नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावामागील लपलेला उपदेश :
श्री – श्रीमंतीचा गर्व करू नका
स्वा – स्वाभिमानाने जगा
मी – मीपणा सोडा
स – सर्वांशी प्रेमाने वागा
म – मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा
र्थ – थोरामोठ्यांचा आदर राखा
अडचणीत तुझ्या आयुष्यात नव्हे तर तुझ्या मनात आहे. ज्या दिवशी तू तुझ्या मनावर विजय मिळवू असेल त्या दिवशी तुला आपोआप मार्ग सुचेल. एक शब्द आहे – ‘नशीब’ यांच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे – ‘स्वामी’ आर्ततेने बोलून बघा आणि मनासारखं नाही झालं तर सांगा.
स्वामींचे वचन : काय रे ! काय पाहतोस माझ्याकडे. माझा निवांत क्षण नसून, तुझ्या कर्मावर मी नजर स्थिरावून आहे. माझ्याकडे तू असे नि जरूर पहा ! परंतु लक्षात असू दे ! मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा ! आणि वर्तमानात असताना नामात राहा | स्वतः रोग लाव – कोणाच्या आशेवर, मदतीवर अवलंबून राहू नकोस ! कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझाच असेल !
हे ही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे. का भरकटत आहेस? सावर स्वतःला मी तुझाच आहे पण काहून सांग तुझ्या मनाला. प्र य त्न कर !भिऊ नको मी तुझ्या पाठीशीच आहे !! आपण दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की, आनंदाची फुले आपल्या दारात पडतात!
स्वामींचे सुंदर उदगार
तू माझा बनून तर बघ प्रत्येकाला तुझं नाही बनवीन तर सांग!
संकट आले म्हणून ध्येय बदलू नका श्री स्वामी समर्थ महाराज पाठीशी आहे हे विसरू नका. जीवनात श्री स्वामी समर्थांचा गुरु म्हणून स्वीकार, एवढीच गोष्ट इतकी शक्तीदायी आहे की जी आपल्या असाध्य दुःखाचा अडचणीचा आणि संकटाचा मुळापासून नायनाट करण्यास सदैव समर्थ आहे…!!
सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखानं कारणीभूत ठरतो, त्यामुळे सर्वांनी हे मनी ठसवावे की ‘कर्ता आणि करविता तूच एक स्वामी नाथा माझिया ठायी वार्ता मी पणाची नसेचि’. तुम्ही कोणाचे काही बिघडवू नका. मी तुमचे काहीही देणार नाही. ज्यावेळी तू जाशील अशा काळोखात ज्या ठिकाणी तुझी सावली ही सोडेल तुझी पाठ त्यावेळी तू घाबरू नको स्वामीच पकडतील त्याठिकाणी तुझा हात.
काही गोष्टी असतात ज्या आपण कोणालाच सांगू शकत नसतो. त्यावेळी तुम्ही ते गोष्ट स्वामींना तर सांगून बघा तुमचे मन किती हलके होईल ते समजेल आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या समस्येचे समाधान ही मिळेल. बोला अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.