आयुष्यात या अशा 5 लोकांना स्वामी महाराज कधीच पावत नाहीत हे 100 टक्के सत्य आहे.

नमस्कार मित्रांनो,

आजचा विषय आहे आयुष्यात या 5 लोकांना स्वामी कधीच पावत नाहीत. स्वामी प्रिय भक्तहो देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक उपाय करतात. मात्र लक्षात घ्या काही लोक तर असे असतात ज्यांनी किती जरी देव देव केला, किती जरी उपाय केले, देवासमोर नाक जरी रगडले तरी देव त्यांना पावत नाही. असे 5 लोक कोणते ते आज आपण इथे पाहणार आहोत.

काही लोक इतके भाग्यवान असतात की, देवाचं साध नामस्मरण जरी केलं तरी देव त्यांना प्रसन्न होतो. पण काही लोक इतके अभागी असतात की, त्यांचे कर्म तसं असतं की, त्यांना देव प्रसन्न होत नाही. ते अशा प्रकारची चुकीची काम करतात की, ज्यामुळे परमेश्वर त्यांना प्रसन्न होत नाही. चला तर पाहूया असे 5 लोक कोणते आहेत.

1) जे लोक दुसऱ्यांचे वाईट विचार करतात म्हणजेच दुसऱ्याचं वाईट व्हावं असं ज्यांना वाटतं, जे फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतात अशा लोकांना देव कधीही प्रसन्न होत नाही. ज्यांना देव कधीही पावत नाही, नेहमी दुसऱ्यांच्या हिताचा विचार करायला हवा. गोरगरिबांच्या दीनदलितांच्या विचार आपण करत असू तर देव सुद्धा आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. मात्र स्वार्थीपणाने फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतो त्याला देव कधीच पावत नाही.

2) जे लोक आपल्या आई वडिलांचा अपमान करतात आणि आई-वडिलांचा छळ करतात अशा लोकांना देव कधीच प्रसन्न होत नाही, कधीच पावत नाही, कधीही माफ करत नाही. कारण आई-वडिलांमध्ये प्रत्यक्ष परमेश्‍वराचा वास असतो. ज्यांनी आपल्याला मोठं केलं, ज्यांनी आपल्याला उभे राहायला शिकवलं, आपल्याला आपल्या पायावर उभे राहण्याची ताकद दिली अशा परमेश्वरान आपल्या आई-वडिलांना जे लोक छळतात, अपमान करतात त्यांना अपमानास्पद वागणूक देतात अशा लोकांना देव कधीच पाहत नाही. अशा लोकांच्या घरचा पैसा, संपत्ती लवकर संपुष्टात येते आणि ते लोक दरिद्री नक्की बनतात.

3) ज्या घरामध्ये स्त्रियांचा मान राखला जात नाही, आपलं धर्म सांगतो की, ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते त्याच ठिकाणी ईश्वराचा वास असतो. माता लक्ष्मी त्या ठिकाणी वास करते ज्या ठिकाणी स्त्रियांचा मान राखला जातो. म्हणून अशा घरांमध्ये जिथे स्त्रीला योग्य मान दिला जात नाही, स्त्रियांना नेहमी अपमानास्पद वागणूक होते, छळ होतो मग ती स्त्री तुमच्या घरातील असू द्या किंवा तुमची बायको असू द्या किंवा तुमची बहीण असू द्या कोणत्याही रूपात ज्यावेळी स्त्रीचा छळ होतो त्यावेळी त्या घरामध्ये लक्ष्मी प्रकट होते आणि लक्ष्मी घरातून निघून जाते.

4) घरामध्ये अन्न देवतेचा अपमान होतो. अन्नदेवतेचा अपमान म्हणजे अन्नाचा अपमान. अन्न हे पूर्णब्रह्म असा आपल्या धर्मामध्ये सांगितलेले आहे. आणि म्हणून अन्न हे योग्य प्रमाणात शिजवावे आणि ते खाताना आपल्या ताटामध्ये शिल्लक राहणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. जे लोक देवतेचा अपमान करतात, आपल्या ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवतात किंवा इतकं शिजवल जात की, नंतर वाया जातं अशा घरांमध्ये एक ना एक दिवस दारिद्र येत.

5) जर आपण इमानदारीची साथ सोडून म्हणजेच न्यायाची साथ सोडून जर अन्यायाला साथ तुम्ही देत असाल आणि अन्यायाच्या मार्गाने जर चालत असाल, गरिबांवर तुम्ही अत्याचार करत असाल, तुमच्याकडे एखादा गरजू व्यक्ती आला आणि त्याची गरज न भागवत आणि जर तुम्ही त्याचा अपमान करत असाल,

एखादा अपंग व्यक्ती आहे त्याच्या अपंगत्वाची जर तुम्ही खिल्ली उडवत असाल तर ते अतिशय निंदनीय प्रकारच कृत्य आहे. घोर पाप आहे आणि त्याची शिक्षा एक ना एक दिवस तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे भोगावी लागते. आणि म्हणून ही 5 प्रकारची लोक असतात त्यांना देव कधीच प्रसन्न होत नाही आणि त्यांना देव कधीच पावत नाही.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *