ब्लॅकहेड्स मुळापासून घालवायचे आहेत तर करा हे 5 घरगुती उपाय

नमस्कार मित्रांनो,

अनेकदा चेहरा सुंदर असला तरीही नाकावरील ब्लॅकहेड्स सगळ्यांच लक्ष वेधून घेतात. तसेच बऱ्याचदा संपूर्ण चेहरा स्वच्छ असतो. पण नाक मात्र तेलकट आणि ब्लॅकहेड्सने भरलेलं असतं, अशावेळी लाजीरवाण्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं.

चेहऱ्यावरील मृत पेशींखाली तेल साचल्यामुळे त्वचेवर लहान दाण्यांच्या रूपात त्वचा निघू लागते आणि हवेच्या संपर्कात आल्याने ऑक्सिडायझेशन होऊन काळी पडते. हेच ब्लॅकहेड्स, जे बहुतेक नाकावर अथवा नाकाच्या बाजूला असतात.

ब्लॅकहेड्स तसे काढणे खूप कठीण आहे कारण, ते मुळापासून त्वचेला चिकटलेले असतात आणि सहज काढण्याचे नाव घेत नाहीत. अशावेळी अनेकदा आपण पार्लरमधील क्लिनअप, फेशिअल, ब्लीचच्या मदतीने ब्लॅकहेड्स काढतो. पण अगदी घरच्या घरी घरगुती उपायाने देखील हे ब्लॅकहेड्स काढता येतात. जे उपाय आजींच्या काळापासून चालत आलेले आहेत आणि समस्या दूर करण्यात मदत करतात.

अंड्याचा वापर करा
अंड्याच्या पांढऱ्या भागात ॲल्बुमिन नावाचा घटक आढळून येते. हा घटक त्वचेत असलेल्या अतिरिक्त तेलाला कमी करण्यात मदत करतो. अंड्याचा पांढरा भाग सूक्ष्म छिद्र आक्रसण्यातही मदत करतो. या फेस मास्कच्या नियमित वापरामुळे त्वचा उजळ होण्यातही मदत होते.

एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा. आता हे मिश्रण ब्लॅकहेड्सच्या ठिकाणी लावा आणि 15-20 मिनिटे कोरडे होऊ द्या. शेवटी कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही ते आठवड्यातून दोनदा वापरू शकता.

बेकिंग सोडा
एका चमचे बेकिंग सोडामध्ये दोन चमचे पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि ब्लॅकहेड्सवर लावा. 10-15 मिनिटे ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. हे एक्सफोलिएटर म्हणून काम करते आणि चेहऱ्यावरील तेल देखील शोषून घेते.

टोमॅटो
एका चमचे बेकिंग सोडामध्ये दोन चमचे पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि ब्लॅकहेड्सवर लावा. 10-15 मिनिटे ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. हे एक्सफोलिएटर म्हणून काम करते आणि चेहऱ्यावरील तेल देखील शोषून घेते.

ॲपल सायडर व्हिनेगर
ॲपल सायडर व्हिनेगरला बॅक्टेरिया किलरही म्हटले जाते. हा त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना दूर करण्यातही मदत करतो. ॲपल सायडर व्हिनेगरचे अँटी बॅक्टेरियल त्वचेवरील अपायकारक बॅक्टेरियांचा खात्मा तर करतेच, शिवाय त्वचेवरील छिद्रही स्वच्छ ठेवण्यात मदत करते. ॲपल सायडर व्हिनेगर ब्लॅक हेड्सची समस्या दूर करण्यातही मदत करते.

हळद
हळदीमुळे त्वचा एक्सफोलिएट होते आणि त्वचेची खोलवर स्वच्छता देखील होते. अँटिऑक्सिडंटने समृद्ध हळद ब्लॅकहेड्सवर प्रभावी ठरते. हळदीमध्ये खोबरेल तेल घाला आणि आणखी पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावून ठेवा आणि धुवा. हे आठवड्यातून 2 ते 3 वेळा लागू केले जाऊ शकते.

तसेच फेसपॅक देखील तयार करू शकता. तांदळाचे पीठ त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि पोअर्स ओपन करण्याचे कार्य करते. तसंच हे पीठ उत्तम स्क्रबर म्हणून कार्य करते.

यामुळे त्वचा नैसर्गिक स्वरुपात उजळते. तर कोरफड जेलमुळे त्वचा मऊ, नितळ व सुंदर होण्यास मदत मिळते. त्वचेसाठीचा हा उपाय अतिशय रामबाण आहे. आठवड्यातून तिनदा या फेस स्क्रबचा आपण उपयोग करू शकता. यामुळे ब्लॅकहेड्स व व्हाइटहेड्सची समस्या उद्भवणार नाही.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *