नमस्कार मित्रांनो,
हा अनुभव बोरवली येथे राहणारे स्वामी भक्त मनोहर पाटील यांचा आहे. ते सांगतात जो सकल विद्यांचा सागर चौ स ष्ट कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक पायाळू अशी ज्या ब्रम्हांडनायकाची स्तुती आहे ते श्री स्वामी समर्थ आमचे परम पवित्र गुरुदेव आहे. मी 1985 पासून दादर मठात जातो. माझ्या कार्यालयातून दर गुरुवारी संध्याकाळी मी मठात जात असे.
सुमारे 1996 ते 97 चा काळ माझा एक कार्यालयीन खटला उच्च न्यायालयात चालू होता. वि द्य मा न न्यायमुर्ती श्री पळणीटकर साहेबांपुढे खटला प्रलंबित होता. माझे वकील श्री कोरे साहेब माझी बाजू लढवित होते. एकदा मी अक्कलकोटला मठात जाण्यासाठी निघालो होतो याची कल्पना कोरे यांना देऊन खटला बोर्डापुढे येऊन निकाल लागण्यास अ व का श होता.
त्यामुळे कोरेंना सांगून मी निघून गेलो. कोरेंनी मला सांगितले की, बोर्डावर तुमच्या खटल्याचा नंबर 253 असून दोन तीन महिन्यात निकाल लागेल असे सांगितले. पळणीटकर साहेब कमालीचे शि स्त प्रि य त्यांनी सोमवारी खटला चालविण्यासाठी क्रमांक 1 पासून सुरुवात करायला पाहिजे होती.
परंतु अ चा न क न्यायमूर्ती महोदयांनी क्रमांक 251 पासून सुरुवात केली. त्यामुळे श्री कोरेंची धांदल झाली व माझ्या खटल्याचा नंबर 253 असल्यामुळे त्यांनी सावधगिरीने खटला चालविला. त्याच दिवशी निकाल लागला. मी बुधवारी सकाळी अक्कलकोटातून मुंबईस आलो.
मला कोरे साहेबांचा निकाल लागल्याचा निरोप मिळाला. मी आ श्च र्य च कि त झालो व लगेच समजले की, स्वामीं पुढे मी खटला त्वरित निकालात निघण्यासाठी नवस केला होता. आणि स्वामिनी त्वरित त्याचे फळ दिले धन्य ते स्वामी, धन्य ते समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.