अशी 4 झाडे जी नक्की घरात असावी.

नमस्कार मित्रांनो,

ज्या घरात ही झाडे लावली जातात त्या घरांमध्ये नेहमी आनंद आणि सुख समाधान असते. तसे तर झाडे सर्वजण लावतात आणि झाडे अ ध्या त्मि क दृष्ट्या तसेच वैज्ञानिक दृष्ट्याही लावायलाच हवी. कारण झाडांमुळे ऑक्सिजनची निर्मिती होऊन वातावरण शुद्ध होते.

झाडे लावणे हे 1 चांगले काम आहे. ती लावलीच पाहिजे. परंतु काही झाडे असे आहेत की, जी आपल्या घरात असायलाच हवी. ज्यामुळे तुमच्यावर महालक्ष्मीची कृपा होईल आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही.

चला तर बघुयात ती कोणती रोपे किंवा झाडे आहेत जी आपल्या घरी असायलाच हवी. प्रत्येकाच्या घरी तुळस ही असायलाच पाहिजे. तुमच्या घरात किंवा बाहेर तुळशीचे झाड असेल तर तुमच्या घरात कोणतीही न का रा त्म क शक्ती प्रवेश करू शकत नाही.

कारण न का रा त्म क ऊर्जा तुळस तिथेच नष्ट करते. कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकता नाही. कारण तुळस स्वतः वृंदाचे रुप आहे आणि तुळशीला नारायण प्रिया असेही म्हटले जाते.

ज्या घरात तुळस असते त्या घरात कसलीही कमतरता भासत नाही. तुळशीला साक्षात देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्या घरात तुळस असते त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही.

दुसरे झाड म्हणजे कढीपत्त्याचे झाड. जर कढीपत्त्याचे झाड तुम्ही दारात लावले तर त्यामुळे घरात स का रा त्म क ऊर्जेचा येईल. कारण कढीपत्त्याचे झाड लावल्याने शनी, राहू आणि केतू हे तीनही ग्रह शांत राहतात. त्यामुळे तुमच्या घरात स का रा त्म क ऊर्जेचा संचार होऊन तुम्हाला शांतता व समाधान लाभते.

तिसरे झाड म्हणजे आवळा. जर तुम्ही आवळ्याचे झाड लावले तर देवी लक्ष्मी कायम स्वरूपी तुमच्या घरी वास्तव्य करेल. तुम्हाला हे माहितच असेल की, आवळ्याच्या वृक्षात स्वतः भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो आणि जेथे स्वतः भगवान श्रीहरी विष्णू असतील तेथे देवी लक्ष्मी असणारच म्हणून आवळ्याचे झाड आपल्या घरात असायलाच हवे. त्याला आपण जमिनीवर किंवा कुंडीतही लावू शकतो.

चौथे झाड म्हणजे पांढऱ्या रुईचे किंवा मंदारचे झाड. हे झाड सहजतेने कोठेही उपलब्ध असते. हे झाड तुम्ही कुंडीत किंवा जमिनीवर कोठेही लावू शकता. परंतु शक्यतो याला जमिनीवरच लावण्याचा प्रयत्न करावा. कारण 11 वर्षांनंतर यांच्या मुळांवर स्वतः भगवान गणेशजी प्रकट होतात आणि या झाडाचा आकार गणपती बाप्पांसारखा होतो.

पांढरी रुई म्हणजेच मंदार जास्त महत्त्वाचे मानले गेले असून याचे फुले गणपती बाप्पा तसेच महादेवांनाही अर्पण करतात. हे झाड जर लावले तर आपला आत्मविश्वास वाढतो या झाडामुळे सूर्य देवांचा आपल्यावर प्रभाव पडतो यामुळे आपल्या समाजातही मान सन्मान वाढतो.

पाचवे झाड म्हणजे पारिजातक. पारिजातक हे अति दुर्लभ झाड आहे. याची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली आहे. समुद्र मंथनातून जे अकरावे रत्न बाहेर आले ते म्हणजे पारिजातक होय. या झाडाला नुसता स्पर्श केला तरी आपल्या सर्व थकवा निघून जातो. पारिजातकाचे झाड सर्व देवी-देवतांनाही प्रिय आहे. हे झाड स्वर्गात सुद्धा लावलेले आहे. ज्यांच्या घरात पारिजातकाचा वृक्ष असेल तर त्यांच्या घरात कधीही कोणतीही वाईट शक्‍ती प्रवेश करू शकत नाही.

पारिजातकाची फुले छोटेसी नाजूक व खूपच सुगंधीत असतात. सर्व देवी-देवतांना पारिजातकाची फुले अर्पण केली जातात. पारिजातकांमुळे सर्वरोग दोष दूर होतात आणि कुलदेवतेचा दोष आपल्याला लागला असेल तर पारिजातकांमुळे तो दोष दूर होतो. अशा प्रकारची ही 5 झाडे आपण घरात, कुंडीत, घराच्या आसपास इत्यादी ठिकाणी लावू शकतो.

झाडे लावताना घराच्या उत्तरेकडे, ईशान्येकडे किंवा पूर्वेकडे लावावे नाहीतर तुम्हाला त्याचे पूर्ण फळ मिळत नाही. आपण या झाडांना भगवंत स्वरूप म्हणून लावतो तर त्यांचे तसे पावित्र्य राखले गेले पाहिजे. शुद्ध मनाने व आचरणाने या झाडाची पूजा आणि दर्शन करावे यांना रोज पाणी देणेही गरजेचे आहे.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *