी होती, लहान मुलांंबाळासोबत भिजत होती तिथे त्यावेळी मी न भिजता, गर्दीत उभी न राहता मला २ मिनिटांनमध्ये खूप खूप सुंदर दर्शन आणि पूजा हि गुरूंची करायला मिळणार होती.

मला एवढंच सांगावस वाटत कि, आपण एकट जरी कुठे असलो, तरी आपला देव आणि अर्थात माझे स्वामी समर्थ हे कायम माझ्या सोबत आहेत आणि असतात . त्यांना बरोबर कळत असत आपला भक्त काय करतो आहे. त्याला ज्या गोष्टी झेपत नाहीत त्या तो मनापासून, आवडीने करतो आहे आणि मग ते आपला मार्ग पण तसाच आणि तेवढाच सुखकर, सोयीस्कर करत असतात, करत जातात. म्हणून मानला तर देव पण हो त्यासाठी आधी आवड असावी लागते आणि आवड असेल तिथे बरोबर सवड काढावी लागते आणि सवड मिळाली कि, बरोबर भक्ती साध्य होते आणि अपोआप मग परमेश्वरावरचा वि श्वा स साध्य होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *