नमस्कार मित्रांनो,
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात आठवड्याचा बाजार भरलेला असतो. नवरा आणि बायको दोघेही बाजारात गेलेले होते. बाजार करता करता संध्याकाळ झाली आणि त्यांचे घर बाजारापासून फार लांब होते. बायको नवऱ्याला बोलत होती खूप उशीर झाला आहे रात्रीचे जाणे धोक्याचे आहे.
रात्रीचे चोर लबाड यांचा धोका देखील आहे. तेव्हा नको जायला तेव्हा आज इथेच राहू आणि सकाळी घरी जाऊ. दोघांचे बोलणे जवळच उभ्या असणाऱ्या दोन लबाड माणसांनी ऐकले. त्यातील एक म्हणाला तुम्ही का घाबरताय आम्ही पण तिकडेच जातोय. दोघांपेक्षा चौघे जास्त सुरक्षित आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचे आहे.
तेवढेच आम्हालाही सोबत होईल आणि तुमचा ही प्रवास सुरक्षित होईल. तेव्हा आपण जाऊया पाहतानाच नवरा बायकोला ही माणसे वाईट आहेत असे वाटले नाही. वरून त्या दोघांनी देवाची शपथ घेतली होती. चौघा जणांचा प्रवास सुरू झाला. प्रवासात सुनसान जागा लागली आणि इथेच एक दरी होती. दरीतल्या रस्त्याने जात असताना या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधले आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिणे काढुन घेतले.
पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई स्वामींचा धावा करू लागली. म्हणाली मी स्वामी लोकांच्या विश्वासावर आले नाही त्यांनी देवाची साक्ष ठेवली, शपथ वाहिली. त्या शपथेच्या विश्वासावर स्वामी मी तुमच्यावर भार सोपवून आले. आता माझे रक्षण करणारे आता तुम्हीच आहात. अचानक बंदुकीचे बार वाजल्याचे आवाज आले आणि दोन पोलीस धावत इकडे आले.
पोलिसांना पाहताच दोघा चोरांनी तिथून पळ काढली. पळताना दागिने देखील त्यांच्याकडून तिथेच राहिले. पोलिसांनी त्यांना मुक्त केले आणि त्यांना अगदी घरी पोहचविले. जेव्हा पोलीस परत निघाले तेव्हा ती बाई म्हणाली दादा तसे जाऊ नका थोडे गुळ पाणी घेऊन जा. पोलिसांनी नाही म्हटले पण बाईंनी जास्तच आग्रह करत म्हटले थांब जरा मी आत्ता आणते आणि ती आत वळली पण तेवढ्यात ते दोघेही गुप्त झाले.
निष्ठा ही अशी पाहिजे. आजवर अनेक लोकांवर किती बिकट प्र सं ग आले असतील. परंतु त्यांच्या निष्ठेमुळे आणि श्रद्धेमुळेच ते त्यातून पार पडले. स्वामी भक्तहो स्वामी भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर हा की, जेव्हा आपण स्वामींच्या चरणांवर डोके ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात. अशावेळी आपण महाराजांना सांगावे महाराज आता तुमच्याशिवाय मला कोणी नाही.
मला तुम्ही आपलेसे करून घ्या मी अवगुणी असेण पण तुम्ही माझा अव्हेर करू नका. मी तुम्हाला शरण आलो आहे स्वामी सम्रथ आवर ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भसतात. निष्ठेचा परिणाम फार आहे. सद्गुरुवर निष्ठा ठेवून प्रपंच करा तो खात्रीने सुखाचा होईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.