नमस्कार मित्रांनो,
आपल्याला भरपूर धन लाभ व्हावा, आपण भरपूर श्रीमंत व्हावे समाजात आपला मान सन्मान वाढावा असे सर्वांनाच वाटते. त्यासाठी आपण भरपूर कष्ट करतो, खूप परिश्रम घेतो परंतु कधी कधी असे होते की, खूप कष्ट करून भरपूर मेहनत करूनही त्याचे म्हणावे तसे फळ आपल्याला मिळत नाही. आणि व्यक्ती अगदी कमी श्रमात व अगदी कमी वेळेत खूप काही मिळवतात. त्यांच्या जीवनात धनाचे आगमन अगदी वेगाने होते.
परंतु धन मिळवण्यासाठी तसे योग घडवून आणावे लागतात. नुसते कष्ट करून काही होत नाही. त्या सोबतच काही उपायही करावे लागतात. आपण दसऱ्याच्या दिवशी धनसंपत्ती मिळवण्यासाठी करण्याचा खास असा उपाय बघणार आहोत. दिव्याचा आपल्या जीवनात फार महत्त्व आहे. प्रत्येक पूजनात दिव्याचे फार महत्त्व असते. असे म्हणतात आपण केलेले पूजन व उपाय भगवंतापर्यंत पोहचवण्याचे कार्य दिव्यामार्फतच होत असते.
म्हणून भगवंतांचे कोणतेही कार्य करण्यापूर्वी दिवा लावला जातो. आज आपण दसऱ्याच्या दिवशी दिव्याचा असा कोणता उपाय करावा, दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकावी, दिवा कोणत्या वेळी व कोणत्या ठिकाणी लावावा म्हणजे देवी आईची कृपा आपल्यावर होईल. आणि आपले घर धनसंपत्तीने भरून जाईल ते पाहणार आहोत. दसरा म्हणजेच विजयादशमी. हा 1 विजय मुहूर्त आहे. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असल्याने या दिवशी आपण जे काही उपाय व तोटे करतो त्यांच्या आपल्याला खूप लवकर व नक्कीच असे परिणाम बघायला मिळतात.
या दिवशी वाहनांचेही पूजन केले जाते. कारण कोणतेही उत्पन्नाचे मार्ग हे वाहनांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतात. दिव्याचा हा उपाय आपल्याला संध्याकाळी सूर्यास्तानंतर करायचा आहे. त्यासाठी संध्याकाळी शक्य असेल तर स्नान करावे किंवा तोंड, हात पाय धुवून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. त्यानंतर शुद्ध तुपाचा एक दिवा बनवावा व एका वाटीत थोडेसे तांदूळ घेऊन तो दिवा त्या वाटीत ठेवावा. 1 लाल रंगाचे रूमाला येवढे कापड घेऊन ते कापड आपल्या घराच्या ईशान्य दिशेला स्वच्छ करून तेथे गंगेचे पाणी शिंपडून त्यावर हथंरावे.
त्यावर दिवा ठेवलेले वाटी ठेवावी व दिव्यासमोर देवी आईचा कमळामध्ये बसलेला फोटो किंवा मूर्ती ठेवावी. ईशान्य म्हणजे उत्तर-पूर्व दिशा एकत्र मिळते ती दिशा. जर ईशान्य दिशेला हा उपाय करणे शक्य नसेल तर आपल्या देवघरासमोरही आपण हा उपाय करू शकतो. त्यानंतर देवी आईसमोर एक आसन टाकून आपण बसावे. डोळ्याला पाणी लावून आचरण करावे. कपाळावर गंध लावावे. स्त्रियांनी हळद कुंकू लावावे.
देवी आईला एखादा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावा व तेथेच बसून ओम महालक्ष्मी देवी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शक्य असेल तर कणक दारा स्तोत्र, लक्ष्मी सूक्त व श्रीसूक्तचेही पठण करावे. देवी आईला मनोभावे नमस्कार करावा. दिवा तेथे तसाच राहू द्यावा. दिवा सम झाला की, दिवा उचलून त्या खालील वाटीतील तांदूळ लाल कापडावर टाकावे व त्याची गाठोडी बनवावी. आणि ती गाठोडी आपल्या धन ठेवण्याच्या जागी तिजोरीत किंवा व्यावसायिक असाल तर पैशांच्या गल्यात ठेवून द्यावे.
हा उपाय खूपच प्रभावी आहे. त्यामुळे आपल्याकडे धनाचा ओघ वाढेल, पैसा आपल्या हातात खेळू लागेलं, उत्पन्नाचे विविध मार्ग आपल्यासाठी खुले होतील. सर्व बाजूंनी धनाचे वेगाने आगमन होईल. आपल्याला भरपूर धन लाभ होऊन धनाची बचतही होईल. मित्रांनो हा साधा व सोपा उपाय आहे. परंतु खरोखर खूपच प्रभावी आहे. हा उपाय केल्यास त्याचे लगेचच परिणाम आपल्याला दिसू लागतात व आपले घर धनसंपत्तीने भरून जाते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.